Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Service Tax on Property: सर्व्हिस टॅक्स म्हणजे काय? कोणत्या प्रकारातील मालमत्तेवर किती टॅक्स आकारला जातो, जाणून घ्या

Service Tax on Property

Service Tax on Property: तुम्हीही मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर त्यावर लागू होणाऱ्या टॅक्सबद्दल तुम्हाला माहिती असायला हवी. कोणत्या प्रकारच्या मालमत्तेवर सर्व्हिस टॅक्स (Service Tax) आकारला जातो? तो किती असतो, यासंदर्भातील माहिती जाणून घेऊयात.

सध्या रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये गुंतवणूक प्रचंड प्रमाणावर वाढली आहे.अशातच तुम्हीही मालमत्तेमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला सर्विस टॅक्सबद्दल माहिती असणे गरजेचे आहे. व्यवसायावर आधारित सेवांवर सर्व्हिस टॅक्स (Service Tax) आकारला जातो. अगदी त्याच प्रमाणे मालमत्तेच्या प्रकारावर आधारित सर्व्हिस टॅक्स भरावा लागतो. सर्व्हिस टॅक्स म्हणजे नक्की काय? तो कधी आणि किती टक्के भरावा लागतो, याबद्दल जाणून घेऊयात.

सर्व्हिस टॅक्स म्हणजे काय?

सर्व्हिस टॅक्सला (Service Tax) मराठीमध्ये सेवा कर असे म्हणतात. व्यवसायावर आधारित सेवांवर सर्व्हिस टॅक्स आकारला जातो. रिअल इस्टेट क्षेत्रात मालमत्तेचे दोन प्रकार पडतात. यातील पहिला प्रकार हा अंडर कनस्ट्रक्शन (Under Construction) असून दुसरा प्रकार रेडी टू मूव्हमध्ये (Ready to Move) येतो.

रिअल इस्टेट क्षेत्रात सर्व्हिस टॅक्स हा केवळ बांधकामाधीन मालमत्तेवर आकारला जातो. विक्रीच्या हेतून देऊ केलेल्या कोणत्याही मालमत्तेवर म्हणजेच बिल्डिंग, कॉम्प्लेक्स किंवा सिव्हिल स्ट्रक्चरवर आधारित हे शुल्क आकारले जाते. या सर्व प्रकारातील मालमत्तेची विक्री करताना बिल्डर बांधकामाधीन मालमत्तेवर सर्व्हिस टॅक्स आकारतो.

'या' प्रकारातील मालमत्तेवर सर्व्हिस टॅक्स आकारला जात नाही

रेडी टू मुव्ही (Ready to Move) मालमत्तेसाठी सर्व्हिस टॅक्स भरावा लागत नाही. याचे कारण असे की, प्रॉपर्टी डेव्हलपर पूर्णपणे बांधलेली मालमत्ता विकत आहे. सर्व्हिस टॅक्स हा केवळ बांधकामाधीन मालमत्तेवर आकारला जातो. तसेच बिल्डर मालमत्तेच्या बदल्यात खरेदीदाराला कोणतीही प्रकारची सेवा देत नाही. याशिवाय रेडी टू मूव्ह प्रकारातील मालमत्तेवर इतर टॅक्स आकारले जातात. हा टॅक्स वाचवण्यासाठी तुम्ही रिअल इस्टेट क्षेत्रातील गुंतवणूक सल्लागाराची मदत घेऊ शकता.

मालमत्तेवर किती टक्के सर्व्हिस टॅक्स भरावा लागतो?

मालमत्तेचा आकार आणि त्याचे मूल्य यावर आधारित सर्व्हिस टॅक्स आकारला जातो. हा टॅक्स साधारण 3.75 ते 4.5 टक्के इतका असतो. सिंगल ओनर असणाऱ्या रहिवासी इमारतीच्या विक्रीत सर्व्हिस टॅक्समध्ये सवलत देण्यात येते. याशिवाय ज्या घराचे क्षेत्रफळ 60 चौरस मीटरपर्यंत आहे, आणि ज्याची विक्री किंमत कमी आहे. तसेच भारत सरकारने गृहनिर्माण मंत्रालयाच्या माध्यमातून बनविलेल्या परवडणाऱ्या घरांच्या योजने अंतर्गत गृहनिर्माण प्रकल्पाला सक्षम प्राधिकरणाकडून मान्यता मिळाली असल्यास सर्व्हिस टॅक्समध्ये सवलत देण्यात येते.

Source: hindi.news18.com