Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Business Idea: ग्रामीण भागात सुरु करता येऊ शकतात 'असे' काही व्यवसाय

Business idea

Business Idea: तुमचा विचार जर व्यवसाय करायचा असेल तर ग्रामीण भागात चालू शकतात असे काही व्यवसाय आहेत. शेती, खाद्य पदार्थ, शैक्षणिक साहित्य या गोष्टी गावाकडे जास्त प्रमाणात चालू शकतात. या व्यवसायांसाठी लागणार खर्च किती? आणि इतर माहित जाणून घेऊया.

Business Idea: ग्रामीण भागातील अनेक तरुण नोकरीच्या शोधात शहरांकडे वळतात. पण, काही मुलं - मुली अशी असतात ज्यांच्यावर लहान वयातच भरपूर जबाबदाऱ्या येतात, त्यामुळे त्यांचे शिक्षण अपूर्ण राहते. मग शिक्षण नाही तर नोकरी नाही. अशात त्यांचा विचार जर व्यवसाय करायचा असेल तर ग्रामीण भागात चालू शकतात असे काही व्यवसाय आहेत. सर्वात आधी तर आपल्या गावात कोणकोणते व्यवसाय आहेत, याबाबत विचार करावा. त्यानंतरच व्यवसाय उभारणी करावी. शेती, खाद्य पदार्थ, शैक्षणिक साहित्य या गोष्टी गावाकडे जास्त प्रमाणात चालू शकतात. 

कृषी सेवा केंद्र 

वर्षभर शेतकर्‍यांना खते आणि कीटकनाशकांची गरज असते. त्याचबरोबर पेरणीच्या वेळी बियाणांची गरज असते. पण ही सुविधा प्रत्येक गावात उपलब्ध असेलच असे नाही. तुम्हाला जर व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही तुमच्या गावात खत आणि बियाणांचे शॉप ओपन करू शकता. यासाठी सरकारकडून अनुदानही दिले जाते. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी प्राथमिक भांडवल 5 लाखांच्यावर लागेल. 

शहरात शेतमालाची विक्री 

अनेकदा बाजारात शेतमालाला चांगला भाव मिळत नाही. अशा परिस्थितीत तुम्ही शेतकऱ्यांकडून माल विकत घेऊन स्वतः मोठ्या मार्केटला जाऊन तुमचा माल विकू शकता. किंवा शहरात हातगाडीने सुद्धा तुम्ही डायरेक्ट ग्राहकाला विक्री करू शकता. या व्यवसायाच्या सुरवातीला मेहनत घ्यावी लागेल, एकदा ग्राहक बनले की, यातून तुम्ही चांगला नफा मिळवू शकता. तुम्ही शहरात बटाटे, कांद्यापासून ते शुद्ध तूप, ताक, दूध आणि भाजीपाला इत्यादींची विक्री करू शकता. 

सेंद्रिय शेती

कोरोना महामारीपासून लोकांमध्ये जागरूकता आली आहे. आता प्रत्येक जण सकस आहारावर लक्ष देत आहे. सेंद्रिय शेतीचे महत्व आणि डिमांड वाढीस लागली आहे. लोकांना सेंद्रिय फळे आणि भाज्या अधिक खायला आवडतात. यासाठी लोकं किमतीचा विचार करत नाही. सुरवातीला अर्धा एकरापासून सुरुवात केली तर मागणीनुसार उत्पादनात वाढ करू शकता. 

कुक्कुटपालन 

हा व्यवसाय दोन प्रकारे करता येऊ शकतो. पहिल्यांदा अंडी उत्पादनासाठी लेयर कुक्कुट पालन करावे लागेल, तर चिकन विकण्यासाठी बॉयलर चिकन आवश्यक असेल. यासाठी प्राथमिक ज्ञान असणे आवश्यक आहे. कोंबड्यावर लवकर रोग पसरतो त्यामुळे त्यांची काळजी घेणे अत्यंत महत्वाचे आहे. यासाठी लागणारी जागा शेतात योग्य ठरेल. यासाठी सुरवातीला 1 ते 2 लाखांपर्यंत खर्च येतो.

दूध डेअरी 

ग्रामीण भागात अनेकांकडे गाई, म्हशी असतात. शेतीशी जुळले असल्याने त्यांना यात रस असतो. काही वेळा त्यापासून मिळणारे दूध, तूप,दही हे गावातच विकल्या जाते, पण काही वेळा पुरेसे ग्राहक न मिळाल्याने ते खराब सुद्धा होते. अनेक लोकं शहरातील दूध डेअरीमध्ये दूध विकतात पण त्यात प्रवास खर्च लागत असल्याने ते परवडत नाही. त्यामुळे तुम्ही गावातच दूध डेअरी ओपन करून स्वतःचा आणि दूध विक्रेत्यानचा फायदा करून घेऊ शकता. यासाठी तुम्हाला फ्रीज आणि इतर काही वस्तु घेण्यासाठी 1 ते 1.5 लाख रुपये भांडवल आवश्यक असेल.