तुम्ही वयानुसार अॅसेट अलोकेशन करणे म्हणजे तुम्हाला तुमच्या भविष्यातील गुंतवणुकीचे धोके कमी करणे होय. आपल्या पोर्टफोलिओमध्ये सर्वात महत्वाचा घटक इक्विटीला मानले जाते. यात रिस्क जास्त असली तरी रिटर्नही जास्तच मिळतो. मात्र, हे आपल्याला एका वयापर्यंत करणे आवश्यक आहे. म्हणजे जसे आपले वय वाढत जाईल त्यानुसार आपल्याला अॅसेट्स इक्विटीकडून डेब्ट फंड आणि फिक्स्ड इनकम गुंतवणुकीकडे पाऊल उचलणे गरजेचे आहे.
समजा तुमचे वय फक्त 25 आहे. अशावेळी तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओमध्ये 75 टक्के इक्विटीमध्ये आणि बाकीची डेब्ट फंड आणि फिक्स्ड इन्कम सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक करु शकता. म्हणजे तोटा जरी झाला तरी तुम्ही ते वयानुसार मॅनेज करु शकता. मात्र, त्याआधी त्याचे धोरण ठरवणे आवश्यक आहे.
Table of contents [Show]
तीशी ओलांडल्यानंतर युलिप ठरु शकतो आधार
तज्ज्ञांच्या माहितीनुसार तुम्ही जर तीशी ओलांडली असेल. तेव्हा पुढची परिस्थिती पाहून गुंतवणूक करणे योग्य ठरते. म्हणजे आपण जास्त रिटर्न मिळवण्याच्या नादात जास्त रिस्क घेऊ शकतो. तसेच, आपल्या पोर्टफोलिओमध्ये मोठा हिस्सा हा इक्विटीसारख्या हाय-रिस्क, हाय-रिवार्ड अॅसेट्समध्ये करु शकतो. ज्यामध्ये विशिष्ट स्टॉक आणि इक्विटी फंडांचा समावेश असतो. पण, तुम्हाला जर शेअर मार्केटशी संबंधित रिस्क कमी ठेवायची असल्यास, तुम्ही युलिपमध्ये (ULIP) गुंतवणूक करु शकता. त्यातून तुम्हाला कमी रिस्कमध्ये चांगला रिटर्न मिळू शकतो.
बॅलन्स साधणे आवश्यक
जेव्हा तुम्ही चाळीशीत प्रवेश करता तेव्हा पोर्टफोलिओत बदल करायला सुरूवात करू शकता. जेणेकरून बाॅण्ड्ससारख्या अधिक स्थिर गुंतवणूक देणाऱ्या ठिकाणी तुम्ही गुंतवणुकीला प्राधान्य देऊ शकता. तुमच्या पोर्टफोलिओमध्ये इक्विटी अजूनही महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकते. मात्र, रिटायरमेंट जवळ असल्याने तुम्हाला सावध पवित्रा घेऊन पोर्टफोलिओत बॅलन्स साधायची भूमिका निवडावी लागेल.
तेव्हाच तो पैसा तुम्हाला रिटायरमेंटमध्ये कामी येऊ शकेल. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार तुम्ही अशावेळी रियल इस्टेटमध्ये गुंतवणूक करु शकता. ज्यामुळे तुम्हाला रेंटमधून पैसा मिळू शकेल. तसेच या वयात तुम्हाला तुमच्या पोर्टफोलिओत बॅलन्स साधता यायला हवा यासाठी तुम्ही 40 टक्के इक्विटी आणि 40 टक्के डेब्ट फंडमध्ये गंतवू शकता. तसेच, 5 टक्के रक्कम तुम्ही कॅश म्हणून ठेवू शकता आणि 5 टक्के नव्या संधीचा लाभ घेण्यासाठी राखून ठेवू शकता.
अॅसेट अलोकेशन काय आहे?
तसेच, अॅसेटमध्ये गुंतवणूक करण्याच्या आधी ते काय आहे. हे पाहणे ही आवश्यक आहे. समजा तुम्हाला पैसे गुंतवायचे आहे. यासाठी तुम्ही ते सोने, बाॅण्ड, रियल इस्टेट, स्टाॅक्स आणि म्युच्युअल फंड, पीपीएफ आणि ईपीएफ हे सर्व निवडता. तर हेच अॅसेट्स आहेत. यापैकी तुम्हाला कुठे गुंतवणूक करायची आहे, याचे धोरण ठरवणे आवश्यक आहे.
त्यालाच अॅसेट अलोकेशन म्हणतात. मार्केटमध्ये अॅसेटचे 3 मुख्य प्रकार आहेत, यामध्ये स्टाॅक्स (इक्विटी), बाॅण्ड्स (फिक्स्ड इन्कम सिक्युरिटीज), कॅश आणि कॅशच्या समतूल्य (इक्विव्हॅलन्ट) यांचा समावेश होतो. तसेच, यामध्ये इतर ही अॅसेट्स येतात, ज्यामध्ये कमोडिटी आणि रियल इस्टेटचा समावेश आहे.
एकाच ठिकाणी गुंतवणूक टाळा
तुम्ही तुमचे सर्व पैसे एकाच अॅसेटमध्ये गुंतवले आणि तोटा झाला तर त्यातून निघणं तुम्हाला कठीण होऊ शकते. त्यामुळे पोर्टफोलिओत वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक केल्यास तोटा होण्याची रिस्क कमी असते. तसेच, नियमित रिटर्न मिळत राहतो. त्यामुळे पोर्टफोलिओत वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक करणे आवश्यक आहे.
त्याचबरोबर रिटायरमेंटजवळ आल्यास, त्यात बॅलन्स साधणेही महत्वाचे आहे. त्यामुळे तुमच्या लक्षात आले असेल की तीशी आणि चाळीशीत गुंतवणुकीचे धोरण बदलणे का गरजेचे आहे. ते नाही बदलले तर तुम्हाला आर्थिक संकटांना तोंड द्यावे लागू शकते.
(डिसक्लेमर : म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी सेबी अधिकृत आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्यावा. या बातमीद्वारे वाचकांना फक्त माहिती दिली जात आहे. 'महामनी' म्युच्युअल फंड खरेदी-विक्रीचा सल्ला देत नाही.)