आज, एसजीएक्स (SGX) निफ्टीचा कल बाजाराची सकारात्मक सुरुवात दर्शवत आहे. सध्या, हा निर्देशांक 100 हून अधिक अंकांची वाढ दर्शवत आहे. याआधी काल देशांतर्गत शेअर बाजार लाल चिन्हात बंद झाला होता. पण, काल अमेरिकन शेअर बाजार आणि युरोपियन शेअर बाजार हिरव्या चिन्हात बंद होण्यात यशस्वी झाले. आज आशियाई बाजारांमध्येही तेजी पाहायला मिळत आहे. आज देशांतर्गत बाजारात तेजी पहायला मिळणार की घसरण? ते पाहूया.
Table of contents [Show]
विदेशी बाजारातील सिग्नल
या महिन्यात व्याजदरात आणखी वाढ होण्याची भीती असताना गुरुवारी अमेरिकन शेअर बाजारात तेजी दिसून आली. डाऊ जोन्स 1.05% वाढून 33,003 वर बंद झाला, तर एस अँड पी (S&P) देखील 0.76% वाढला, त्यानंतर निर्देशांक 3,981 वर बंद झाला. टेक शेअर्स म्हणजेच नॅस्डॅक (Nasdaq) च्या निर्देशांकाबद्दल बोलायचे झाले तर काल 0.73% वाढ होऊन 11,463 वर बंद झाला. युरोपीय बाजारही वाढीसह बंद झाले. खरं तर, युरो झोनमध्ये महागाई 8.5% च्या जवळ आली आहे. आशियाई बाजारातही आज तेजी पाहायला मिळत आहे. पण, दक्षिण कोरियाच्या मुख्य निर्देशांक कोस्पीमध्ये थोडीशी घसरण झाली.
FIIs-DII ची आकडेवारी
विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी काल साप्ताहिक कालबाह्यतेच्या दिवशी रोख बाजारात 12,771 कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले. तर कॅश मार्केटमध्येच देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदारांनी एकूण 2,129 कोटी रुपयांचे शेअर्स विकले. मार्चमध्ये FII ने एकूण 12,346 कोटी रुपयांची आणि DII ने एकूण 3,627 कोटी रुपयांची खरेदी केली.
काल शेअर मार्केट बंद कसा होता?
गुरुवारी शेअर बाजारात घसरण झाल्याचे पहायला मिळाले. सेन्सेक्समध्ये 500 तर निफ्टीमध्ये 129 अंकांची घसरण झाली आहे.आज 2 मार्च रोजी सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही बेंचमार्क निर्देशांकांमध्ये तोटा झाला आहे. आजच्या ट्रेडिंग सत्राच्या शेवटी 30 शेअर्सचा प्रमुख बेंचमार्क निर्देशांक BSE सेन्सेक्स 501.73 अंकांच्या घसरणीसह 58,909.35 वर बंद झाला. 0.84 टक्के इतकी यात घट झाली आहे. तसेच, नॅशनल स्टॉक एक्सचेंज अर्थात एनएसई (NSE – National Stock Exchange) चा निफ्टी 129.00 अंकांच्या म्हणजेच 0.74% च्या घसरणीसह 17,321.90 वर बंद झाला आहे.
आज ‘या’ शेअर्सच्या कामगिरीवर असेल लक्ष
अदानी एंटरप्रायझेस, अदानी पोर्ट्स आणि एसईझेड, अदानी ट्रान्समिशन, टिटागड वॅगन्स, महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्शियल सर्व्हिसेस, एचपीसीएल, नाटको फार्मा (Natco Pharma), एमओआयएल (MOIL), हॅप्पीएस्ट माईंड्स टेक्नॉलॉजीस (Happiest Minds Technologies) या शेअर्सच्या कामगिरीवर लक्ष असले.
Source: https://bit.ly/3ZCdunK