Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Samsung S23 सिरीजचा स्मार्टफोन आता 'Made in India', भारतीयांना स्वस्तात मोबाईल खरेदीची मिळणार संधी

Samsung Mobile

Samsung Mobile: मोबाईल क्षेत्रातील एक दिग्गज स्मार्टफोन कंपनी सॅमसंग आपल्या नवीन S23 सीरीजचे भारतात उत्पादन सुरू करणार आहे. मूलतः दक्षिण कोरियाची स्मार्टफोन कंपनी असलेल्या सॅमसंगने स्थानिक बाजारपेठेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी भारतात आपला प्रीमियम Galaxy S23 स्मार्टफोन बनवण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने गुरुवारी याबाबत माहिती दिली.

Samsung S23 Series: जर तुम्ही सॅमसंग मोबाईल प्रेमी असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आता तुम्ही सॅमसंग S23 सीरीजचा नवाकोरा स्मार्टफोन (Samsung Smartphone) एकदम कमी किमतीत खरेदी करू शकता. खरे तर, कालच कंपनीने Galaxy Unpacked इव्हेंटमध्ये हा प्रीमियम स्मार्टफोन लॉन्च केला आहे. त्यानंतर याबाबत एक मोठे अपडेट समोर येत आहे. मोबाईल क्षेत्रातील एक दिग्गज स्मार्टफोन कंपनी  सॅमसंग आपल्या नवीन S23 सीरीजचे भारतात उत्पादन सुरू करणार आहे. मूलतः दक्षिण कोरियाची स्मार्टफोन कंपनी असलेल्या सॅमसंगने स्थानिक बाजारपेठेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी भारतात आपला प्रीमियम Galaxy S23 स्मार्टफोन बनवण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने गुरुवारी याबाबत माहिती दिली.

Galaxy S सीरीजचे स्मार्टफोन व्हिएतनाममधील एका कारखान्यात बनवले जातात आणि कंपनी त्यांना भारतात विक्रीसाठी आयात करते. सॅमसंगने एका निवेदनात म्हटले आहे की, 'भारतात विकले जाणारे सर्व Galaxy S23 स्मार्टफोन कंपनीच्या नोएडा कारखान्यात तयार केले जातील.'  सॅमसंगची देशातील बहुतांश उत्पादने  नोएडा कारखान्यातून वितरित केली जात आहेत. भारतात बनवलेल्या Galaxy S23 स्मार्टफोनची विक्री करण्याचा कंपनीचा निर्णय भारतात उत्पादन वाढवणे आणि पर्यायाने व्यवसाय वाढवणे यासाठी आहे.

कंपनीने 1 फेब्रुवारी म्हणजेच बुधवारी Galaxy S23 सीरीज स्मार्टफोनचे तीन मॉडेल सादर केले होते. ज्यामध्ये Samsung Galaxy S23, Samsung Galaxy S23 Plus आणि Samsung Galaxy S23 Ultra हे तीन प्रकार उपलब्ध आहेत.

Galaxy S23 Seris ची सुरुवातीची किंमत भारतात 75,000 ते 1.55 लाख रुपये इतकी आहे. हे फोन अत्याधुनिक कॅमेरा सेन्सरने सुसज्ज आहेत. गेल्या वर्षी सादर केलेल्या Galaxy S22 स्मार्टफोनची किंमत 72,999 रुपये ते 1,18,999 रुपये इतकी होती.ग्राहकांनी या स्मार्टफोनला पसंती दर्शवली होती.