घराच्या लाईटबिलाने परेशान असाल, त्यासाठी एखादा परवडणारा उपाय शोधत असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी एक खास बातमी घेऊन आलो आहोत. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत सोलार जनरेटर विषयी. होय तुम्ही सगळ्यांनी सोलर पॅनल विषयी ऐकलं असेल मात्र घरगुती वापरासाठी सौरऊर्जेवर चालणारा जनरेटर सध्या ट्रेंडमध्ये आहे, त्याबद्दल देखील आपण जाणून घेऊयात.
काय आहे सोलार जनरेटर?
सोलार जनरेटर हे सोलार पॅनलसारखेच काम करणारे एक उपकरण आहे. परंतु सोलार पॅनल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेता येत नाही. परंतु हे सोलार जनरेटर तुम्हांला वाटेल तेथे घेऊन जाता येणार आहे.
या सोलार जनरेटरवर तुम्हांला घरातील फॅन, लाईट, लॅपटॉप, मिक्सर चालवता येणार आहे. सौर ऊर्जेवर ही उपकरणे चालवता येत असल्याने तुम्हांला तुमचे लाईटबिल वाचवता येणार आहे. साधारणतः जनरेटर म्हटलं तर पेट्रोल-डीझेल जनरेटर आपल्या डोळ्यासमोर येते, मात्र आता सोलर जनरेटरच्या माध्यमातून सौर ऊर्जेवर तुम्ही वीजनिर्मिती करू शकता.
प्रवासात देखील वापरता येणार
तुम्ही जर कुठे ट्रेकिंगला, कॅम्पिंगला जायचा प्लॅन करत असाल आणि सोबत इलेक्ट्रिक शेगडी, ट्युबलाईट घेऊन जायचा विचार करत असाल तर तेही आता शक्य आहे. कारण हा पोर्टेबल जनरेटर तुम्ही कुठेही घेऊन जाऊ शकता.
Portable Solar Generator Model S150 is a comprehensive power back up system. With 4 USB output, you can easily power up phones, tablets, laptops, or any other small devices while enjoying your outdoor trip. Buy one today, visit https://t.co/Y1AT4S7vc3
— Sarrvad (@sarrvad) April 6, 2023
.
.
.#sarrvadsolar #solar pic.twitter.com/ycawaf0V2z
SARRVAD या कंपनीचा 150 वॉट्स आणि 3.7 वोल्टचा सोलार जनरेटर 19,000 हजारांत तुम्हांला अमेझॉन वरून खरेदी करता येणार आहे. यात तुम्हांला 2 DC पोर्टस आणि 3 USB पोर्टस मिळणार आहे. याला सोलर पॅनल लावलेला असून पूर्ण चार्जिंग होण्यासाठी याला 6-7 तास लागतील. कंपनी या जनरेटरसाठी 1 वर्षांची वॉरंटी देखील देत आहे.
दीर्घकालीन बचतीचा पर्याय
खरे तर सुरुवातीला सोलार जनरेटरची किंमत ही महाग वाटू शकते. मात्र दीर्घकालीन विचार केल्यास याचा वापर फायदेशीर ठरू शकतो. चला तर जाणून घेऊयात याची खास वैशिष्ट्ये.
सौर ऊर्जा ही अपारंपरिक ऊर्जा स्रोत म्हणून मुबलक आणि मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. एकदा की तुम्ही सौर जनरेटर बसवले, की त्यांनतर विनामुल्य तुम्ही वीज निर्मिती करू शकता.
सोलर जनरेटरला सामान्यत: कमी देखभालीची आवश्यकता असते. वेळोवेळी सोलर पॅनेलवरची धूळ साफ करणे खरे तर आवश्यक आहे. त्यासाठी अधिकचा काही खर्च करण्याची आवश्यकता नाही. सौर पॅनेलचे आयुष्यमान साधारणपणे 25-30 वर्षे असते, तर त्यात वापरली जाणारी लिथियम बॅटरीचे आयुष्यमान 5-15 वर्षे इतके असते. तसेच पर्यावरणीय दृष्टीकोनातून विचार केल्यास यामुळे प्रदूषण देखील होत नाही.