Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Pathaan Movie Collection: पठाण चित्रपटाचा 1000 कोटी क्लबमध्ये प्रवेश!

Pathaan

Shahrukh Khan: पठाण या चित्रपटाने जगभरात 996 कोटी रुपये कमावले आहेत. सोमवारच्या कलेक्शनमध्ये भर पडल्याने, चित्रपटाने रु. 1000 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. बॉक्स ऑफिस वर्ल्डवाइड नुसार, चित्रपटाचे देशांतर्गत एकूण संकलन 623 कोटी रुपये आहे आणि परदेशात एकूण संकलन 377 कोटी रुपये आहे, ज्यामुळे त्याचे जगभरातील एकूण संकलन 1000 कोटी रुपये झाले आहे.

थिएटरमध्ये जवळपास एक महिना उलटल्यानंतरही, शाहरुख खानच्या (Shahrukh Khan) पठाण या चित्रपटाने (Pathaan) बॉक्स ऑफिसवर कमालीचे यश मिळवले आहे. चित्रपटाने जगभरात रु. 1000 कोटींचा गल्ला कमावला आहे आणि हळूहळू स्थानिक पातळीवर हिंदी भाषेतील टॉप चित्रपट बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. पठाण या चित्रपटावर या आठवड्यात नव्याने रिलीज झालेल्या, कार्तिक आर्यनच्या 'शेहजादा' आणि मार्वलच्या 'अँट-मॅन अँड द वास्प: क्वांटुमॅनिया'चा कुठलाही प्रभाव पाहायला मिळालेला नाही.

'बाहुबली: द कन्क्लूजन' या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनने 510.99 कोटी रुपये कमवले होते. चौथ्या आठवड्याच्या शेवटी,पठाण चित्रपटाने हिंदी बाजारपेठेतील एकूण कलेक्शनमध्ये 10 कोटी रुपयांची भर घातली. शुक्रवारी, त्याची कमाई 2.20 कोटी रुपये, शनिवारी 3.25 कोटी रुपये आले, त्यानंतर रविवारी 4.15 कोटी रुपयांची कमाई झाली.

सोमवारी यशराज फिल्म्सने पठाणचे रविवारपर्यंतचे जगभरातील कलेक्शन शेअर केले. YRF ने एक ट्विट केले आहे, "#Pathaan स्ट्रीक सतत वाढत आहे ?" कारण या चित्रपटाने जगभरात 996 कोटी रुपये कमावले आहेत. सोमवारच्या कलेक्शनमध्ये भर पडल्याने, चित्रपटाने रु. 1000 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. बॉक्स ऑफिस वर्ल्डवाइड नुसार, चित्रपटाचे देशांतर्गत एकूण संकलन 623 कोटी रुपये आहे आणि परदेशात एकूण संकलन 377 कोटी रुपये आहे, ज्यामुळे त्याचे जगभरातील एकूण संकलन 1000 कोटी रुपये झाले आहे.

याआधी 'दंगल' (1968.03 कोटी), 'बाहुबली 2: द कन्क्लूजन' (1747 कोटी), 'KGF 2' (1188 कोटी) आणि RRR (1174 कोटी) या चित्रपटानंतर पठाण हा जगभरात रु. 1000 कोटींचा टप्पा ओलांडणारा पाचवा भारतीय चित्रपट ठरला आहे. पठाण हा चित्रपट चीनमध्ये रिलीज झालेला नाही, बाकी चित्रपट मात्र तेथे रिलीज झाले होते. चीनमध्ये रिलीजन होता पठाणने हा पराक्रम गाजवला आहे.

शाहरुख खान पाठणचा 1000 कोटींचा टप्पा गाठण्यासाठी आतुरतेने वाट पाहत होता. सोमवारी, एका ट्विटर वापरकर्त्याला शाहरुखने त्याच्या भाग्यवान नंबरबद्दल माहिती दिली, जेव्हा वापरकर्त्याने त्याला विचारले की शाहरुखकडे लकी नंबर आहे का? या प्रश्नावर उत्तर देताना शाहरुख म्हणाला की, "सध्या 1000 पेक्षा मोठा आकडा माझा लकी नंबर आहे #पठान."

पठाणच्या प्रचंड यशामुळे, इतर बॉलीवूड सुपरस्टार्स ज्यांना खास कामगिरी करता आली नव्हती ते पुन्हा यशस्वी ठरतात का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. अलीकडेच, 2022 मध्ये त्याच्या 'भूल भुलैया 2' या चित्रपटाद्वारे बॉलीवूडमधून राइटऑफ होण्यापासून वाचलेला कार्तिक आर्यन, त्याच्या अलीकडील चित्रपट शेहजादामध्ये पूर्णपणे अपयशी ठरला आहे. आता, गेल्या वर्षी चार फ्लॉप चित्रपटात काम करणारा अक्षय कुमार या शुक्रवारी त्याच्या 'सेल्फी' या चित्रपटाने पुनरागमन करत आहे.