Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Retail Inflation: महागाई मोजण्यासाठी आता ऑनालाइन ग्रोसरी कंपन्यांचे दरही विचारात घेणार

Food Inflation

Image Source : www.bigbasket.com/www.westend61.de

फळे, भाज्यांपासून किराणा वस्तुंची ऑनलाइन खरेदी वाढली आहे. जिओ मार्ट, बिग बास्केट, स्वीगी मार्टसारख्या कंपन्यांवरून नागरिकांची खरेदी वाढली आहे. त्यामुळे आता महागाई मोजताना ऑनलाइन कंपन्यांचे दरही विचारात घेतले जाणार आहेत.

Retail Inflation: इ-कॉमर्स आणि ऑनलाइन शॉपिंग वाढत असल्याने महागाई नक्की किती हे ठरवताना सांख्यिकी मंत्रालयाला मर्यादा येत आहेत. त्यामुळे आता ऑनलाइन ग्रोसरी कंपन्याच्या साइटवरील किराणा मालाचे दरही ग्राह्य धरण्यात येणार आहेत. कोरोनानंतर विशेषत: ऑनलाइन किराणा, फळे, भाज्या खरेदी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

बड्या ऑनलाइन कंपन्यांचे दर विचारात घेणार 

सांख्यिकी मंत्रालयाने बिग बास्केट आणि रिलायन्स जिओ मार्टला विविध किराणा मालांच्या किंमतीची माहिती मागितली आहे. मासिक महागाई तसेच किरकोळ महागाईचे दर निश्चित करण्यासाठी ऑनलाइन दर विचारात घेण्यात येतील. सोबत ग्राहक किंमत निर्देशांक काढण्यातही ही आकडेवारी वापरण्यात येईल. 

ग्राहक किंमत निर्देशांकाची (CPI) आधारभूत किंमत ठरवण्यासाठी सांख्यिकी मंत्रालयाकडून सर्वेक्षण सुरू आहे. त्यासाठी जास्तीत जास्त नमुने घेण्यात येत आहेत. यापूर्वी 2012 साळी CPI आधारभूत किंमत ठरवण्यात आली होती. त्यात आता ताज्या किंमती आणि महागाईच्या आकडेवारीनुसार बदल करण्यात येणार आहेत. 

ऑनलाइन, ऑफलाइन किंमतीतील फरक 

भारतीय ऑनलाइन किराणा मार्केट 2022 साली 6.8 बिलियन डॉलरचे होते. ते 2028 पर्यंत 37 बिलियन डॉलरपर्यंत पोहचण्याचा अंदाज आहे. ऑनलाइन किराणा क्षेत्राची वाढ वार्षिक 31 टक्क्यांनी होत आहे. भाजी मंडळी, किराणा दुकानातील सामानाचे दर आणि ऑनलाइन वस्तुंचे दर वेगवेगळे असू शकतात. ऑनलाइन कंपन्यांकडून डिस्काउंटही दिला जातो. त्यामुळे महागाईचा अंदाज चूक शकतो, त्यामुळे आता सांख्यिकी मंत्रालय सर्वकष माहिती विचारात घेणार आहे. 

सध्या सांख्यिकी मंत्रालयाकडून घरगुती ग्राहक खर्च सर्वेक्षण (HCES) सुद्धा सुरू आहे. या सर्वेमध्ये नागरिकांच्या ऑनलाइन किराणा वस्तू खरेदीबाबत प्रश्नांचा समावेश करण्यात आला आहे.