Side hustle for extra money: शाळेची पुस्तके किंवा साहित्यिक, अवांतर वाचनाची पुस्तके घरी आणतो, वाचून झाल्यावर ती तशीच धूळ खात पडलेली असतात, अशी पुस्तके आपण रद्दीवाल्याला विकतो, तो वजनानुसार जे पैसे होतील ते देतो, त्यात आपण काही बार्गेन करत नाही, जे पैसे येतील ते घेऊन घरी येतो. मात्र वाचलेली, सेकंड हँड पुस्तके ऑनलाईन विकल्यास जास्त फायदा होऊ शकतो.
पुस्तक विक्रीतून किती लाभ होऊ शकतो (How much profit can be made from sales)
डिजिटल माध्यम हे लहान - मोठ्या व्यवसायांचे केंद्र बनत चालले आहे. येथे अॅमेझॉन, बुकचोर, क्लॅनकार्ट आदी असे प्लॅटफॉर्म आहेत, जेथे वाचलेली, सेकंड हँड पुस्तके विक्रीसाठी ठेवू शकता. ही पुस्तके तुम्ही 50 टक्के सवलतीत ठेवा किंवा 30 टक्के सवलत ठेवा आणि विका. येथे अभ्यासाची, एखाद्या कोर्सेची, साहित्यिक, माहितीजन्य अशी कोणतीही पुस्तके विकू शकता, तसेच लहान मुलांची पुस्तके ही विकता येतात. येथे मासिके, वार्षिक अंकही विकता येतात. या प्लॅटफॉर्मवर विक्रीची सर्व रक्कम विक्री करणाऱ्या व्यक्तीला मिळते, तर काही प्लॅटफॉर्मवर 70 टक्के रक्कम विक्री करणाऱ्यास मिळते, कारण ऑपरेशनचा सर्व भाग त्या कंपनीने पाहिलेला असतो.
आजकाल कोणी पुस्तके वाचत नाही, असे हमखास म्हटले जाते. मात्र तरिही वर्षाला हजारोंनी पुस्तकांची निर्मिती होत असते. वाचनाचे स्वरुप बदलले आहे, त्यामुळे लेखकांनीही लेखन शैली बदलली आहे. सोप्पी वाक्यरचना, सोप्पे शब्द, लहान वाक्ये, मुद्देसूद लेखन, पॉईंटनुसार लेखन तसेच पुस्तकांचा आकारही लहान ठेवला जातो. जेणेकरून तरुण वाचक, नवे वाचक या पुस्तकांकडे आकर्षित व्हावेत आणि त्यांना वाचनाची गोडी लागावी यासाठी हे केले जाते. हिच तरुण मुले अशा प्लॅटफॉर्मवर सर्वाधिक सेकंड हँड बुक्स विकतात. साधारण 15 ते 38 वयोगटातील व्यक्ती अशा प्लॅटफॉर्मचा वापर साईड हसल अर्थात साईड इन्कम कमावण्यासाठी करतात. यातून त्यांच्या पुढील पुस्तके विकत घेण्याचा खर्च भागतो तर काही जणांना पॉकेट मनी मिळत असेल, असे ऑनलाईन लायब्रेरियन दुर्वा इसवलकर यांनी सांगितले.
आजकाल महागाईमुळे, खिसा लवकर रिकामा होतो. त्यात एक्स्ट्रा पैसे मिळणार असतील, तर कोणाला नको असते. अशावेळी साईड हसल म्हणजे साईड इन्कम कमावण्यासाठी विविध मार्ग अवलंबले जातात. फोटोंची विक्री केली जाते, ब्लॉग लिहिले जातात, आवाज दिला जातो तसेच आपण वाचलेली पुस्तके घरातच ठेवण्यापेक्षा ती दुसऱ्यांना कमी किंमतीत विकणे हा साईड हसल हळूहळू वाढताना दिसत आहे. रद्दीवाल्याऐवजी, स्वत: ऑनलाईन विकली जातात. ओएलएक्स विकण्यासारखाच हा प्रकार आहे. मात्र ओएलएक्सवर सर्व प्रकारच्या वस्तू विकल्या जातात, तर हे प्लॅटफॉर्म फक्त पुस्तकांसाठीच वाहिलेले आहेत. याद्वारे एखादी व्यक्ती एका 500 रुपयांच्या पुस्तकातून 400 ते 200 रुपये कमावू शकते, असे इसवलकर यांनी सांगितले.