Rent Agreement: नोकरी व्यवसायानिमित्त अनेक जण घरापासून दूर मोठ्या शहरात भाड्याने घर घेऊन राहतात. मुंबई, पुणे, बंगळुरू, दिल्ली सारख्या मोठ्या शहरात घरभाडे जास्त द्यावे लागते. तसेच 2 महिने ते 10 महिन्यापर्यंत अनामत रक्कम घरमालक घेतात. मात्र, भाडेकरार करताना जर तुम्ही अनामत रकमेचा क्लॉज टाकला नाही तर ही रक्कम मिळण्यास अडचण येऊ शकते. (security deposits and refund clauses) तसेच भविष्यात घरमालकाकडून विविध शुल्कापोटी या रकमेतून मोठी कपात केली जाऊ शकते. तेव्हा तुमच्यापुढे पश्चाताप करण्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही.
सिक्युरिटी डिपॉजिट क्लॉज कसा असावा?
जर भाडेकरारात काही लॉक-इन कालावधी असेल तर सिक्युरिटी डिपॉजिट या लॉक इन कालावधीशी लिंक नसावे. असे असेल तर तुम्हाला घर सोडल्यानंतरही अनामत रकमेसाठी वाट पहावी लागेल.
ज्या दिवशी घर खाली कराल त्या दिवशी सर्व अनामत रक्कम माघारी मिळावी, अशी तरतूद करारात केलेली असावी.
किरकोळ नुकसान, अनेक दिवसांच्या वापरामुळे अल्पशा खराब झालेल्या वस्तू, भिंतींचा उतरलेला रंग या गोष्टी अनामत रकमेतेून कापून घ्यायला नकोत. जर घराचे खूप जास्त नुकसान झाले असेल तरच अनामत रकमेतून घरमालक पैसे कट करून घेऊ शकतो, अशी तरतूद असावी.
घर सोडताना जर काही नुकसान भरपाई किंवा दुरूस्तीचा खर्च अनामत रकमेतून कापून घेणार असेल तर मालकाने लेखी स्वरुपात भाडेकरूला नोटीस द्यावी. (security deposits and refund clauses) भाडेकरुने ही नोटीस मान्य केल्यानंतरच पैसे कट करून घ्यावे, अशी तरतूदही घरभाडे करारात असावी.
सिक्युरिटी डिपॉजिट कधी कापून घेतले जाईल?
घरभाडे थकवले तर घरमालक अनामत रकमेतून भाड्याची रक्कम कापून घेऊ शकतो. तसेच जर हेतूपरस्पर घराचे काही नुकसाने केल्याचे आढळून आल्यास डिपॉजिटमधून ही रक्कम कापून घेतली जाऊ शकते.
अनामत रक्कम न दिल्यास व्याजासहीत मिळेल रक्कम
Tenancy Act 2021 नुसार जर घरमालकाने करारात नमूद केलेल्या तारखेला अनामत रक्कम दिली नाही तर त्यावर व्याज आकारले जाईल. म्हणजेच घरमालकाला व्याजासहित डिपॉजिटचे पैसे मिळतील. सरळव्याजाने घरमालकाला पैसे द्यावे लागतील.