Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

MF advertisement: गुंतवणुकदारांची दिशाभूल करणाऱ्या जाहिराती थांबवा; सेबीने म्युच्युअल फंड कंपन्यांना फटकारले

Misleading MF advertisement

दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींमुळे ग्राहकांचे नुकसान होते. खोटे दावे, चुकीची माहिती, वाढवून सांगितलेले फायदे यास ग्राहक फसतात. भारतामध्ये अशा प्रकराच्या अनेक जाहिरातींवर याआधी सरकारने बंदी घातली आहे. आता म्युच्युअल फंडसारख्या गुंतवणुकीच्या जाहिरातींतूनही ग्राहकांची दिशाभूल होत असल्याचे समोर आले आहे.

Misleading MF advertisement: दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींमुळे ग्राहकांचे नुकसान होते. खोटे दावे, चुकीची माहिती, वाढवून सांगितलेले फायदे यास ग्राहक फसतात. भारतामध्ये अशा प्रकराच्या अनेक जाहिरातींवर याआधी सरकारने बंदी घातली आहे. आता म्युच्युअल फंडसारख्या गुंतवणुकीच्या जाहिरातींतूनही ग्राहकांची दिशाभूल होत असल्याचे समोर आले आहे. सेक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजेच सेबीने म्युच्युअल फंड कंपन्यांना दिशाभूल होणाऱ्या जाहिराती (Misleading MF advertisement) थांबवण्याचे निर्देश दिले आहेत.

काय म्हटले सेबीने? (What SEBI said about AMC ads)

म्युच्युअल फंड कंपन्यांकडून दिशाभूल होईल अशा जाहिराती प्रदर्शित केल्या जात आहेत. दिशाभूल करणारे ग्राफिक(illustrations) ब्रोशर, प्रेझेंटेशन, पत्रके कंपन्यांकडून प्रदर्शित केली जात असल्याचे सेबीने म्हटले आहे. काही म्युच्युअल फंड कंपन्यांकडून करण्यात येणाऱ्या जाहिराती SEBI (Mutual Funds) Regulations, 1996 च्या जाहिरात नियमांमध्ये बसत नाहीत, असे सेबीने म्हटले आहे.

गुंतवणूकदारांना मिळतेय चुकीची माहिती

म्युच्युअल फंड कंपन्यांनी केलेल्या जाहिरातींमुळे गुंतवणुकदारांची फसवणूक होऊ शकते. एखाद्या योजनेतून निश्चित परतावा मिळेल, असा समज गुंतवणूकदारांचा होऊ शकतो. काही गृहितके आणि अंदाजावर भविष्यात मोठा परतावा मिळेल, असे जाहिरातींतून दाखवण्यात येते. हे साफ चुकीचे आहे. म्युच्युअल फंड कंपनीद्वारे केली जाणारी जाहिरात गृहितके आणि अंदाजावर आधारित आहे, हे डिस्क्लेमरकडे ग्राहकांचे दुर्लक्ष होऊ शकते. त्यामुळे जाहिरात स्पष्ट शब्दांत नसेल तर गुंतवणूकदार या माहितीवर विश्वास ठेवू शकतो, असे सेबीने म्हटले आहे.

सेबीच्या नियमांचे उल्लंघन( SEBI rules violated in MF ads)

अशा गोंधळात टाकणाऱ्या आणि दिशाभूल करणाऱ्या जाहिराती नियमांना धरून नाहीत. म्युच्युअल फंड रेग्युलेशनच्या सहाव्या शेड्युलनुसार हे नियमात बसत नाही. त्यामुळे अॅसेट मॅनेजमेंट कंपन्यांनी अशा जाहिराती ताबडतोब थांबवाव्यात. भविष्यात अशा जाहिराती करू नका, तसेच सध्या ज्या जाहिराती प्रदर्शित केल्या जात आहेत, त्या त्वरित थांबवाव्यात, असे सेबीने म्हटले आहे.

गुंतवणुकदारांना आकर्षित करण्यासाठी AMC चा प्रयत्न

शेअर मार्केट, म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही अत्यंत संवेदनशील असून यामध्ये जोखीमही जास्त असते. चुकीच्या जाहिरातींमुळे सर्वसामान्य गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होऊ शकते. याचे गांभीर्य लक्षात घेऊन सेबीने म्युच्युअल फंड कंपन्यांना फटकारले आहे. भारतामध्ये अनेक मोठ्या अॅसेट मॅनेजमेंट कंपन्या असून मोठ्या प्रमाणात गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी स्पर्धा सुरू आहे. मात्र, सेबीने दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवर आता कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. अनेक कंपन्यांकडून काही योजनांची जोरात घोषणाबाजी केली जाते. मात्र, नंतर या योजनेतून चांगला परतावा मिळाला नाही तर दुसऱ्या योजनेत नवी योजना विलीन केली जाते.