Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Share Market Update: शेअर बाजारात किरकोळ वाढ, एफएमसीजी आणि मेटल स्टॉक्समध्ये वाढ!

Share Market Open

Stock Market Opening Bell Today: आज शेअर बाजार सुरू झाल्यावर काय घडले?कोणते स्टॉकने चढत्या क्रमाने जात आहेत, कोणते उतरत्या क्रमाने जात आहेत ते या बातमीतून जाणून घेऊयात.

Trade setup for today: आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी भारतीय शेअर बाजार थोड्या वाढीसह उघडला आहे. बीएसई (BSE: Bombay Stock Exchange) सेन्सेक्स 35 अंकांनी वाढून 60 हजार 388 वर तर, एनएसई (NSE:National Stock Exchange) निफ्टीने 16 अंकांच्या वाढीसह 18 हजार 8 अंकांवर व्यवहार सुरू केला. मात्र, काही वेळातच वेग चढत्या क्रमाने जात असलेल्या शेअरने लाल रंगात प्रवेश केला आहे. बँकिंग सेक्टरमध्ये घसरण होत असल्याने, निफ्टी बाजारातही घसरण दिसून येत आहे. तरी, आता सेन्सेक्स 152 अंकांनी आणि निफ्टी 40 अंकांच्या वाढीसह व्यवहार करत आहे.

बाजारातील एफएमसीजी, धातू, ऊर्जा आणि फार्मा शेअर वगळता इतर सर्व क्षेत्रांत घसरण दिसून येत आहे. बँकिंग, ऑटो, आयटी, क्षेत्रातील शेअर घसरणीसह व्यवहार सुरू आहे. सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 15 शेअरमध्ये वाढ दिसून आली आहे, तर 15 शेअर घसरले आहेत.  निफ्टीच्या 50 शेअरपैकी 28 शेअरचे दर वाढले असून, 22 शेअर घसरत आहेत. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्येही घसरण होताना दिसत आहे.

कोणते शेअर्स वाढले आणि कोणते घसरले? (Which stocks are rising and which are falling?)-

चढत्या क्रमात असलेले शेअर (Bullish stocks): आजच्या ट्रेडिंग सत्रात, आयटीसी (ITC) शेअर 1.05 टक्क्यांनी वाढला असून, रिलायन्स 1.03 टक्के, नेस्ले 0.71 टक्के, हिंदुस्तान युनिलिव्हर (HUL) 0.64 टक्के, लार्सन 0.61 टक्के, सन फार्मा 0.60 टक्के, पॉवर ग्रिड 0.50 टक्के, टाटा स्टील 0.43 टक्के, टायटन 0.37 टक्के, एचडीएफसी (HDFC) 0.82 टक्के एवढे वधारले आहेत.

घसरणीत असलेले शेअर (falling stock): टीसीएस 0.92 टक्के, आयसीआयसीआय बँक 0.81 टक्के, बजाज फिनसर्व्ह 0.76 टक्के, अॅक्सिस बँक 0.54 टक्के, इंडसइंड बँक 0.48 टक्के, टेक महिंद्रा 0.45 टक्के, बजाज फायनान्स 0.32 टक्के, इन्फोस 20 टक्के. महिंद्रा 0.20 टक्के, महिंद्रा अँड महिंद्रा 0.10 टक्क्यांच्या घसरणीसह व्यवहार करत आहे.