अमेरिकन केंद्रीय बँकेचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी व्याजदर वाढवण्याचे संकेत दिल्याने पु्न्हा एकदा जगभरातील गुंतवणूकदार धास्तावले आहेत.पॉवेल यांच्या विधानाचे पडसाद आज भारतीय शेअर बाजारांवर उमटले.आज सोमवारी 29ऑगस्ट रोजी सेन्सेक्स आणि निफ्टीत प्रचंड घसरण झाली.बाजार सुरु होताच सेन्सेक्स 1300 अंकांनी कोसळला.राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 300 अंकांनी कोसळला.या प्रचंड घसरणीने बाजारातील सूचीबद्ध कंपन्यांचे भांडवल 4 लाख कोटींने कमी झाले.अचानक बाजारात पडझड झाल्याने गुंतवणूकदारांना आज जबर नुकसान सोसावे लागले.
फेडरल रिझर्व्हचे केवळ भारतातच नव्हे तर आशियातील सर्वच प्रमुख शेअर बाजारांमध्ये आज मोठी घसरण झाली आहे. सकाळी 9.27 मिनिटांनी सेन्सेक्स 1098 अंकांनी घसरला आणि 57,760.47 अंकांपर्यंत खाली आला. निफ्टी-50 हा 318 अंकांनी कोसळला आणि तो 17,240.50 च्या पातळीपर्यंत खाली आला होता. यात मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्सची होरपळ झाली. आजच्या सत्रात मिडकॅप इंडेक्स 1.96% आणि स्मॉलकॅप इंडेक्स 2.36% पर्यंत घसरला आहे.
सध्या शेअर मार्केटमध्ये विक्रीचा दबाव निर्माण झाला आहे.बाजारातील कंपन्यांचे मार्केट कॅपिटलायझेशन 272.98 लाख कोटी इतके झाले आहे.त्याआधी शुक्रवारी ते 276.96 लाख कोटी इतके होते.आजच्या घसरणीची झळ चलन बाजारात रुपयाला देखील बसली. चलन बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपयाने आज आणखी नीचांकी पातळी गाठली. डॉलरसमोर रुपया 80.07 च्या पातळीव खुला झाला. आजच्या सत्रात बँकां, वित्त संस्था, रिअल इस्टेट, फार्मा, ऑटो, आयटी या सेक्टरमध्ये प्रचंड विक्री सुरु आहे.
सेन्सेक्स मंचावरील 30 पैकी 29 शेअर घसरले आहेत.केवळ एचयूएलचा शेअर तेजीत आहे. निफ्टी मंचावर येस बँक, आरबीएल, वोडाफोन, आयडीएफसी बँक हे शेअर घसरले आहेत. एजिस लॉजेस्टिक, हॅथवे केबल, जुबिलंट फार्मा, एस्कॉर्ट कुबोटा लिमिटेड, कोचीन शिपयार्ड, माझगाव शिपबिल्डर्स य महिनाभरात परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 1,63,115 कोटींचे शेअर्स विक्री केले आहेत. पैसे काढून घेण्याचा सपाटा लावल्याने इंडेक्सला मोठा फटका बसला आहे.
जगभरात शेअर निर्देशांक कोसळले
गेल्या आठवड्याच्या शेवटच्या सत्रात शुक्रवारी नॅसडॅक 3.9% आणि एसअॅंडपी 500 3.4% घसरला होता. डाउमध्ये 3% घसरण झाली होती. आज हॅंगसेंग, निक्केई या आशियातील प्रमुख शेअर इंडेक्समध्ये मोठी घसरण झाली.
इंडेक्स | निर्देशांक | वाढ/घसरण | वाढ/घसरण (%) |
Hang Seng | 19,999.92 | -170.12 | -0.84% |
Straits Times | 3,222.78 | -26.75 | -0.82% |
Nikkei 225 | 27878.96 | -762.42 | -2.66% |
S&P 500 | 4,091.73 | -107.39 | -2.56% |
Dow Jones Ind. Avg. | 32,558.59 | -733.19 | -2.20% |