स्मार्टफोन उत्पादनातील आघाडीची कंपनी सॅमसंग फोल्डेबल स्मार्टफोनची भारतात प्रॉडक्शन करणार आहे. अॅपलप्रमाणेच सॅमसंगने देखील भारतात स्मार्टफोन्स उत्पादन वाढवण्याला प्राधान्य दिले आहे. सध्या सॅमसंगकडून एंट्री लेव्हल आणि मिड सेगमेंट स्मार्टफोन्सचे भारतात उत्पादन केले जाते. आता नेक्स्ट जेन फोल्डेबल स्मार्टफोन्सची देखील भारतातच निर्मिती करण्याचे सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सचे नियोजन आहे. असे झाल्यास सॅमसंग फोल्डेबलच्या किंमतीत मोठी घसरण होऊ शकते. ‘मेड इन इंडिया’मुळे स्मार्टफोन्सवर आयात शुल्क लागू होणार नाही. ज्यामुळे फोल्डेबल स्मार्टफोनची किंमत 15 ते 20% कमी होऊ शकते.
सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सने भारतात मोठी गुंतवणूक करण्याची तयारी दर्शवली आहे. ही गुंतवणूक फोल्डेबल स्मार्टफोन्सच्या उत्पादनासाठी केली जाणार असल्याचे बोलले जाते. गॅलक्सी एस 23 या मोबाइल प्रमाणे गॅलक्सी झेड फोल्ड 5 आमि गॅलक्सी झेड फ्लिप 5 असे स्मार्टफोन भारतातच तयार केले जाऊ शकतात. सध्या फोल्डेबल फोन्सचे उत्पादन चीनमध्ये घेतले जाते. मात्र चीनमधील उत्पादनांवर अमेरिकेने निर्बंध घातले आहेत. त्यामुळे तेथून वस्तूंची निर्यात करणे कंपन्यांसाठी नवीन डोकेदुखी बनली आहे. इलेक्ट्रॉनिक्स कंपन्यांसाठी चीन ऐवजी भारत हा मॅन्युफॅक्चरिंगसाठी चांगला पर्याय ठरत आहे.
सॅमसंगने मागील काही महिन्यात भारतातील उत्पादन वाढवले आहे. सॅमसंगच्या गॅलक्सी एस 23 श्रेणीतील फोन्सचे भारतातच उत्पादन घेतले जात आहे. त्याशिवाय उच्च प्रिमीयम श्रेणीतील गॅलक्सी एस 23, गॅलक्सी एस 23+ आणि गॅलक्सी एस 23 अल्ट्रा असे महागडे मोबाईल्स भारतातच तयार केले जात आहेत. नोए़डामध्ये सॅमसंगचा संशोधन आणि विकास विभाग आहे. येथे सॅमसंगमधील तंत्रज्ञांनी वन यूआय ही ऑपरेटिंग सिस्टम विकसित केली आहे. गॅलक्सी एस23 मधील अनेक फिचर्सचे संशोधन नोएडात करण्यात आले आहे.
सॅमसंग गॅलक्सी झेड फोल्ड 3 वर मिळतोय बंपर डिस्काउंट
अॅमेझॉन या ई-कॉमर्स कंपनीनेने सॅमसंग गॅलक्सी झेड फोल्ड 3 या मोबाईलवर तब्बल 49% बंपर डिस्काउंट ऑफर केला आहे. गॅलक्सी झेड फोल्ड 3 आणि गॅलक्सी वॉच 4 हे दोन्ही गॅझेट्स कॉम्बो ऑफरमध्ये उपलब्ध आहेत. या दोन्ही गॅझेट्सी किंमत 201998 रुपये आहे, मात्र 49% डिस्काउंटनंतर ही किंमत 102999 रुपयांना ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. याशिवाय येस बँक क्रेडिट कार्ड असल्यास तात्काळ किमान 12000 रुपयांच्या खरेदीवर 1500 रुपयांचा डिस्काउंट दिला जाईल. ज्यामुळे फोल्डेबल फोनसाठीची कॉम्बो ऑफरची किंमत 101499 रुपये इतकी खाली येईल.
अमेरिका-चीन संघर्षाचा कंपन्यांवर परिणाम
अमेरिका आणि चीनमधील वाढता तणाव आणि त्याचे दोन्ही देशांच्या द्विपक्षीय व्यापारावर होणारे परिणाम पाहता अनेक बड्या कंपन्यांनी चीनमधून उत्पादन प्रकल्प इतर देशांमध्ये स्थलांतरित केले आहेत. नुकताच अमेरिेकेने चीनचे स्पाय बलून अवकाशात नष्ट केले होते. त्यानंतर दोन्ही देशांमधील तणाव अधिकच वाढला होता. अमेरिकेने चीनवर निर्बंध घातले आहेत. त्यामुळे सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सने भारतात जास्तीत जास्त गॅझेट्सचे प्रॉडक्शन करण्याचा विचार सुरु केला आहे.
इम्पोर्टेड मोबाईल्सवर किती टॅक्स लागतो
भारतात बहुतांश कंपन्यांनी स्मार्टफोन्सचे उत्पादन सुरु केले असते तरी फोन्स आयात करण्याचे प्रमाण देखील लक्षणीय आहे. अनेक कंपन्यांचे प्रिमीयम स्मार्टफोन्स आयात केले जातात. या फोन्सवर एकूण 42% कर लागू होते. त्यामुळे फोन्सची किंमत प्रचंड वाढते. आयात होणाऱ्या स्मार्टफोन्सवर 22% बेसिक कस्टम ड्युटी आणि 18% जीएसटी लागतो. स्मार्टफोन्सची भारतात जोडणी होणार असेल तर आयात केले जाणाऱ्या सुट्या भागांसाठी (डिस्प्ले पॅनल) 10% बेसिक कस्टम ड्युटी लागू केली जाते. इतर सुट्या भागांसाठी 15% आयात शुल्क लागू केले जाते.
भारतात स्मार्टफोन्सवर 18% जीएसटी लागू केला जातो. चार्जर, एअरफोन्स, बॅटरीज, पॉवरबँक, मेमरी कार्ड, स्पीकर्स, हेडफोन्स, प्लॅस्टिक स्क्रिन प्रोटेक्टर, टेंपर ग्लास या वस्तूंवर 18% जीएसटी आहे. यूएसबी केबल्सवर 28% जीएसटी असून मोबाईल निर्मितीसाठी आवश्यक 12% जीएसटी आहे.