Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

SBI New Branches : स्टेट बँक ऑफ इंडिया आणखी 300 शाखा सुरू करणार

SBI New Branches : स्टेट बँक ऑफ इंडिया आणखी 300 शाखा सुरू करणार

Image Source : www.commons.wikimedia.org

SBI New Branches : 48 कोटींहून अधिक ग्राहकांना सेवा देणाऱ्या स्टेट बँकने आता देशात आणखी 300 नवीन शाखा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या शाखा सुरु झाल्यानंतर SBI च्या एकूण शाखांची संख्या 23 हजारावर पोहोचणार आहे. तसेच ग्राहकांना अधिकाधिक सुविधा देण्यासाठी बँकेकडून येणाऱ्या काळात बिझनेस प्रतिनिधींची संख्या आणखी वाढवण्यात येणार आहे.

देशात सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक म्हणून स्टेट बँक ऑफ इंडियाला (SBI) ओळखले जाते. असंख्य ग्राहकांसाठी विश्वासहार्य असलेली एसबीआय आता देशात आणखी 300 नवीन शाखा (New Branches) सुरू करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त ग्राहकांना एसबीआयच्या बँकिंग सेवेचा लाभ घेता येणार आहे.

29 देशामध्ये 235 शाखा-

स्टेट बँके ऑफ इंडिया ही एक बहुराष्ट्रीय आणि सार्वजनिक बँक आहे. तसेच या बँकेला भारतातील सर्वात मोठी बँक म्हणून आळखले जाते. एसबीआयचा भारतातील बाजार हिस्सा हा जवळपास 23% पेक्षा जास्त आहे. तसेच स्टेट बँक ऑफ इंडियांच्या सध्य स्थितीत एकूण 22,405 पेक्षा जास्त शाखा आहेत. तर तब्बल 65,627 एटीएम सेंटर आहेत. तसेच बँकेची जगभरात 29 देशांमध्ये  235 कार्यालये सुरू आहेत.

SBI देशात 300 ब्रँच सुरू करणार

जवळपास 48 कोटींहून अधिक ग्राहकांना सेवा देणाऱ्या स्टेट बँकने आता देशात आणखी 300 नवीन शाखा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या शाखा सुरु झाल्यानंतर SBI च्या एकूण शाखांची संख्या 23 हजारावर पोहोचणार आहे. SBI बँकेकडून या शाखा याच आर्थिक वर्षात सुरू करण्यात येणार आहेत. ग्राहकांची गरज आणि सुविधा यांचा विचार करून देशभरातील विविध शहरांमध्ये या शाखा सुरू केल्या जाणार आहेत.

बिझनेस प्रतिनिधींची संख्याही वाढवणार-

ग्राहकांना अधिकाधिक सुविधा देण्यासाठी बँकेकडून येणाऱ्या काळात बिझनेस प्रतिनिधींची संख्या आणखी वाढवण्यात येणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात अनेकांना एसबीआय सारख्या बँकेत रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. एसबीआयचे अध्यक्ष दिनेश खारा यांनी बँकेच्या नवीन शाखा सुरू करण्याबाबतची माहिती दिल्याचे वृत्त पीटीआयने दिले आहे.