Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

SmartWatch : स्मार्टवॉच वापरत आहात? तर हे जरूर वाचा

SmartWatch

आज जवळपास प्रत्येकाला स्मार्टवॉच खरेदी (buying smartwatch) करायचे आहे. पण तुम्हाला माहीत आहे का स्मार्टवॉचचा वापर धोकादायक ठरू शकतो. कसा? ते आज पाहूया.

आजकाल प्रत्येकजण स्मार्ट घड्याळ (Smartwatch) वापरतो. यावरून फोन कॉल रिसिव्ह करण्यापासून ते नाकारण्यापर्यंत अनेक प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत. पण तुम्हाला माहीत आहे का की तुमचे स्मार्ट घड्याळ तुमच्यासाठी धोक्याचे ठरू शकते. वास्तविक, तुमच्या आरोग्यासह सर्व प्रकारचा डेटा, संदेश स्मार्ट घड्याळात साठवले जातात. तसेच काही स्मार्ट घड्याळ कंपन्या (smartwatch company) अॅपद्वारे तुमचा डेटा संग्रहित करतात. अशा परिस्थितीत स्मार्टवॉच तुमच्या स्मार्ट फोनपेक्षाही धोकादायक ठरू शकते. याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

डेटा कलेक्शन

स्मार्टवॉच कंपन्या सतत तुमच्या आरोग्यावर लक्ष ठेवतात. यामध्ये हार्ट रेट, रक्तदाबापासून ते चरबी, पाणी, रक्तातील ऑक्सिजनचा डेटा कंपनीच्या सर्व्हरवर साठवला जातो, तो चोरीला जाण्याची शक्यता अधिक असते. मग या डेटाच्या मदतीने फसवणुकीसारख्या घटना घडवून आणल्या जाऊ शकतात.

फोनवरून घड्याळात डेटा ट्रान्सफर

वाय-फाय आणि ब्लूटूथ सुरक्षा गेल्या काही वर्षांत चांगली झाली आहे. तरीही ते हॅक केले जाऊ शकते. अशा स्थितीत सेक्युरिटी ब्रेक होऊ शकते. अशा परिस्थितीत हॅकर्ससाठी फोनऐवजी स्मार्टवॉचमधून डेटा चोरणे सोपे झाले आहे.

ट्रॅकिंग

स्मार्ट वॉचमध्ये जीपीएस डेटा वापरला जातो, जेणेकरून वापरकर्त्यांना ट्रॅक करता येईल, जसे की, तुमचे सध्याचे स्थान काय आहे? असे स्मार्टवॉच वापरणे धोकादायक ठरू शकते.

  • स्मार्टवॉच सुरक्षित कसे बनवायचे?
  • सार्वजनिक वाय-फाय हॅकिंगचे कारण बनू शकते.
  • स्मार्टवॉचचे ऑपरेटिंग सॉफ्टवेअर अपडेट ठेवा.
  • वायरलेस राउटर अधिक सुरक्षित करा.
  • तुमचा फोन आणि संगणक अपडेटेड ठेवा.
  • स्मार्टवॉचचा डेटा नियमितपणे हटवा.
  • फिटनेस ट्रॅकर युजर डेटाला लोकल स्टोर करा.