SEBI has banned 2 companies from trading in the stock market for 6 months: भांडवली बाजार नियमन करणारी संस्था सेबीने (Securities and Exchange Board of India) दोन कंपन्या आणि त्यांच्या मालकांना शेअर बाजारातून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. यांना सेबीने पुढील 6 महिने शेअर बाजारात कोणत्याही प्रकारचा व्यवहार कऱण्यास मनाई केली आहे. या दोन्ही कंपन्या परवानगिशिवाय, अनधिकृतरित्या शेअर बाजार गुंतवणुकीबाबत गुंतवणुकदारांना सल्ला देत होत्या, तपासाअंती सर्व प्रकार उघडकीस आल्यावर सेबीने ही बंदी घातली आहे.
सेबीने काय कारवाई केली? (What action did SEBI take?)-
बाजार नियमन संस्था सेबीने (SEBI) पीएनपी शेअरऑन सोल्युशन (PNP Shareon Solutions) कंपनी आणि कंपनीचे मालक प्रदीप हलदर आणि पीएनपी सोल्युशन (PNP Solutions) कंपीन आणि कंपनीचे मालक प्रकाश हलदर यांच्यावर करण्यात आलेली आहे. या दोन्ही कंपन्यांना सेबीने ऑगस्ट 2021 मध्ये त्यांच्या कामावर शंका घेत नोटीस पाठवली होती, मात्र त्यावर कंपनीने कोणतेही उत्तर दिले नाही. अखेर कंपनीची चौकशी आणि तपास करून त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
सेबीने आपल्या आदेशात सांगितले की, या दोन्ही कंपन्यांनी 2017 ते 2020 दरम्यान 60.49 लाख रुपये गुंतवणुकदारांकडून जमा केले आहेत. 2020 नंतर नेमके किती पैसे गोळा केले याबाबत ठोस माहिती उपलब्ध नाही. तर हे सर्व पैसे गुंतवणूक सल्ला देऊन, त्याबदलत्यात फी रुपात हे पैसे घेतले होते. मुळात ही सेवा अनधिकृतरित्या दिली जात होती. त्यामुळे हे पैसे सर्व गुंतवणुकदारांना टप्प्याटप्प्याने परत करण्याचे निर्देश सेबीने दिली आहेत.
या कंपन्या गुंतवणूकदारांना कोणत्याही अधिकृत परवानगी किंवा प्रमाणपत्राशिवाय शेअर बाजारात पैसे गुंतवण्याचा सल्ला देत आहेत. शेअर बाजारात सल्लागार म्हणून काम करण्यासाठी किंवा स्वत:ची कन्सल्टन्सी कंपनी चालवण्यासाठी सेबीचे नोंदणी प्रमाणपत्र असणे आवश्यक असते. या दोन्ही कंपन्यांनी अनधिकृत सेवा देऊन, गुंतवणूक सल्लागार आय नियमचे उल्लंघन केले. यामुळेच सहा महिन्यांचीही शिक्षा सेबीकडून मिळाली आहे.