Shakuntala Express : भारतातली चौथ्या क्रमांकाची रेल्वे लाईन म्हणून भारतीय रेल्वेची ओळख आहे. आज रेल्वे वाहतुक क्षेत्रात अनेक नाविन्यापूर्ण बदल होताना आपण पाहत आहोत. आधुनिकतेशी समरस अशा एक्स्प्रेसेस, रेल्वे ट्रॅक वाढवणे, रेल्वे स्थानकांवर विविध सोई-सुविधा उपलब्ध करून देणे, व्यापारासाठी अधिकाधिक भौगोलिक स्थानं रेल्वेशी जोडणे अशा विविध प्रकल्पांच्या माध्यमातून रेल्वे सेवेचं जाळं विस्तारलं जातं आहे. या सर्व प्रकल्पांपैकी भारतीय रेल्वेने आणखी एक काम हाती घेतलं आहे ते म्हणजे शंकुतला रेल्वे रूळाच्या नूतनीकरणाचे काम.
प्रकल्पांचे नाव ऐकुन तुम्हाला प्रश्न पडला असेल की रेल्वे रूळाचं सुद्धा विशेष नामकरण. तर हो. यवतमाळ ते अमरावती इथल्या अचलपूरपर्यंत धावणाऱ्या शंकुतला एक्स्प्रेस ज्या रूळावरून धावते त्या रेल्वे रूळाला शंकुतला रेल्वे रूळ म्हणून ओळखले जाते. या रेल्वे रूळासाठी भारत सरकारला कोट्यावधीचा कर भरावा लागतो. आता हा फरक का? यामागे काय कारण आहे ते आता आपण जाणुन घेऊयात.
या रेल्वेसेवेसाठी कर का द्यावा लागतो?
भारताच्या स्वातंत्र्यानंतर 1952 साली भारतातील संपूर्ण रेल्वे सेवा ही ब्रिटिशांच्या हातून केंद्र सरकारकडे आली. मात्र, सरकारकडून या खासगी रेल्वे लाईन वर दुर्लक्ष केलं गेलं. त्यामुळे कालांतराने सरकाला या रेल्वेसेवेच्या वापरासाठी किलिक निक्सिन कंपनीसोबत करार करावा लागला. त्याअंतर्गत भारत सरकारला या कंपनीला 1 कोटी 20 लाख रूपयाचा कर भरावा लागत आहे.
शंकुतला रेल्वे लाईनची निर्मिती
ब्रिटिशांनी यवतमाळ ते अमरावती या भागातील कापसाचं दळण-वळण करण्यासाठी एका खासगी कंपनीच्या साहय्याने या रेल्वेलाईनची निर्मिती केलेली. या कंपनीचं नाव होतं किलिक निक्सिन. या खासगी कंपनीमार्फेत ही रेल्वेलाईन चालवली जात असे. या रेल्वेतून सुरूवातीला केवळ कापसाची वाहतुक होत असे. मात्र कालांतराने ही गाडी प्रवासी वाहतुकीसाठी वापरली जाऊ लागली.
किलिक निक्सन कंपनीने 1996 या एका वर्षातच रेल्वे लाईनचं काम सुरू करून पूर्ण केलं. या रेल्वे लाईनवर एकच रूळ असल्याने एका वेळी एकच रेल्वे धावू शकते. त्यानुसार दिवसाला शंकुतला ही एकमेव गाडी या रूळावरून धावत असल्याने आपसूकच या रेल्वे रूळालाच शंकुतला असं विशेष नाव पडलं.
शंकुतला रेल्वे रूळाची परिस्थिती
शंकुतला रेल्वे रूळ अरूंद व एकच रूळ असल्याने पूर्ण सक्षमतेने या रूळाचा वापर करण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे या मार्गावरील रेल्वे रूळाच्या सुधारणेचा निर्णय भारत सरकारने घेतला आहे. यासाठी 2016 साली तत्कालिन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी 1500 कोटी रूपयाच्या निधीची तरतुद केली आहे. या कामासाठी 2020 पासून ही शंकुतला एक्स्प्रेस बंद करण्यात आली आहे.