Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Stationary Business: स्टेशनरी व्यवसायातून करता येऊ शकते बक्कळ कमाई; कशी, जाणून घ्या

Stationary Business

Image Source : www.okcredit.in

Stationary Business: किमान बजेटमध्ये तुम्ही शाळा, महाविद्यालये किंवा शासकीय कार्यालयाच्या बाजूला स्टेशनरीचा व्यवसाय चालू करू शकता. यासाठी किती गुंतवणूक करावी लागेल आणि कोणत्या गोष्टीकडे लक्ष द्यावे लागेल, जाणून घेऊयात.

जून महिना सुरू झाला असून आता शाळा- महाविद्यालयांचे प्रवेश सुरू झाले आहेत. या नवीन शैक्षणिक वर्षात तुम्ही स्वतःचा व्यवसाय करण्याचा विचार करत असाल, तर स्टेशनरी व्यवसाय (Stationary Business) तुम्हाला बक्कळ कमाई करून देऊ शकतो. स्टेशनरीच्या सामानाची डिमांड ही कायम मोठ्या प्रमाणावर असते. फक्त त्यासाठी योग्य ठिकाणी जागा भाड्याने घेणे आणि गुंतवणूक करणे गरजेचे आहे. हा व्यवसाय छोट्यातील छोट्या गावात आणि मोठ्या शहरात देखील करता येतो. हा व्यवसाय करताना कोणत्या गोष्टीकडे लक्ष द्यायला हवे, किती गुंतवणूक (Investment) करायला हवी, जाणून घेऊयात.

व्यवसायाची नोंदणी करा

जर तुम्ही स्टेशनरीचा व्यवसाय सुरू करणार असाल, तर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला तुमच्या व्यवसायाची नोंदणी करावी लागेल. ही नोंदणी (Registration) शॉप अँड एस्टाब्लिशमेंट ऍक्ट (Shop and Establishment Act) अंतर्गत केली जाते. त्यासाठी तुम्हाला वकिलाची मदत घ्यावी लागेल. 100 रुपयांचा स्टॅम्प पेपर आणि किमान 500 ते 2000 रुपये वकिलाची फी द्यावी लागणार आहे. व्यवसाय सुरू करण्याचा पहिला टप्पा म्हणून  आपण नोंदणीकडे पाहिले पाहिजे.

'या' ठिकाणी दुकानासाठी जागा शोधा

शाळा, शासकीय कार्यालय आणि बँका असणाऱ्या मोक्याच्या ठिकाणी तुम्ही स्टेशनरी व्यवसाय सुरु करू शकता. त्यासाठी तुम्हाला 300 ते 400 स्के.मी जागेची गरज आहे. जिथे तुम्ही दुकान उभारू शकता. शाळा, महाविद्यालय आणि बँका असणाऱ्या ठिकाणचा एरिया हा डेव्हलप असतो, त्यामुळे तुम्हाला सहज दुकानाचा गाळा उपलब्ध होऊ शकेल. या दुकानाचे मासिक भाडे, डिपॉझिट आणि लाईट बिलाचा खर्च किती असेल, याचा अंदाज तुम्हाला बांधावा लागेल.

ग्रामीण भागात दुकानाच्या गळ्याची किंमत ही 2 हजारापासून सुरू होते.निमशहरात त्याच्या किंमती 5 ते 7 हजारापासून सुरू होतात. तर शहरात दुकानाच्या गळ्याच्या किंमती या 10 ते 15 हजारापासून सुरू होतात. याशिवाय किमान भाड्याच्या दुप्पट ते चौपट रक्कम डिपॉझिट म्हणून द्यावी लागते. या सर्व गोष्टींचा विचार करून तुम्हाला गुंतवणुकीच्या रकमेचा विचार करावा लागेल.

दुकानासाठी जागा भाड्याने घेतल्यानंतर दुकानात सामान ठेवण्यासाठी वेगवेगळ्या आकाराची कपाटे आवश्यक आहेत. बचतीसाठी तुम्ही सेकंड हँड कपाटे वापरू शकता. याची किमान किंमत 30 हजारापासून सुरू होते.

'या' स्टेशनरी प्रोडक्टची डिमांड सर्वाधिक

पेन, पेन्सिल, A4 साईज पेपर, नोटपॅड , वेगवेगळ्या वह्या, शाळा-महाविद्यालयाची पाठ्यपुस्तके तुम्ही विक्रीला ठेऊ शकता. यासोबतच दुकानात ग्रीटिंग कार्ड्स,प्रेझेंट पाकीट,गिफ्ट कार्ड आणि डेकोरेशनचे इतर सामान देखील विक्रीसाठी ठेऊ शकता. हल्ली स्टेशनरी असणाऱ्या दुकानात झेरॉक्स मशीन देखील ठेवले जाते. लोक स्टेशनरी सोबत झेरॉक्स काढू शकतात. छोट्या आकाराची ही मशीन कमी जागा घेते.याची सुरुवाती किंमत 30 हजारापासून सुरू होते. वेगवेगळ्या कंपनीनुसार याच्या किंमती बदलू शकतात.

एकदा का दुकान सुरू झाले की, लोकांची मागणी लक्षात घेऊन त्या वस्तू विक्रीसाठी ठेऊ शकता आणि त्यातून पैसे कमवू शकता. स्टेशनरीचे सर्व सामान तुम्ही होलसेल मार्केटमधून खरेदी करू शकता. तुमची स्वतःची चार चाकी गाडी असेल, तर तुम्ही त्यातून स्टेशनरीचे सामान घेऊन येऊ शकता. यामुळे तुमचा ट्रॅव्हलिंग खर्च कमी होण्यास मदत होईल.

स्टेशनरीच्या व्यवसायात किती कमाई होते?

स्टेशनरीचा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टींचा विचार करून स्वतःचे बजेट ठरवावे लागेल. कमी बजेटमध्ये जास्त नफा कमावता येऊ शकतो. तुमच्या दुकानाचा नफा हा दुकानाच्या जागेवर निर्धारित असेल.जर दुकानाच्या आसपास शाळा, कॉलेज, शासकीय ऑफिस किंवा बँक असेल, तर तुम्ही दुप्पट कमाई करू शकता. जर तुम्ही दुकानात ब्रँडेड वस्तूंची विक्री करत असाल, तर त्यातून तुम्ही 30 ते 40% नफा कमवू शकता. लोकल उत्पादनांची विक्री करून 50% पर्यंत नफा कमावता येतो. मात्र यासाठी तुम्हाला होलसेल दराने माल खरेदी करावा लागेल.

मार्केटिंग करणे पडेल फायद्याचे

तुमचा व्यवसाय कोणताही असो, मात्र त्यासाठी मार्केटिंग करणे अतिशय गरजेचे आहे. स्टेशनरीतील उत्पादनावर डिस्काउंट देणारी जाहिरात करून तुम्ही नफा कमवू शकता. त्यासाठी ब्लॅक अँड व्हाइट पॅम्पलेट छापून तुम्ही शाळा, महाविद्यालय, बँक आणि शासकीय ऑफिसमध्ये ते वाटू शकता. याशिवाय मोठ्या प्रमाणावर स्टेशनरी सामानाची खरेदी केल्यावर तुम्ही होम डिलिव्हरीची सुविधा देखील देऊ शकता.

Source: hindi.moneycontrol.com