Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Market Closing Bell: सकाळच्या घसरणीनंतर शेअर बाजार पुन्हा सुस्थितीत; बँकिंग क्षेत्राची घौडदौड

Market Closing Bell

सकाळच्या सत्रात शेअर बाजारात पडझड पाहायला मिळाली. मात्र, दुपारनंतर बाजार पुन्हा हिरव्या रंगात ट्रेड करत होता. बंद होताना निफ्टी आणि सेन्सेक्स निर्देशांक वर गेले. दरम्यान, बँकिंग क्षेत्रातील कंपन्यांचे भाव वाढले असून बँक निफ्टीने 574.60 अंकांची वाढ नोंदवली.

Share Market Closing Bell: सकाळच्या सत्रात बाजार घसरल्यानंतर दुपारनंतर पुन्हा भांडवली बाजाराने उभारी घेतली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 38 अंकांनी वधारून 60,431 वर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 15 अंकांनी वधारून 17,827.40 वर बंद झाला. आज (गुरुवार) बँकिंग क्षेत्राची घौडदौड पाहायला मिळाली. तर माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर्स खाली आले. काल टीसीएसने तिमाही निकाल जाहीर केल्यानंतर बाजार वरती गेला होता. मात्र, आज पुन्हा टीसीएसचे शेअर्स खाली आले.

बँक निफ्टी 574.60 अंकांनी वाढून 42,132.55 वर पोहचला. सकाळच्या सत्रात बाजार लाल रंगात ट्रेड करत होता. मात्र, बाजार दुपार नंतर पुन्हा हिरव्या रंगात ट्रेड सुरू झाला.

52 आठवड्यात उच्चांकांवर गेलेले आणि खाली आलेले शेअर्स

एनएसई निफ्टीमधील 44 शेअर्स 52 आठवड्यांच्या उच्चांकावर पोहचले आहेत. यात चॉइस इंटरनॅशनल, अनुपम रसायन इंडिया, अपार इंडस्ट्रीज, डेटा पॅटर्न्स, गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स, हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन, इंडियामार्ट, जे. बी. केमिकल्स आणि फार्मास्युटिकल्स, मॅक्स हेल्थकेअर इन्स्टिट्यूट आणि झायडस लाइफसायन्स या कंपन्यांचे शेअर्स 52 आठवड्याच्या उच्चांकावर पोहचले आहेत.

तर 9 शेअर्स 52 आठवड्यात तळाला पोहचले आहेत. यात Lorenzini Apparels, PNB हाउसिंग फायनान्स, सिक्युअर क्लाउड टेक्नॉलॉजी, इस्टर्न सिल्क इंडस्ट्रीज, एसईपीसी ltd, सिया इंडस्ट्रीज, SVP ग्लोबल टेक्सटाइल आणि विकास लाइफ केअर या कंपन्यांचे शेअर्स 52 आठवड्यांत सर्वाधिक खाली आले आहेत. 

साखर कंपन्यांचे शेअर्स वधारले

मागील काही दिवसांपासून साखर आणि आणि इथेनॉल निर्मिती करणाऱ्या साखर कारखान्यांचे भाव वधारले आहेत. जागतिक स्तरावर साखरेचे भाव मागील 11 वर्षाच्या उच्चांकीवर पोहचले आहेत. तसेच इंधन म्हणून इथेनॉलची मागणीही वाढत आहे. मान्सून अपुरा होण्याची चिन्हे असल्याने साखरेचे भाव आणखी वाढू शकतात. या पाश्वभूमीवर साखर कारखान्यांना डिमांड आली आहे. शुगर स्टॉक्स मागील दोन आठवड्यांत 5 टक्क्यांनी वर गेले आहेत. साखर क्षेत्रातील मोठ्या उद्योगांच्या शेअर्सकडे गुंतवणूकदार आकर्षित होत आहेत. 

अमेरिकेतील महागाईच्या आकडेवारीवर लक्ष

अमेरिकेच्या फेडरल बँकेकडून महागाईची आकडेवारी चालू महिन्यात सादर केली जाणार आहे. अमेरिकेत भाववाढ होत असल्याने आकडेवारीतून समोर आल्यानंतर फेडरल बँक दरवाढ करू शकते. त्याचा नकारात्मक परिणाम जगभरातील भांडवली बाजारावर दिसू शकतो. भारतीय रिझर्व्ह बँकेने नुकतेच दरवाढीला लगाम लावला. अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी दरवाढ हा एकमेव पर्याय नसल्याचे लक्षात आल्याने दरवाढ रोखली. मागील सहा सत्रात रेपो रेट वाढवल्यानंतरही भारतामध्ये महागाई कमी झाली नाही. ही एक चिंतेची बाब आहे. एप्रिलमध्ये सर्व कॉर्पोरेट कंपन्यांचे तिमाही निकाल जाहीर होत आहेत. बड्या कंपन्यांनी नफा नोंदवल्यानंतर बाजारात आणखी तेजी येईल.