Sanjay Dutt: बाॅलिवुडमध्ये सलमान खान (Salman Khan), शाहरूख खान (Shahrukh Khan), आमिर खान (Amir Khan) या सेलेब्रिटींचे अनेक चाहते आहेत. ते आपल्या आवडत्या कलाकारासाठी काहीही करू शकतात. अशीच एक अभिनेता संजय दत्तची (Sunjay Dutt) चाहती होती, तिने चक्क आपला संपूर्ण बॅंक बॅलन्स व बॅंक लाॅकरमधील सोन्याचे दागिने आपल्या आवडत्या कलाकाराच्या म्हणजेच संजय दत्तच्या नावावर केले होते. याबाबत संजय दत्तने काय केले हे जाणून घेवुयात.
कोण होती ही चाहती
मुंबईमधील मलबार हिल या भागात राहणाऱ्या संजय दत्तच्या या चाहतीचे नाव निशा पाटील असे होते. त्या गृहिणी होत्या. त्यांच्यासोबत आई व त्यांची भावंडं राहत होती. 15 जानेवारी 2018 साली तिचा दीर्घ आजाराने मृत्यू झाला. त्यांच्या अंत्यविधींनंतर त्यांच्या कुटुंबासमोर मृत्यूपत्र वाचण्यात आले होते, त्यावेळी त्यांनी संपत्ती संजय दत्तच्या नावावर केली असल्याचे कळाले. यामध्ये त्यांनी बॅंकेच्या लाॅकरमध्ये असलेल्या दागिन्यांसहित एकूण 72 कोटीची संपत्ती संजय दत्तच्या नावावर केली होती. ही घटना साधारण 2018 मधील आहे.
संजय दत्तने काय केले
निशा पाटील ही व्यक्ती आपली चाहती असून तिने आपल्या नावावर 72 कोटी संपत्ती केले असल्याचा फोन पोलिसांनी संजय दत्तला केला होता. हे एेकून व चाहतीच प्रेम पाहून संजय दत्त खरचं पूर्णपणे भारावून गेला होता. त्यासाठी ही व्यक्ती पूर्णपणे अनोळखी होती. मात्र त्याने चाहतीचे हे प्रेम पाहून त्वरित बॅंक आॅफ बडोदाच्या वाळकेश्र्वर येथे असणाऱ्या शाखेमध्ये संपर्क केला. निशा पाटील हिची संपूर्ण संपत्ती ही तिच्या कुटुंबातील सदस्याच्या हवाली सुरक्षित करावी असे सांगितले. संजय दत्तचा हा मोठेपणा खरचं वाखाणण्याजोगा होता.