Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Myntra वरील शॉपिंग महागणार; 1,000 रुपयांच्या ऑर्डरवर द्यावे लागणार 10 रुपयांचे सुविधा शुल्क!

Myntra Convenience Fee

Myntra New Policy: देशातील दुसरी सर्वात मोठी ई-कॉमर्स वेबसाईट मिंत्राने (Myntra) नवीन पॉलिसी जाहीर केली आहे, ज्याचा फटका ग्राहकांना बसणार आहे. या पॉलिसी अंतर्गत 1000 रुपयांच्या खरेदीवर यापुढे ग्राहकांना 10 रुपये अधिक सुविधा शुल्क भरावे लागणार आहेत.

देशातील दुसरी सर्वात मोठी ई-कॉमर्स वेबसाईट मिंत्रा (Myntra) वर कमी पैशात उत्तम खरेदी करता येते. त्यामुळेच अनेकजण या वेबसाईटवर शॉपिंग करताना पाहायला मिळतात. मात्र यापुढे Myntra वर शॉपिंग करणे महाग होणार आहे. Myntra ने त्यासंदर्भात नवीन पॉलिसी जाहीर केली आहे, ज्याचा फटका ग्राहकांना बसणार आहे. या पॉलिसी अंतर्गत 1000 रुपयांच्या खरेदीवर ग्राहकांना 10 रुपये सुविधा शुल्क भरावे  लागणार आहेत.

गेल्या दोन वर्षापासून Myntra वर 1000 रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या ऑर्डरवर 99 रुपये चार्ज स्वीकारत आहेत. ही फी Myntra च्या मेंबरशिप प्रोग्राम मिंत्रा इनसाईडरमध्ये (Myntra Insider) सामील असणाऱ्या ग्राहकांना देखील भरावी लागणार आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार Myntra वरून दररोज 5 लाख ऑर्डर केले जातात आणि त्याची सरासरी रक्कम 1400 रुपये असते.  सुविधा शुल्काच्या माध्यमातून कंपनी नफा कमावण्याचा उद्देश बाळगून आहे. मात्र याचा कंपनीला फटका बसेल की फायदा होईल, जाणून घेऊयात.

Myntra ने सुविधा शुल्क आकारण्याचे कारण काय?

Myntra च्या वेबसाईटवरील एका पॉप-अप मधील माहितीनुसार, Myntra तांत्रिक कौशल्य, वेगवेगळ्या ब्रँड्सला एकाच छताखाली आणण्यासाठी आणि विक्री नंतरच्या मदतीसाठी या शुल्काचा वापर करणार आहे. Myntra च्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार कंपनी ग्राहकांकडून नाममात्र शुल्क आकारणार आहे. त्या शुल्काच्या बदल्यात ग्राहकांना सर्वोत्तम सेवा आणि ऑफर्स कंपनीकडून देण्यात येणार आहेत.

सुविधा शुल्काचा काय परिणाम होईल?

सध्या Myntra चे 5 कोटी महिन्याचे ऍक्टिव्ह युजर्स आहेत. ई-कॉमर्स वेबसाईट विश्लेषक सतीश मीना (e-commerce website analyst Satish Meena) यांनी दिलेल्या माहितीनुसार, Myntra आकारणाऱ्या सुविधा शुल्काचा व्यवसायावर कोणताही विशेष परिणाम होणार नाही. Myntra कडे खूप सारे लॉयल ग्राहक आहेत, तसेच कंपनीचा बाजारपेठेतील शेअर देखील खूप मोठा आहे.त्यामुळे केवळ 10 रुपयांच्या सुविधा शुल्काचा परिणाम ग्राहकांवर होणार नाही. या निर्णयाकडे ग्राहक कानाडोळा करतील.

प्रोडक्ट रिटर्न पॉलिसीबाबत कंपनीचा विचार काय?

ग्राहक Myntra वरून खरेदी केलेल्या सामानाला रिटर्न देखील करू शकतात. मात्र यासंदर्भात कंपनीने काही नियम आखून दिले आहेत. कंपनीने ठरवून दिलेल्या रिटर्न मर्यादेपेक्षा ग्राहकांनी जास्त वेळा उत्पादन रिटर्न केले, तर ग्राहकांना 149 रुपये शुल्क भरावे लागणार आहेत किंवा त्यांचे अकाउंट बंद करण्यात येणार आहे. हे शुल्क भरल्याशिवाय ग्राहक उत्पादन रिटर्न करू शकत नाहीत.कंपनी याबत ब्रँडसोबत चर्चा करत आहे. यापुढे एक्सचेंज ऑफर अंतर्गत ग्राहकांना Myntra च्या वेबसाईटवरील उत्पादनेच एक्सचेंज करता येतील.

Source: hindi.moneycontrol.com