Bangalores Sid Production Company: कितीही कठीण परिस्थिती समोर उभी राहीली, तरी हार न मानणारा बेंगळुरुचा सिड नायडू. केवळ दहावी पर्यंतचे शिक्षण घेतलेल्या सिडने परिस्थिती बिकट असतांना आपल्या कुटूंबासाठी वर्तमानपत्र विकले. कॉफी हाऊसमध्ये वेटर म्हणून काम केले. मॉलमध्ये सेल्स मॅनची नोकरी केली. आज तो स्वतःची फॅशन प्रोडक्शन कंपनी चालवतो आहे.
Table of contents [Show]
4 कोटींच्या जवळ उलाढाल
अत्यंत कठीण परिस्थितीमधून उभा राहीलेला सिड नायडू आज कोणत्याही परिचयाचा मोहताज नाही. सिड प्रॉडक्शनचे संस्थापक सिड नायडू यांने अडचणींचा सामना करताना हार मानली नाही. बंगळुरूमध्ये राहणारा सिड नायडू सिड प्रोडक्शनच्या नावाने स्वतःचे जाहिरात आणि मीडिया प्रोडक्शन हाऊस चालवतो. त्याचे प्रॉडक्शन हाऊस आज मोठ्या ब्रँडसाठी शूटिंग आणि मार्केटिंगचे कार्य करत आहे. त्याचा बिझनेस करोडोंचा (Fashion Industry) आहे. अलीकडेच त्याच्या व्यवसायाची उलाढाल 4 कोटींच्या जवळ पोहोचली आहे. करोडोंचा व्यवसाय करणारा सिड आज फक्त दहावी पास आहे.
संघर्षमय प्रवास
2007 साली वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी आईच्या खांद्यावर आली. आई दर महिन्याला फक्त 1500 रुपये मिळवायची. कुटुंब आणि आईला हातभार लावण्यासाठी सिडने वर्तमानपत्र विकायला सुरुवात केली. शाळेत जाण्यापूर्वी तो घरोघरी वर्तमानपत्रे वाटायचा. या कामातून तो अडीचशे रुपये कमावायचा. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अशी नव्हती की, तो कॉलेजमध्ये जाऊन शिक्षण पूर्ण करू शकेल. म्हणूनच दहावीनंतर सिडला ऑफिसमध्ये ऑफिस बॉय म्हणून नोकरी मिळाली. त्याला 3000 रुपये पगार मिळत असे, हे पैसे तो आईला पाठवत असे.
फॅशन आणि इव्हेंट मॅनेजमेंट क्षेत्रात प्रवेश
कष्ट आणि मेहनत करण्यास तत्पर असलेल्या सिडला कसे तरी आपल्या कुटुंबाला गरिबीतून बाहेर काढायचे होते. त्याचे मन नेहमी फॅशनशी संबंधित कामात गुंतलेले असायचे. त्याने ऑफिस बॉय म्हणून नोकरी सोडली आणि कॉफी हाऊसमध्ये वेटर म्हणून रुजू झाला. यानंतर त्याने बंगळुरूमधील एका मॉलमध्ये रिटेल स्टोअरमध्ये नोकरी सुरू केली. मॉलमध्ये काम करत असताना त्यांनी फॅशन, इव्हेंट्सबद्दलचे ज्ञान वाढवले. त्याच्याबद्दल माहिती गोळा केली. या नोकरीदरम्यान त्यांची फॅशन आणि इव्हेंट मॅनेजमेंटशी संबंधित लोकांशी ओळख होऊ लागली. हळुहळू सिडलाही फॅशनची दुनिया समजू लागली. सिडने या क्षेत्रात पुढे जाण्याचा निर्णय घेतला.
सिड प्रॉडक्शन हाऊस
काही काळानंतर, सिडला अॅड शूटसाठी ऑफर मिळाली, पण समस्या अशी होती की त्याची स्वतःची कंपनी नव्हती. कंपनी सुरू करण्यासाठी आणि पहिली असाइनमेंट पूर्ण करण्यासाठी त्याला 5 लाख रुपयांची गरज होती. सिडकडे फक्त २ लाख रुपये बचत होते. सिडने त्याचे मित्र आणि नातेवाईकांकडे कर्ज मागितले. रात्रंदिवस मेहनत करून सिडने आपला पहिला प्रोजेक्ट यशस्वी केला. भावासोबत मिळून त्यांनी प्रॉडक्शन हाऊस सुरू केले. 2017 मध्ये 'सिड प्रॉडक्शन' सुरू केले. मित्र आणि नातेवाईकांकडून घेतलेले हे कर्ज त्याने घेतलेले पहिले आणि शेवटचे कर्ज होते, असे सिड सांगतो.
प्रभावशाली कंपन्यांसोबत कार्य
सिडचा पहिला प्रोजेक्ट फॅशन ई-कॉमर्स कंपनी मिंत्रा साठी होता. हळुहळू त्याने अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, चुंबक, ग्लोबल देसी, यूएस पोलो, विवो, डाबर, फ्लाइंग मशीनसह विविध कंपन्यांसाठी फॅशन शूट, स्टोअर लॉन्च आणि प्रभावशाली कार्यक्रम करण्यास सुरुवात केली. याशिवाय त्यांची बनाना लीफ ही वेडिंग प्लॅनर कंपनी देखील आहे, जी विवाहसोहळा आयोजित करते. सिड प्रोडक्शनची उलाढाल चार कोटींच्या पुढे गेली आहे. आज सिड हे फॅशन इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव आहे.