Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

ऋतुराज गायकवाडच्या नवीन गाडीची किंमत तुम्हाला ठाऊक आहे का? लूक आहे जबरदस्त!

Bike

Image Source : www.twitter.com

Stylish Jawa 42 Bobber Bike: ऋतुराज देखील गाड्यांचा शौकीन आहे. नुकतीच त्याने मूनस्टोन पांढऱ्या रंगात नवीन जावा 42 बॉबर (Jawa 42 Bobber) बाईक खरेदी केली आहे.

Stylish Jawa 42 Bobber Bike: ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) हा भारतीय क्रिकेट संघातील एक लोकप्रिय खेळाडू आहे. इंडियन प्रीमियर लीगमधील(IPL) त्याची कामगिरी नक्कीच वाखाणण्याजोगी होती. मागील वर्षी श्रीलंकेच्या विरुद्धत झालेल्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यातून त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये(International Cricket) पदार्पण केले. ही झाली त्याची क्रिकेट लाईफ. पण तुम्हाला ठाऊक आहे का? ऋतुराज देखील बाईकचा(Bike) शौकीन आहे. त्याची ही आवड फार कमी लोकांना माहिती आहे. नुकतीच त्याने जावा बाईकपैकी एक सर्वोत्तम बाईक खरेदी केली आहे.चला तर जाणून घेऊयात त्याच्या या नवीन बाईकबद्दल.

नवीन जावा 42 बॉबरची किंमत किती?

ऋतुराजच्या बाईक कलेक्शनमध्ये आता एका नवीन बाईकची भर पडली आहे. त्याने जावा 42 बॉबर (Jawa 42 Bobber) खरेदी केली असून तिची दिल्लीतील एक्स-शोरूमनुसार किंमत 2,09,187 लाख रुपये इतकी आहे.  त्याच्या या नवीन बाईकचा लूक अतिशय जबरदस्त आहे.

जावा 42 बॉबरचे विशेष फीचर्स काय आहेत?

  • ऋतुराजने (Ruturaj Gaikwad) अलीकडेच मूनस्टोन पांढऱ्या रंगात नवीन जावा 42 बॉबर (Jawa 42 Bobber) खरेदी केली आहे
  • या बाईकची एक्स-शोरूम किंमत 2.07 लाख रुपये असून जुन्या पेराक नंतर 42 बॉबर (Jawa 42 Bobber) हे जावाचे दुसरे मॉडेल आहे 
  • देशातील विक्रीसाठी सर्वात स्वस्त फॅक्टरी-निर्मित बॉबर असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे 
  • रोडस्टरच्या तुलनेत स्टाइलिंगमध्ये जावामध्ये अनेक बदल असले तरी बॉबर मानक 42 वर आधारित आहे 
  • राइडिंग एर्गोनॉमिक्ससाठी लोअर सेट फ्लोटिंग सिंगल सीट उपलब्ध करून देण्यात आली आहे
  • तसेच यामध्ये फॅटर टायर आणि कमीतकमी बॉडीवर्क, फॉरवर्ड सेट फूट पेग आणि नवीन हँडलबार ही बदलले आहेत 
  • मानक 42 हून हटके 42 बॉबरला पेराकला मोठे इंजिन दिले आहे 
  • या जावा 42 बॉबरमध्ये मोटर 30.2 bhp आणि 32.74 Nm टॉर्क जनरेट करते यामध्ये 6-स्पीड गिअरबॉक्स देण्यात आले आहेत. तसेच ड्युअल चॅनल ABS मानक आहे