Vladimir Putin Luxury Lifestyle: रशिया आणि युक्रेनमधील युद्धादरम्यान रशियाच्या राष्ट्राध्यक्षांबद्दल काही धक्कादायक बातम्या समोर आल्या आहेत. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या लक्झरी लाइफस्टाइल आणि संपत्ती बाबतच्या बातम्या सध्या चर्चेचा विषय बनला आहे. त्यात अशा काही वस्तू आहेत, ज्याची किंमत तुमचे मन हेलावू शकते. एकीकडे रशिया-युक्रेन युद्धामुळे निष्पाप जीव गमावले जात आहेत आणि त्याचदरम्यान व्लादिमीर पुतीन यांचे आलीशान जीवन आणि खर्चाबाबतच्या बातम्या येत असल्याने पुतीन यांच्यावर टीका होत आहे.
मोजता येणार नाही एवढी संपत्ती
79 वर्षीय पुतीन आपल्या संपत्तीमुळे चर्चेत आहे. पुतिन यांच्याकडे समुद्र किनारी 190,000 चौरस फुटांचा बंगला आहे. त्यांच्याकडे 20 आलिशान घरे आहेत. एवढेच नाहीतर 700 कार आहेत. 43 विमाने, 15 हेलिकॉप्टर आणि एक द फ्लाइंग क्रेमलिन नावाचे 716 दशलक्ष डॉलरचे विमान आहे, ज्याने ते नेहमी प्रवास करतात. तर मनगटावर घालायच्या घड्याळांचे कलेक्शन 891500 डॉलरच्या जवळपास आहे. तसेच 750 करोड रुपयांचे ग्रेसफुल नावाचे एक आलीशान जहाज देखील आहे. पुतीन यांच्याकडे तब्बल ९६४१ अब्ज रुपये किंमतीचा सोन्याचा साठा आहे.
बोरिस नेमत्सोव्ह यांनी केली माहिती उघड
राजकीय समीक्षक बोरिस नेमत्सोव्ह यांनी पुतिन कडे एवढी अमाप संपत्ती असल्याची माहिती दिली होती आणि त्या संबंधित काही फोटो देखील शेअर केले होते. वास्तविक्ता अशी आहे की, पुतीन यांनी जगासमोर उघड केलेल्या त्यांच्या वार्षिक इन्कम पेक्षा त्यांची ही संपत्ती किती तरी पटीने जास्त आहे.
गोष्ट 'द घोस्ट' ट्रेनची
पुतिन यांच्या 22 डब्यांच्या 'द घोस्ट' ट्रेनची छायाचित्रे समोर आली आहेत, यावरून ही ट्रेन किती फॅन्सी आणि आलिशान आहे हे दिसून येते. रशियात फिरण्यासाठी पुतिन या ट्रेनचा वापर करतात. या ट्रेनची वैशिष्ट्ये जाणून घेतल्यास तुम्हाला आश्चर्य वाटेल. या ट्रेनमध्ये अँटी-एजिंग मशीन्ससह स्किनकेअर आणि मसाज पार्लरसह संपूर्ण सुसज्ज जिम आहे. याशिवाय आलिशान तुर्की बाथ स्टीम रूम आहे. आलिशान बेडरूम, सुशोभित डायनिंग घर आणि चित्रपटगृह देखील आहे. राजकीय समीक्षक बोरिस नेमत्सोव्ह यांनी पुतिन कडे एवढी अमाप संपत्ती असल्याची माहिती दिली होती आणि त्या संबंधित काही फोटो देखील शेअर केले होते.
बुलेटप्रूफ दरवाजे आणि खिडक्यांसह ही ट्रेन शस्त्रांनी पूर्णपणे सुरक्षित करण्यात आली आहे. यासोबतच यात जीवरक्षक वैद्यकीय उपकरणेही बसवण्यात आली आहेत, जी लढाईच्या वेळी अडचणींना तोंड देण्यासाठी पुरेशी आहेत. या ट्रेनच्या बांधकामाचा खर्च 74 दशलक्ष डॉलर्स आहे, ज्याचा भार सामान्य रशियन नागरिकांच्या खांद्यावर पडला आहे. इतकेच नाही तर त्याच्या देखभाल आणि अपडेटचा खर्च दरवर्षी 15.8 दशलक्ष डॉलर्सच्या जवळपास आहे.