Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Stock Market Closing : शेअर बाजार मोठ्या घसरणीसह बंद झाला

Stock Market Closing

आठवड्यातील शेवटचा दिवस भारतीय शेअर बाजारासाठी (Share Market) अत्यंत निराशाजनक ठरला. जागतिक संकेतांमुळे सकाळी बाजार घसरणीसह उघडला. तर आठवड्याच्या शेवटच्या दिवशी बंद होतानासुद्धा शेअरबाजारात घसरण पहायला मिळाली.

आठवड्यातील शेवटचा दिवस भारतीय शेअर बाजारासाठी (Share Market) अत्यंत निराशाजनक ठरला. जागतिक संकेतांमुळे सकाळी बाजार घसरणीसह उघडला. दिवसभराच्या व्यवहारात चढ-उतार होते. पण बाजार सावरू शकला नाही. आजच्या व्यवहाराअंती बीएसई सेन्सेक्स 316 अंकांनी घसरून 61,002 वर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 91 अंकांनी घसरून 17,944 अंकांवर बंद झाला.

सेक्टर अपडेट

आजच्या ट्रेडिंग सत्रात फक्त ऊर्जा, इन्फ्रा, कमोडिटी क्षेत्रातील समभागांना तेजी आली. त्याचबरोबर बँकिंग, ऑटो, आयटी, फार्मा, मेटल्स, मीडिया, रिअल इस्टेट, एफएमसीजी क्षेत्रातील समभाग घसरले. मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागही घसरले. निफ्टीच्या 50 समभागांपैकी 14 समभाग वाढीसह तर 36 समभाग तोट्यासह बंद झाले. सेन्सेक्समधील 30 समभागांपैकी 7 समभाग तेजीसह बंद झाले तर 23 घसरणीसह बंद झाले. बँक निफ्टी 500 किंवा 1.20 टक्के आणि निफ्टी आयटी 1.21 टक्के किंवा 380 अंकांनी घसरले.

या स्टॉकमध्ये तेजी दिसली

जच्या सत्रात लार्सन 2.18 टक्के, अल्ट्राटेक सिमेंट 1.77 टक्के, एशियन पेंट्स 1.01 टक्के, एनटीपीसी 0.51 टक्के, रिलायन्स 0.42 टक्के, टाटा स्टील 0.27 टक्के आणि आयटीसी 0.21 टक्के तेजीसह बंद झाले. तर इंडसइंड बँक 3.13 टक्के, नेस्ले 3.12 टक्के, महिंद्रा 1.73 टक्के, एसबीआय 1.70 टक्के, टीसीएस 1.53 टक्के, कोटक महिंद्रा 1.52 टक्के, एचसीएल टेक 1.49 टक्के, सन फार्मा 1.26 टक्के, एक्सिस बँक 1.26 टक्के, इन्फोसिस 1.15 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाला.

गुंतवणूकदारांच्या संपत्तीत घसरण

आजच्या व्यवहारादरम्यान शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीचे नुकसान झाले आहे. बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप 266.90 लाख कोटी रुपयांवर घसरले, जे गुरुवारी 268.23 लाख कोटी रुपये होते. म्हणजेच आजच्या सत्रात गुंतवणूकदारांचे 1.33 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.