Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Post Office Schemes: पोस्टाच्या 'या' 3 योजनांमध्ये गुंतवणूक करून तुमच्या मुलांचे आर्थिक भविष्य सुरक्षित करा

Post Office Schemes

Image Source : www.businesstoday.in

Post Office Schemes: पोस्ट ऑफिसकडून अनेक वेगवेगळ्या योजना राबविल्या जात आहेत. ज्यामध्ये पालक मुलांच्या नावाने गुंतवणूक करून मोठा फंड तयार करू शकतात. या फंडाचा वापर मुलांच्या उच्च शिक्षणासाठी, लग्नासाठी किंवा इतर कामांसाठी करता येऊ शकतो.

पालक मुलांच्या उज्वल भविष्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी आर्थिक गुंतवणूक (Financial Investment) करत असतात. सुरुवातीपासून केलेली आर्थिक गुंतवणूक पुढे जाऊन मुलांच्या उच्च शिक्षणासाठी (Higher Education), लग्नासाठी (Wedding) किंवा इतर महत्त्वाच्या कामांसाठी उपयोगी पडते. बऱ्याच पालकांना आपल्या मुलांना उच्च शिक्षणासाठी परदेशात पाठवायचे असते. मात्र पुरेसे आर्थिक पाठबळ नसल्याने ती गोष्ट शक्य होत नाही. अशी अडचण निर्माण होऊ नये, यासाठी पालकांनी पाल्य लहान असतानाच गुंतवणूकीचा श्रीगणेशा करायला हवा. जेणेकरून थोडे थोडे पैसे गुंतवून मोठा फंड तयार करता येऊ शकतो. पोस्ट ऑफिसमध्ये अनेक वेगवेगळ्या गुंतवणूक योजना कार्यरत आहेत. ज्यामध्ये गुंतवणूक करून तुम्ही सर्वाधिक परतावा (Returns) मिळवू शकता. कोणत्या आहेत त्या योजना, जाणून घेऊयात.

know-these-things-before-investing-2.jpg

सुकन्या समृद्धी योजना (SSY)

सुकन्या समृद्धी योजनेमध्ये 10 वर्षाच्या आतील मुलीच्या नावाने पालक गुंतवणूक करू शकतात. ही गुंतवणूक 15 वर्ष सलग करावी लागते. त्यानंतर 5 वर्षाचा वेटिंग पिरिअड (Waiting Period) देण्यात येतो. या काळात गुंतवणूक करावी लागत नाही. विशेष म्हणजे या कालावधीत देखील ग्राहकांना व्याजदर मिळतो. हा कार्यकाळ पूर्ण झाल्यावर 21 वर्षांनंतर यातील पैसे त्या मुलीला मिळतात.

सुकन्या समृद्धी योजनेत नवीन आर्थिक वर्षात ग्राहकांना 8% व्याजदर दिला जात आहे. यामध्ये पालक मुलीच्या नावे किमान 250 रुपये, तर कमाल 1.50 लाख रुपये वार्षिक आधारावर गुंतवू शकतात. या खात्यातील पैसे पालक मुलीच्या वयाच्या 18 व्या वर्षी शिक्षणासाठी काढू शकतात. मुलीच्या शिक्षणासाठी पालक एकूण रकमेपैकी 50% रक्कम काढू शकतात. उर्वरित रक्कम मॅच्युरिटीवेळी देण्यात येते.

सुकन्या समृद्धी योजनेत 1.50 लाखांच्या वार्षिक गुंतवणुकीवर पालकांना कर सवलतीचा लाभ घेता येतो. इन्कम टॅक्स कायद्यातील 1961अनुसार कलम 80C अंतर्गत हा लाभ घेता येतो.

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF)

पोस्ट ऑफिसकडून चालवण्यात येणाऱ्या सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF)  योजनेत पालक मुलांच्या नावाने गुंतवणूक करू शकतात.याचा गुंतवणूक कालावधी 15 वर्षाचा असून 15 वर्ष पूर्ण होताच यातून पैसे काढता येतात. त्यानंतर प्रत्येकी 5 वर्षानुसार पीपीएफ खात्यात गुंतवणूक करता येते.

पीपीएफ खात्यातील गुंतवणुकीवर सध्या 7.10% व्याजदर दिला जात आहे. यामध्ये पालकांना किमान 500 रुपये ते कमाल 1.50 लाख रुपयांपर्यंत वार्षिक गुंतवणूक करता येते.जर तुम्हालाही या योजनेमध्ये गुंतवणूक करायची असेल, तर तुम्ही पोस्ट ऑफिस किंवा बँकांशी संपर्क साधा.

पीपीएफमध्ये केलेल्या वार्षिक 1.50 लाखांच्या गुंतवणुकीतून पालकांना कर सवलत मिळते. इन्कम टॅक्स कायद्यातील कलम 80C अंतर्गत याचा लाभ घेता येतो. ही योजना EEE प्रवर्गातील आहेत.

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजना (NSC)

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (National Saving Certificate) ही एक बचत योजना आहे. ही योजना प्रामुख्याने कमी ते मध्यम उत्पन्न गटाच्या गुंतवणूकदारांसाठी तयार करण्यात आली आहे. यामध्ये किमान 1000 रुपयांपासून गुंतवणुक करता येते. यामधील गुंतवणुकीवर सध्या 7.7 टक्के व्याजदर दिला जात आहे. याचा गुंतवणूक कालावधी 5 वर्षाचा असून यामध्ये सर्वाधिक परतावा मिळवता येऊ शकतो.

NSC योजनेत गुंतवणुकीची कुठलीही कमाल मर्यादा निश्चित करण्यात आलेली नाही. तसेच गुंतवणूकदारांना इन्कम टॅक्स भरतांना कर सवलतीचा लाभ देखील घेता येणार आहे. या योजनेत गुंतवणूक केल्यास आयकर कलम 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंत सवलत मिळवता येईल.