Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

SBI Scam Alert: एसबीआय खातेदारांची होतेय फसवणूक, कुठलीही लिंक ओपन करू नका...

SBI account holders are being cheated

State Bank of India: गेल्या काही दिवसांपासून भारतीय स्टेट बँकेच्या (SBI) खातेधारकांना एक एसएमएस पाठवला गेला आहे. ज्यात खातेधारकांचे बँक खाते बंद करण्यात आले असून ते पुन्हा सुरु करण्यासाठी लिंकवर क्लिक करून माहिती भरा असे सांगितले जात आहे...

तुमचं स्टेट बँक ऑफ इंडियात बँक खातं आहे का? तुमचे बँक खाते बंद करण्यात आले आहे असा मेसेज तुम्हांला आलाय का? बँक खाते पुन्हा सुरु करण्यासाठी कुठली लिंक क्लिक करायला सांगितली आहे का?

जर या सगळ्या प्रश्नांचे उत्तर होय असेल तर थांबा, सावधान! गेल्या काही दिवसांपासून भारतीय स्टेट बँकेच्या (SBI) खातेधारकांना एक एसएमएस पाठवला गेला आहे. ज्यात खातेधारकांचे बँक खाते बंद करण्यात आले असून ते पुन्हा सुरु करण्यासाठी लिंकवर क्लिक करून माहिती भरा असे सांगितले जात आहे.

परंतु हे मेसेज स्टेट बँकेने पाठवलेले नाही असे स्वतः बँकेने म्हटले आहे. बँकेने कुणाचेही बँक खाते बंद केले नसून, कुठल्याही लिंकवर क्लिक करून खातेधारकांनी त्यांची खासगी माहिती, क्रेडीट आणि डेबिट कार्डचे डीटेल्स, ओटीपी देऊ नये असे बँकेने म्हटले आहे.

ज्या खातेधारकांनी अशा प्रकरणांमध्ये बँकेकडे तक्रार नोंदवलेली आहे. या तक्रारीची दखल प्रेस इन्फोर्मेशन ब्युरोने (PIB) देखील घेतली आहे. तसेच अशाप्रकारच्या मेसेजला खातेधारकांनी कुठलेही उत्तर देऊ नये असे पीआयबीने म्हटले आहे. तसेच अशा प्रकरणात report.phishing@sbi.co.in वर आपली तक्रार नोंदवा असेही पीआयबीने म्हटले आहे.

लिंकवर क्लिक केले तर काय होईल?

स्टेट बँक ऑफ इंडियाने असा कुठलाही मेसेज त्यांच्या खातेधारकांना पाठवलेला नाही. हा मेसेज स्कॅमरने पाठवलेला असून या लिंकद्वारे मालवेअर वापरून खातेधारकांची खासगी माहिती मिळवू शकतात. याद्वारे खातेधारकाच्या बँक खात्याचे तपशील देखील हॅकरला मिळू शकतात आणि तुमचे बँक खाते रिकामे होऊ शकते. 
बँकेबाबत काही तक्रार असेल तर थेट जवळच्या बँक खात्यात जाऊन चौकशी करा. ऑनलाईन फसवणुकीपासून स्वतःच बचाव करण्यासाठी या गोष्टींचा अवलंब करा.

कशी घ्याल काळजी?

भारतीय स्टेट बँकेसह आरबीआयने आणि इतर बँकांनी वेळोवेळी ग्राहकांना अशा फसवणुकीबद्दल सजग केले आहे. बँकेकडून आलेल्या फोनवर बोलताना कुणालाही तुमच्या बँकेचे तपशील, सिव्हीही नंबर, ओटीपी शेयर करू नका. तसेच फसवणुकीचे प्रकरण असल्याचे लक्षात आले असल्यास थेट बँकेच्या शाखेत जाऊन संपर्क करा आणि तुमच्यासोबत झालेला प्रकार सांगा. तुमच्या बँक खात्याची काळजी घेण्याचा पुरेपुर प्रयत्न बँकेकडून घेण्यात येईल.