Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Secured Transport : वाहनांच्या टायर्ससाठी नवे स्टॅण्डर्ड!

Secured Transport : वाहनांच्या टायर्ससाठी नवे स्टॅण्डर्ड!

आपल्याकडे प्रवासी वाहनं (passenger vehicles) आहेत किंवा अशा वाहनांतून आपण प्रवास (travel) करतो का? तर मग आपल्याला काही माहिती ठेवायलाच पाहिजे. भारतात यापुढे प्रवासी वाहनांच्या टायरनादेखील (Tyres) दर्जाबाबत निर्धारित अशी काही मानकांची (Standards) कसोटी पार करावी लागणार आहे. वाहनांची वाहतूक (transport) सुरक्षित (secure) करण्यात ही गुणवत्ता महत्वाची भूमिका बजावतात.

भारतात केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने वाहनांसाठीच्या टायर वापराबाबतच्या सुधारणांबाबतची माहिती दिली आहे. त्यानुसार, सी1 (पॅसेंजर कार) , सी2 (हलके ट्रक), सी3 (ट्रक आणि बस) या तीन वर्गवारीतील वाहनांच्या टायरचा रोलिंग रेझिस्टन्स, वेट ग्रिप आणि रोलिंग साऊंड एमिशन्स यांचा दर्जा हा वाहन उद्योग मानके 142:2019 मध्ये (Auto Industry Standards) निश्चित केल्यानुसार असणे अनिवार्य करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आलं आहे.

येत्या काही महिन्यात या मानकांचे पालन करण्याची सुधारणा अंमलात आणावी लागेल. जे पालन करायचं त्यात wet grip विषयक अटी त्याचप्रमाणे stage 2 ची Rolling resistance आणि Rolling sounds emissions या तिन्हीबाबतही दर्जा निश्चिती करण्यात आली आहे. या सुधारणा अमलात आणण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता भारतातील या संदर्भातील नियम संयुक्त राष्ट्रांच्या (UN) युरोपसाठीच्या आर्थिक आयोगाच्या नियमांना अनुरूप होतील असं स्पष्ट करण्यात आलं आहे.

या घोषणेला अनुसरून जे तीनही नियम पाळावे लागणार आहेत त्यासंदर्भात प्रवासी, चालक म्हणून आपल्याला अधिक माहिती असणं आवश्यक आहे. नेमक्या काय आहेत या गोष्टी?

वेट ग्रिप 

यातील वेट ग्रीपची (wet grip) आवश्यकता ही कळायला सोपी आहे. पावसाळ्यात प्रवासी वाहनांतून प्रवास करताना प्रवाशांना त्याचे महत्त्व पटतंच. पावसानं रस्ते ओले झालेले असतात. अशा रस्त्यांवर ब्रेक लावावे लागले तर ते पूर्ण कार्यक्षमतेने लागतील, हे पाहणे आवश्यक असतं. टायर आणि रस्त्याचा ओलसरपणा हा वाहनाच्या ब्रेक व्यवस्थेच्या कार्यक्षमतेवर प्रभाव टाकत असतो. त्यावर ब्रेक परिणामकारक रितीने लागून वाहन कुठं थांबेल हे निश्चित होऊ शकतं. त्यासाठी वेट ग्रीपची आवश्यकता स्टॅण्डर्डद्वारे निश्चित केली गेली आहेत. ही वेट ग्रिप आवश्यकतेची गुणात्मक सुधारणा पावसात किंवा ओल्या पृष्ठभागावरून करावा लागणारा वाहन प्रवास अधिक सुरक्षित बनवू शकेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. 

रोलिंग रेझिस्टन्स

वाहन जेव्हा धावतं अर्थात टायर जेव्हा गतीने फिरत असतात त्यावेळी ते आपसूकच रस्त्याला स्पर्श करत असतात. यावेळी पुरेसा रोध (resistance) निर्माण होणं आवश्यक असतं. हा रेझिस्टन्स टायरमधील हवेचा दाब त्याचप्रमाणे टायरची झीज (wear and tear) या व अशा काही गोष्टींवर अवलंबून असतो. वाहन वेगात असताना रस्त्याची पकड आणि गती ही नियंत्रित दिशेनेच असणं आवश्यक असतं. अन्यथा गतीतल्या वाहनाची दिशा सुटल्याने भरकटत जाण्याची किंवा घसरण्याची शक्यता खूप वाढते. विशेषतः घाट रस्ते आणि तत्सम अवघड ठिकाणी तर यामुळे अपघाताची शक्यता अधिक प्रमाणात निर्माण होऊ शकते. अशा वेळी वाहनांसाठी रोलिंग रेझिस्टन्स (rolling resistance) उपयोगी ठरतं.

रोलिंग साऊंड इमिशन्स

वाहनं, विशेषतः मोठी आणि जड वाहनं रस्त्यावरून वेगात धावतात त्यावेळी त्या वाहनांच्या टायरमधूनही आवाज येत असतो. वेगवेगळ्या कारणांनी हा आवाज खूप मोठा होतो आणि रस्ता-हवेतील ध्वनिप्रदूषणात तो भर घालू शकतो. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी रोलिंग साऊंड इमिशन्स (rolling sound emissions) निर्धारित केली गेली आहेत.

वाहतूक व्यवस्थेत सुधारणा

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय गेल्या काही वर्षांत रस्ते वाहतूक अधिक सुरक्षित व्हावी यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. त्याचप्रमाणे रस्ता वाहतूक प्रदूषणमुक्त व्हावी यासाठीदेखील प्रयत्न होत आहेत. एकसमान स्टॅण्डर्ड वापरले गेले तर गुणात्म सुधारणा होऊ शकते. अशा सुधारणा घडविण्यासाठी विविध पातळीवर सातत्याने प्रयत्न सुरू असतात. चारचाकी वाहनांच्या टायरबाबतची जाहीर केलेली मानकं पाळण्याविषयीची सुधारणा ही त्याच प्रयत्नांचा एक भाग आहे, असं मानलं जातं. अलीकडच्या काळात या मंत्रालयाने भारत एनकॅप (Bharat NCAP) मोहिमेची घोषणा केली. पुढील वर्षी – म्हणजे वर्ष 2023 मध्ये भारत एनकॅपची अंमलबजावणी होईल, अशी अपेक्षा आहे.

एका बाजूला भारतात महामार्ग आणि द्रुतगती मार्गांची संख्या वाढत असताना अधिक वेगाने होणारी रस्ते मार्गे वाहतूक ही अधिक सुरक्षित करण्याचा प्रयत्न या नव्या माध्यमातून होत आहे.