Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Smartphone : Oppo Reno 8T 5G स्मार्टफोन झाला लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये

Smartphone

Image Source : www.fonearena.com

ओप्पोचा स्मार्टफोन (Oppo Smartphone) खरेदी करणाऱ्यांसाठी कंपनीने नवीन 5G फोन Oppo Reno 8T 5G देशात लॉन्च केला आहे. या फोनची वैशिष्ट्ये आणि किंमत जाणून घेऊया.

ओप्पोने (Oppo) आपला नवीन 5G फोन Oppo Reno 8T 5G देशात लॉन्च केला आहे. आज लॉन्च केलेला, कंपनीचा हा नवीन Oppo Reno 8T 5G हँडसेट 10 फेब्रुवारी 2023 पासून खरेदीसाठी उपलब्ध असेल. दमदार कॅमेरे आणि कर्व्ह्ड डिस्प्लेसह सुसज्ज, हा नवीन फोन फ्लिपकार्ट, ओप्पोची अधिकृत वेबसाइट आणि अधिकृत रिटेल स्टोअर्सवरून दिलेल्या तारखेनंतर खरेदी करू शकाल. Oppo Reno 8T 5G फोन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध आहे.

फोन खरेदीसाठी मिळतेय सूट

खरेदीदार कमी किमतीत नवीन फोन खरेदी करू शकतात. फ्लिपकार्ट (Flipkart)च्या एक्सचेंज ऑफर अंतर्गत, Oppo ग्राहकांना या नवीन फोनच्या खरेदीवर 20,000 रुपयांपर्यंत सूट देत आहे. याशिवाय, काही निवडक बँका Oppo Reno 8T 5G हँडसेटच्या खरेदीवर 5 टक्के अतिरिक्त कॅशबॅक देखील देत आहेत.

जाणून घ्या वैशिष्ट्ये

नवीन Oppo Reno 8T 5G फोनचे वजन 171 ग्रॅम आहे. हायपरबॉलिक डिझाइनसह सुसज्ज हा हँडसेट 7.7 मिमी पातळ आहे. या लेटेस्ट फोनचा डिस्प्ले आकार 6.7 इंच आहे, रिफ्रेश रेट 120Hz आहे.  ओप्पोने सांगितले की नवीन फोनमध्ये AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. त्यामुळे अॅक्टिव्ह स्क्रीनवर व्हिज्युअल्स खूप चांगले पहायला मिळतात. चांगल्या परफॉर्मन्ससाठी फोनमध्ये Snapdragon 696 5G प्रोसेसर देण्यात आला आहे. ओप्पोचा हा नवीन स्मार्टफोन 8GB रॅम आणि 128GB इंटर्नल स्टोरेजने सुसज्ज आहे. मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने स्टोरेज क्षमता 1TB पर्यंत वाढवता येते. व्हर्च्युअल रॅमच्या मदतीने रॅम क्षमता 8GB पर्यंत वाढवता येते.

कॅमेरा

फोटोग्राफीच्या बाबतीत Oppo Reno 8T 5G फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये 108MP प्रायमरी कॅमेरा, 2MP डेप्श कॅमेरा आणि 2MP झूम सेन्सरचा समावेश आहे. बॅक कॅमेऱ्याची मॅग्निफाईंग कॅपॅसिटी 40x (x म्हणजे गुणे) आहे. Oppo Reno 8T 5G च्या कॅमेऱ्यात अल्ट्रा-हाय रिझोल्युशन आणि नॉनपिक्सेल प्लस तंत्रज्ञान वापरले गेले आहे, जे जास्तीत जास्त लाईट अँब्जॉर्ब करुन घेण्यास सक्षम करते, असे कंपनीने म्हटले आहे.  सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 32MP फ्रंट कॅमेरा आहे. यासोबतच सेल्फी एचडीआर, बोकेह फ्लेअर पोर्ट्रेट आणि ड्युयल न्यू व्हिडीओ अशी सर्व वैशिष्ट्ये जोडण्यात आली आहेत. Oppo Reno 8T 5G हँडसेटमध्ये 4,800mAh बॅटरी आहे. चार्जिंगसाठी, 67W SUPERVOOC फास्ट चार्जिंगसाठी सपोर्ट आहे. Oppo Reno 8T 5G फोनची भारतात किंमत 29,999 रुपये आहे.