एखाद्या नव्या शहरात बस्तान बसवणे म्हणजे सध्याच्या परिस्थितीत खूप अवघड आहे. कारण, घरभाड्याने मिळणे देखील कठीण आहे. जर मिळालेच, त्याचे भाडे जास्त असते. याशिवाय बऱ्याच गोष्टी अशा असतात, ज्यात अधिक पैसा खर्च होतो. यामध्ये, घर, फूड, ट्रान्सपोर्ट आणि इतर महत्वाच्या गोष्टी ज्या लागणारच असतात.
त्यामुळे शिफ्ट करण्याआधी आपल्याजवळ तसा प्लॅन असणे आवश्यक असते. तसेच, तुम्ही ज्या शहरात जाताय कदाचित तिथे घरभाडे स्वस्त किंवा महागही राहू शकते. त्यामुळे थोडा रिसर्च करणेही गरजेचे आहे. या सर्व गोष्टी केल्यास खर्चाचा भार कमी होऊ शकतो.
Table of contents [Show]
शिफ्टींगचा बजेट बनवा
जेव्हा आपण एखाद्या नवीन शहरात शिफ्ट होतो, तेव्हा कोणताही बजेट न ठरवता भरमसाट खर्च करतो. त्यामुळे तुम्हाला पैशांची टंचाई निर्माण होऊ शकते. म्हणून तुम्ही जर व्यवस्थित बजेट बनवल्यास तुम्हाला आर्थिक गोष्टी बरोबर हाताळता येऊ शकते. यामुळे तुमच्या खर्चावर नियंत्रण राहू शकते.
तसेच, तुम्ही या बजेटमध्ये घर, फूड, ट्रान्सपोर्ट आणि इतर महत्वाच्या गोष्टीं सामील करु शकता. त्यामुळे तुम्हाला अनपेक्षित खर्च किंवा इमर्जन्सीवर मात करता येऊ शकते. तसेच, बाहेर शिफ्ट करण्याआधी तुमच्याजवळ बजेट असणे आवश्यक आहे.
बचत असणे आहे गरजेचे
कोणीही दुसऱ्या शहरात शिफ्ट व्हायचं म्हटल्यावर काही तरी मोठ करण्यासाठी किंवा पैसे कमवण्यासाठीच हा निर्णय घेतो. पण, नवीन ठिकाणी जास्त खर्च होऊ शकतो. त्यामुळे काही पैसे आधीच बाजूला काढून ठेवणे महत्वाचे ठरते. म्हणजेच ते पैसे बचत म्हणून तुमच्याजवळ असायलाच पाहिजे. हे पैसे तुम्हाला आर्थिक इमर्जन्सीत कामी येऊ शकेल. तसेच, तुमचे काही गुंतवणुकीचे उद्दिष्टे असल्यास तिथे हा पैसा उपयोगी येऊ शकतो.
बजेटमध्ये घर पाहा
सध्या घरभाड्यांचे दर सर्वच ठिकाणी वाढलेले पाहायला मिळत आहे. त्यामुळे या गोष्टीवर तुमचा सर्वाधिक खर्च होणार आहे. मात्र, यावर मात करण्यासाठी तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये मिळेल, असेच घर शाधावे लागणार आहे. यासाठी तुम्ही शेअरिंगमध्ये किंवा अपार्टमेंटमध्ये घर पाहू शकता.
तसेच, तुम्ही एखादा रुममेट शोधला तर तुमचा खर्च अजून कमी होऊ शकतो. त्यादृष्टीने आज बाजारात बऱ्याच आॅनलाईन वेबसाईट आहेत. ज्या तुम्हाला कमी बजेटमध्ये घर मिळायला मदत करु शकतात. त्यामुळे तुम्ही या गोष्टीचाही घर घेताना विचार करु शकता.
पब्लिक ट्रान्सपोर्टचा ठेवा पर्याय
ट्रान्सपोर्ट म्हणजेच वाहतूक यासाठी देखील तुमचा बराच खर्च होऊ शकतो. त्यामुळे शहरातील पब्लिक ट्रान्सपोर्टचा रुट पाहून ठेवणे आवश्यक ठरते. नाहीतर तुम्ही कॅब किंवा अन्य गोष्टींचा वापर केल्यास, तुमच्या खर्चात भर होऊ शकते. जसे की तुम्ही तुमची स्वत:ची गाडी वापरायचा विचार केला तरी ते तुम्हाला खर्चिक होऊ शकते. कारण, अजून शहरातल्या बऱ्याच गोष्टींची तुम्हाला माहिती नाही आहे. त्यामुळे बेस्ट पर्याय पब्लिक ट्रान्सपोर्टचा तुम्ही निवडू शकता.
घरीच बनवा जेवण
शिफ्टींग केल्यावर जेवणाचा मोठा प्रश्न असतो. कारण, काम करुन स्वत:साठी जेवण बनवणे कठीण होऊ शकते. त्यामुळे आपण सोपा पर्याय निवडतो, तो म्हणजे बाहेर जेवण करणे. पण, तो आपल्याला जास्त खर्चात नेऊ शकतो. कारण, आपल्याला रोजच जेवण लागणार आहे.
त्यामुळे यावर पर्याय म्हणून तुमच्याने शक्य होत असल्यास तुम्ही स्वत: स्वंयपाक बनवू शकता. नाहीतर कुक लावू शकता. पण, त्यासाठी तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागू शकतात. त्यामुळे तुम्हाला जर पैसे वाचवायचे असल्यास, स्वत: ती जबाबदारी घेणं योग्य ठरु शकतं.
शिफ्टींग करताना या बेसिक गोष्टींवर आपण खर्च कमी करु शकतो. मात्र, अजून ही बऱ्याच गोष्टी आहेत त्यावर खर्च होऊ शकतो. त्यामुळे शिफ्ट करताना काही वस्तू किंवा ग्रोसरी इत्यादी साहित्य तुम्ही घरुनही घेऊ शकता. त्यामुळे अजून तुमच्या खर्चात बचत व्हायला मदत होऊ शकते.