• 04 Oct, 2022 15:16

Big Boss 16 -Salman Khan Earnings: होस्ट सलमान खान कमवणार एक हजार कोटी

Salman Khan Earnings , Big Boss 16

Big Boss 16 -Salman Khan Earnings: बिग बॉस-16 ची सर्वांना उत्सुकता लागली आहे. नुकताच या नव्या सीझनचा प्रोमो पब्लिश झाला. यंदाही सलमान खान शोचे होस्टींग करणार आहे. सलमान खानने बिग बॉससाठी यंदा तब्बल एक हजार कोटी रुपयांचे डील केल्याचे बोलले जाते.

टीव्ही शोमधील सर्वात चर्चेतला आणि तितकाच वादग्रस्त रिएॅलिटी शो बिग बॉस-16 च्या सिझनचा टिझर पब्लिश झाला आहे. यंदाचाही सिझन अभिनेता सलमान खान होस्ट करणार आहे. मागीन दोन सिझनमध्ये बिग बॉस शोमधून आयोजकांना अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही. त्यामुळे यंदा या शोचे सलमान खान किती मानधन घेणार याबाबत प्रेक्षकांमध्ये चर्चेला ऊत आला आहे. बिग बॉस 16 चा सिझन 1 ऑक्टोबर 2022 पासून कलर्सवर सुरु होणार आहे. या सिझनमध्ये सलमान खान सुद्धा खेळणार असे 'प्रोमो'मध्ये दाखवण्यात आले आहे. सलमान खानने बिग बॉस-15 सिझनसाठी 350 कोटींचे मानधन घेतले होते. यंदाच्या बिग बॉस-16 सिझनसाठी सलमान खान तब्बल 1000 कोटींचे मानधन घेणार अशीची चर्चा फिल्म इंडस्ट्रीमध्ये रंगली आहे.  (Salman Khan expecting thousand crore from big boss season 16) 


'इंडिमोल शाईन इंडिया'कडून वायोकॉम 18 आणि डिस्ने स्टारच्या सहाय्याने 'बिग बॉस'ची निर्मिती केली जाते. सलग 13 व्या वर्षी सलमान खान बिग बॉस सिझनचे होस्टींग करणार आहे. याआधीच्या बिग बॉस-15 सिझनमध्ये प्रत्येक एपिसोडसाठी सलमान खानने 25 कोटी रुपयांचे मानधन घेतले होते. यंदाच्या सिझनसाठी सलमानने त्याहून अधिक मानधनाची मागणी केली आहे.

एका वृत्तपत्रानुसार सलमान खानने बिग बॉस-16 च्या प्रत्येक एपिसोडसाठी आयोजकांकडे 43 कोटी रुपयांची मागणी केली आहे. या शोमध्ये सलमान खान विकेंडला दोन एपिसोडमध्ये येणार आहे. तीन महिन्यांत तो 24 एपिसोडमध्ये दिसेल. सलमानची ही मागणी आयोजकांनी मान्य केली तर संपूर्ण सिझनमध्ये सलमान खानला 1050 कोटींचे उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे.

बिग बॉस-4 पासून सलमान खान होस्टिंग करत आहे. सलग 12 वर्ष सलमान खान याने बिग बॉस शोला होस्ट केले आहे. वर्षातून एकदाच हा शो आयोजित केला जातो. सलमान खानला बिग बॉस होस्ट करण्यासाठी आयोजकांकडून शेकडो कोटींचे मानधन दिले जाते. 2010 मध्ये बिग बॉस - 4 साठी सलमान खानला प्रत्येक एपिसोडला 2.50 कोटींचे मानधन मिळाले होते. सातव्या सिझनपासून सलमान खानला प्रत्येक एपिसोडसाठी 5 कोटींचे मानधन मिळाले होते. बिग बॉस 14 साठी सलमान खानला प्रत्येक एपिसोडकरिता 20 कोटींचे मानधन मिळाले होते. आता यात दुपटीने वाढ करण्याची मागणी सलमान खानने केली आहे.

विजेत्यांना घसघशीत बक्षिस

बिग बॉसमधील विजेत्यांना सुरुवातीच्या 5 सिझनमध्ये 1 कोटीचे प्राईज देण्यात आले होते. सुरुवातीचे अनेक सिझनमध्ये प्राईज मनी 1 कोटी होती.बिग बॉस 6 च्या सिझनपासून विजेत्याचे प्राईज मनी निम्म्याने कमी केली. ती कमी करुन 50 लाख रुपयांपर्यंत करण्यात आली होती. बिग बॉस 11 मध्ये विजेत्याला 44 लाख आणि उपविजेत्याला 6 लाखांचे बक्षिस देण्यात आले होते. बिग बॉस 14 मध्ये विजेत्याला 36 लाखांचे बक्षिस देण्यात आले होते. बिग बॉस OTT मध्ये विजेत्याला 25 लाखांचे बक्षिस देण्यात आले होते.

बिग ब्रदरचे भारतीय व्हर्जन आहे बिग बॉस.

डच रिएलिटी शो बिग ब्रदरचे भारतीय व्हर्जन आहे बिग बॉस.2006 मध्ये बिग बॉसचा पहिला सिझन प्रदर्शित झाला होता. अभिनेता अर्शद वारसी हा पहिल्या सिझनचा होस्ट होता. दुसऱ्या सिझनमध्ये अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिने बिग बॉस शोला होस्ट केले होतो. बिग बॉस 3 मध्ये अभिनेते अमिताभ बच्चन यांनी सूत्रसंचालकाची भूमिका पार पाडली होती.

Image Source: Youtube