Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Bajaj Finance FD rate: बजाज फायनान्सकडून ज्येष्ठ नागरिकांच्या मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ; नवे दर येथे चेक करा

Bajaj Finance FD rate

Image Source : www.financialexpress.com

Bajaj Finance FD rate: बजाज फायनान्सने ज्येष्ठ नागरिकांच्या बचत ठेवींवर व्याजदरात 40 बेसिस पॉइंटने वाढ केली आहे. त्यामुळे आता 44 महिन्यांच्या विशेष मुदत ठेवींवर 8.60% वार्षिक व्याजदर मिळू शकतो. नवे दर 10 मे 2023 पासून लागू झाले आहेत.

Bajaj Finance FD rate: बजाज फायनान्सने ज्येष्ठ नागरिकांच्या बचत ठेवींवर व्याजदरात 40 बेसिस पॉइंटने वाढ केली आहे. त्यामुळे आता 44 महिन्यांच्या विशेष मुदत ठेवींवर 8.60% वार्षिक व्याजदर मिळू शकतो. नवे दर आजपासून लागू होतील, असे बजाज फायनान्सने म्हटले आहे.

दरम्यान, 36 ते 60 महिने कालावधीच्या इतर मुदत ठेवींवरील व्याजदर 40 बेसिस पॉइंटने वाढवले आहेत. 60 वर्षांखालील ठेवीदारांना 8.05% वार्षिक व्याजदर मिळू शकतो. तर ज्येष्ठ नागरिकांना 36 ते 60 महिन्यांच्या गुंतवणुकीवर 8.30% वार्षिक व्याजदर मिळू शकतो, असे बजाज फायनान्सने म्हटले आहे.

नव्याने गुंतवणूक करणारे आणि 5 लाखांपर्यंतच्या ठेवींचे नूतनीकरण करणाऱ्यांना या दराचा फायदा मिळेल. (Bajaj Finance latest FD rate) ताज्या माहितीनुसार, बजाज फायनान्सद्वारे घेतल्या जाणाऱ्या ठेवी CRISIL च्या AAA रेटिंगमध्ये येतात. ट्रिपल A ठेवी सुरक्षित समजल्या जातात.

बजाज फायनान्सचे मुदत ठेव दर (FD rates of Bajaj Finance)

  • 12 ते 23 महिने मुदत ठेव: सर्वसामान्य नागरिकांना 7.4% दर तर ज्येष्ठ नागरिकांना 7.65% व्याजदर.  
  • 15 ते 23 महिने मुदत ठेव: सर्वसामान्य नागरिकांना 7.5% दर तर ज्येष्ठ नागरिकांना 7.75% व्याजदर. 
  • 24 महिने मुदत ठेव: सर्वसामान्य नागरिकांना 7.55% दर तर ज्येष्ठ नागरिकांना 7.8% व्याजदर.  
  • 25-35 महिने मुदत ठेव: सर्वसामान्य नागरिकांना 7.6% दर तर ज्येष्ठ नागरिकांना 7.65% व्याजदर.  
  • 36-60 महिने मुदत ठेव: सर्वसामान्य नागरिकांना 8.05% दर तर ज्येष्ठ नागरिकांना 8.3% व्याजदर.

विशेष मुदत ठेवींवरील व्याजदर (Bajaj Finance Special FD interest rates)

  • 15 महिने मुदत ठेव: सर्वसामान्य नागरिकांना 7.45% दर तर ज्येष्ठ नागरिकांना 7.7% व्याजदर.
  • 18 महिने मुदत ठेव: सर्वसामान्य नागरिकांना 7.4% दर तर ज्येष्ठ नागरिकांना 7.65% व्याजदर. 
  • 22 महिने मुदत ठेव: सर्वसामान्य नागरिकांना 7.5% दर तर ज्येष्ठ नागरिकांना 7.75% व्याजदर. 
  • 30 महिने मुदत ठेव: सर्वसामान्य नागरिकांना 7.45% दर तर ज्येष्ठ नागरिकांना 7.7% व्याजदर. 
  • 33 महिने मुदत ठेव: सर्वसामान्य नागरिकांना 7.75% दर तर ज्येष्ठ नागरिकांना 8% व्याजदर. 
  • 44 महिने मुदत ठेव: सर्वसामान्य नागरिकांना 8.35% दर तर ज्येष्ठ नागरिकांना 8.60% व्याजदर.

मागील काही महिन्यांपासून व्याजदरात वाढ झाली असून अनेक बँका आणि वित्त संस्थांनी मुदत ठेवींवरील व्याजदर वाढवले आहेत. नव्याने जाहीर केलेल्या मुदत ठेवींवरील व्याजदरामुळे गुंतवणूकदारांना महागाईवर मात मिळवता येईल तसेच निश्चित परतावा मिळेल. तसेच गुंतवणूकही सुरक्षित राहील, असे बजाज फायनान्सने म्हटले आहे.