Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Sensex Sharp Rise Today: सेन्सेक्स-निफ्टीची वर्ष 2023 ची धडाक्यात सुरुवात

Sensex Nifty Start 2023 on High note

Sensex Sharp Rise Today: शेअर मार्केटमध्ये वर्ष 2023 मध्ये धडाक्यात सुरुवात केली. आज सोमवारी 2 जानेवारी 2023 सेन्सेक्सने 327 अंकांची वाढ झाली.

शेअर मार्केटमध्ये आज सोमवारी 2 जानेवारी रोजी तेजीची लाट धडकली. बँका, वित्त संस्था, पॉवर, मेटल, आयटी क्षेत्रात खरेदीचा ओघ दिसून आला. बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 327 अंकांच्या वाढीसह 61167.79 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीमध्ये 92.15 अंकांची वाढ झाली आणि तो 18197.45 वर बंद झाला.

आजच्या सत्रात सेन्सेक्समधील 23 शेअर वधारले. टाटा स्टीलमध्ये सर्वाधिक 6% वाढ झाली. टाटा मोटर्स, आयसीआयसीआय बँक, अॅक्सिस बँक, महिंद्रा अॅंड महिंद्रा, रिलायन्स इंडस्ट्रीज, एनटीपीसी, इन्फोसिसि, भारती एअरटेल, अल्ट्राटेक सिमेंट, एचडीएफसी, पॉवरग्रीड, कोटक बँक, एचसीएल टेक, टीसीएस, एचडीएफसी बँक, बजाज फायनान्स, मारुती या शेअरमध्ये वाढ झाली. एसबीआय, एचयूएल, नेस्ले, सन फार्मा, टेक महिंद्रा, टायटन या शेअरमध्ये घसरण झाली.

देशांतर्गत अर्थव्यवस्थेच्या दमदार कामगिरीने आज गुंतवणूकदारांमध्ये उत्साह दिसून आला. डिसेंबरमध्ये पीएमआय इंडेक्स 57.8 वर गेला. चीनने धातूनवरील निर्यात शुल्क वाढवले. त्यामुळे भारतातील मेटल उद्योगाला फायदा होणार आहे. आज शेअर मार्केटमध्ये प्रमुख मेटल स्टॉक्सच्या किंमतीत वाढ झाली. यात हिंदाल्को, नाल्को, हिंदुस्थान झिंक, टाटा स्टील, सेल, जिंदाल स्टील, मिश्र धातू निगम, जिंदाल सॉ या शेअरमध्ये 1 ते 3% वाढ झाली.

डॉलरसमोर रुपया वधारला

शेअर बाजारातील तेजीचा फायदा चलनाला झाला. करन्सी मार्केटमध्ये डॉलरच्या तुलनेत रुपयामध्ये 14 पैशांची वाढ झाली. आज रुपया 82.75 वर होता. जागतिक कमॉडिटी बाजारात क्रूडचा भाव वधारला आहे. त्याचबरोबर भारतीय बाजारांमधून परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी गुंतवणूक काढून घेण्याचा पवित्रा कायम ठेवला. त्यामुळे डॉलरची घसरण झाली आणि रुपया वधारला.

शेअर बाजारात तेजी येण्यामागे आणखी कारण म्हणजे डिसेंबरमध्ये पर्चेसिंग मॅनेजर्स इंडेक्समध्ये वाढ झाली आहे. एसअॅंडपीने तयार केलेला पर्चेसिंग मॅनेजर्स इंडेक्स डिसेंबर 2022 मध्ये 57.8 वर गेला. त्याआधी नोव्हेंबर 2022 मध्ये तो 55.7 होता. शुक्रवारी 30 डिसेंबर 2022 रोजी सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये घसरण झाली होती. वर्षाच्या शेवटच्या सत्रात सेन्सेक्स 293 अंकांनी आणि निफ्टी 86 अंकांच्या घसरणीसह स्थिरावला होता.