Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

SGB: या सरकारी योजनेद्वारे स्वस्तात खरेदी करा सोने, फक्त 5 दिवसांची आहे मुदत! पाहा डिटेल्स

Sovereign Gold Bonds Scheme

SGB: तुम्ही सोनं स्वस्तात विकत घ्यायचा प्लॅन करताय? मग तुम्ही सॉवरेन गोल्ड बाॅण्ड म्हणजेच सार्वभौम सुवर्ण रोख्यांमध्ये गुंतवणूक करु शकता. कारण, सॉवरेन गोल्ड बाॅण्डची दुसरी सिरीज सुरू झाली आहे. त्यामुळे गुंतवणुदारांना कमी दरात सोनं खरेदी करता येणार आहे. चला तर मग सविस्तर जाणून घेऊया.

Sovereign Gold Bonds Scheme 2023-24: कमी दरात सोन खरेदी करायचे असल्यास, ही संधी सोडू नका. कारण, सरकार भारतीय रिझर्व्ह बॅंकद्वारे त्यांच्या सॉवरेन गोल्ड बाॅण्डद्वारे सोने विक्री करत आहे. यासाठी तुम्ही आजपासून म्हणजे 11 सप्टेंबर 2023 ते 15 सप्टेंबर 2023 पर्यंत या 5 दिवसांच्या अवधीत बाॅण्ड्स खरेदी करु शकणार आहात. तुम्ही 1 ग्रॅम गोल्ड खरेदी करणार असल्यास तुम्हाला फक्त 5,923 रुपयांमध्ये ते घेता येणार आहे. तेही मार्केटपेक्षा स्वस्त दरात. हे कुठे आणि कसे खरेदी करायचे याविषयी आपण जाणून घेऊया.

अशी करा खरेदी

या योजनेचा फायदा असा आहे की तुम्ही या बाॅण्डद्वारे सोने ऑनलाईन आणि ऑफलाईन खरेदी करु शकणार आहात. तसेच, तुम्ही पोस्टातूनही गोल्ड बाॅण्ड खरेदी करु शकणार आहात. काही स्टाॅक होल्डिंग काॅर्पोरेशन, बीएसई आणि एनएसई प्लॅटफाॅर्मवरुनही तुम्ही गोल्ड बाॅण्ड खरेदी करु शकणार आहात. याशिवाय महत्वाची गोष्ट म्हणजे या गोल्ड बाॅण्डवर जीएसटी लागू नाही आहे. याचबरोबर सरकारी योजना असल्यामुळे रिटर्न मिळण्याची हमी आहे. त्यामुळे या योजनेत गुंतवणूक करायची संधी सोडू नका.

गोल्ड घेण्यासाठी मर्यादा

तुम्हाला या बाॅण्डमध्ये गुंतवणूक करायची असल्यास, कमीतकमी 1 ग्रॅम गोल्ड खरेदी करावे लागणार आहे आणि जास्तीतजास्त  4 किलोपर्यंत तुम्ही खरेदी करु शकता. तसेच, वैयक्तिक HUF साठी 4 किलोपर्यंत गुंतवणूक करता येते. याशिवाय ट्रस्ट आणि अन्य घटकांसाठी 20 किलोची मर्यादा आहे. यामुळे तुम्ही तुमच्या बजेटनुसार गोल्ड खरेदी करु शकणार आहात.

ऑनलाईन खरेदीवर सवलत

आजपासून बाॅण्डची विक्री सुरु झाली असून तुम्हाला 1 ग्रॅम गोल्डसाठी 5,923 रुपये मोजावे लागणार आहेत. मात्र, हेच तुम्ही ऑनलाईन आणि डिजिटली अर्ज करुन पेमेंट करणाऱ्या गुंतवणुकदारांना 1 ग्रॅमवर 50 रुपयांची सवलत मिळणार आहे. म्हणजेच गुंतवणुकदारांना हे बाॅण्ड 5,873 रुपयांमध्ये मिळणार आहे. त्यामुळे या बाॅण्डमध्ये गुंतवणूक केल्यास तुमचा फायदाच होणार आहे. यामुळे या संधीचा फायदा घ्या आणि चांगला रिटर्न मिळवा.