Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Suhana Khan: शाहरूख खानची मुलगी सुहानाने अलिबागमध्ये खरेदी केली 13 कोटींची प्रॉपर्टी

Suhana Khan buy Property at Alibaug

Suhana Khan: सुहाना खानने आपल्या पहिल्या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच आपल्या नावावर प्रॉपर्टी खरेदी केली आहे. अलिबागमध्ये विकत घेतलेल्या या प्रॉपर्टीची किंमत 12.91 कोटी रुपये आहे. तिने थल गावात 1.5 एकर जागा खरेदी केली आहे. या जागेत जमिनीबरोबरच 3 घरे देखील आहेत.

बॉलिवूडचा किंग खान शाहरूख खान यांची मुलगी सुहाना खान हिने नुकतीच रायगड जिल्ह्यामधील अलिबाग येथे तब्बल 13 कोटींची प्रॉपर्टी खरेदी केली. शाहरूख खानप्रमाणेच सुहानासुद्धा फिल्म इंडस्ट्रीमध्ये आपले करिअर करणार असल्याचे दिसून येते. कारण ती लवकरच 'द आर्चीज' या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे.

सुहाना खानने आपल्या पहिल्या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच आपल्या नावावर प्रॉपर्टी खरेदी केली आहे. अलिबागमध्ये विकत घेतलेल्या या प्रॉपर्टीची किंमत 12.91 कोटी रुपये आहे. तिने थल गावात 1.5 एकर जागा खरेदी केली आहे. या जागेत जमिनीबरोबरच 3 घरे देखील आहेत. ही प्रॉपर्टी अभिनेत्री दुर्गा खोटे यांच्या परिवाराशी संबंधित असल्याचे सांगितले जाते. या प्रॉपर्टीला लागूनच शाहरूखने यापूर्वीच एक प्रॉपर्टी खरेदी केलेली आहे.

सुहानाने तिच्या नावावर घेतलेल्या या प्रॉपर्टीचे रजिस्ट्रेशन 1 जूनला करण्यात आले आहे. यासाठी 77.46 लाख रुपये स्टॅम्प ड्युटी भरली असल्याचे सांगितले जाते. ही प्रॉपर्टी अॅग्रीकल्चर लॅण्डमध्ये मोडणारी असून यामध्ये 1750, 420 आणि 48 चौरस फुटांची 3 घरे आहेत. मुंबईपासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या अलिबागची मागणी दिवसेंदिवस वाढू लागली आहे. बॉलिवूडमधील प्रसिद्ध व्यक्तींबरोबरच, व्यावसायिकही अलिबागला पसंती देत असल्याचे दिसून येते.

अलिबागमध्ये मोठमोठ्या उद्योगपतींचे बंगले आहेत. यामध्ये वेदांता रिसोर्सेसचे नवीन अग्रवाल, रेमंड्सचे गौतम सिंघानिया, युनिकॅम लॅबचे प्रकाश मोदी, इन्फोसिसचे सलिल पारेख, केकेआर चे संजय नायर, नायकाच्या फाल्गुनी नायर यांचे बंगले आहेत. त्याचप्रमाणे अभिनेत्री जुही चावला हिचीदेखील अलिबागमध्ये मालमत्ता असून तिथे तिने ऑर्गनिक फार्म सुरू केले आहे. तसेच दीपिका पदुकोण-रणवीर सिंग आणि अनुष्का शर्मा यांची देखील अलिबागमध्ये प्रॉपर्टी आहे. 

The Archies

'द आर्चिज' या चित्रपटामध्ये सुहानासोबत बोनी कपूर-श्रीदेवी यांची मुलगी खुशी कपूर, अमिताभ बच्चन यांची नात अगस्त्या या सुपरस्टार किड्ससोबत मिहिर अहुजा, युवराज मेंडा आणि वेदांग रैना हे तरूण कलाकार सुद्धा असणार आहेत. 'द आर्चिज' टीझर नुकताच झळकला असून, लवकरच नेटफ्लिक्सवर ही चित्रपट पाहता येणार आहे.