Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Mutual Fund Investment: 10 हजारांच्या एसआयपीतून 3 वर्षात 5.40 लाख रुपयांचा परतावा; जाणून घ्या फंडाची संपूर्ण माहिती

Mutual Fund Investment

Mutual Fund Investment: मुलांच्या भविष्यातील शिक्षणाच्या खर्चाची तरतूद म्हणून तुम्ही गुंतवणुकीचे विविध पर्याय पडताळून पाहत असाल, तर म्युच्युअल फंडमधील सिस्टेमॅटीक गुंतवणूक पद्धत नक्कीच तुमच्या फायद्याची ठरू शकते.

Mutual Fund Investment: मुलांच्या भविष्यातील शिक्षणाच्या खर्चाची तरतूद म्हणून तुम्ही गुंतवणुकीचे विविध पर्याय पडताळून पाहत असाल, तर म्युच्युअल फंडमधील सिस्टेमॅटीक गुंतवणूक पद्धत नक्कीच तुमच्या फायद्याची ठरू शकते.

एसबीआय म्युच्युअल फंड हाऊसमधील SBI Magnum Children's Benefit Fund ने सुरूवातीपासून गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना वार्षिक चक्रवाढ पद्धतीने जवळपास 44.39 टक्के परतावा दिला आहे. म्हणजेच या फंडाच्या एनएफओ (New Fund Offer-NFO)मध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांचे मूल्य आज 30.10 लाख रुपये आहे.

3 वर्षात अपेक्षित परतावा

एसबीआयच्या एसबीआय मॅग्नम चिल्ड्रेन्स बेनिफिट फंडामध्ये (SBI Magnum Childrens Benefit Fund) प्रत्येक महिन्याला 10 हजारांची एसआयपी केली असती, तर आज 3 वर्षांत तुमची 3.60 लाख रुपयांची गुंतवणूक झाली असती. तर या गुंतवणुकीचे मूल्य आज 5.41 लाख रुपये असते. मागील 3 वर्षात या फंडाने एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना 29.8 टक्के रिटर्न्स दिले आहेत. तर वार्षिक चक्रवाढ पद्धतीने या फंडाने वर्षाला 34.24 टक्के रिटर्न्स दिले आहेत.

sip calculator

मासिक गुंतवणूक
अपेक्षित परतावा दर
%
कालावधी
Yr
गुंतवणूक केलेली रक्कम
अंदाजे परतावा
एकूण मूल्य

लॉक-इन कालावधी

एसबीआय मॅग्नम चिल्ड्रेन बेनिफिट फंडाची सुरुवात सप्टेंबर, 2020 मध्ये झाली होती. हा एक ओपन एंडेड फंड असून दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी चांगला पर्याय मानला जातो. या फंडामध्ये सुरुवातीपासून गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना चक्रवाढ पद्धतीने (Compounded Annual Growth Rate-CAGR) वर्षाला 44.39 टक्के परतावा दिला आहे. या स्कीमचा मात्र 5 वर्षांचा लॉक-इन कालावधी आहे. तो कालावधी पूर्ण होईपर्यंत किंवा मुलांची 18 वर्षे पूर्ण होईपर्यंत यातून पैसे काढता येत नाहीत.

दीर्घकालीन गुंतवणूक

ज्या पालकांना मुलांच्या भविष्यासाठी आर्थिक तरतूद करायची आहे. त्यांच्यासाठी ही स्कीम फायद्याची ठरू शकते. या फंडमध्ये 31 ऑगस्ट, 2023 पर्यंत 1,182.26 कोटी रुपयांचा निधी जमा झाला आहे. हा निधी वेगवेगळ्या सेक्टरमधील एकूण 29 कंपन्यांमध्ये गुंतवण्यात आला आहे.यामध्ये भारतातील आणि भारताबाहेरल कंपन्यांचा समावेश असून त्यात फायनान्शिअल सर्व्हिसेस, केमिकल, एफएमसीजी, आयटी आणि कन्झ्युमर कंपन्यांवर सर्वाधिक भर आहे. एसबीआय मॅग्नम चिल्ड्रेन बेनिफिट फंडमधील इक्विटी भाग आर. श्रीनिवासन, फिक्सड् इन्कमची जबाबदारी दिनेश अहुजा आणि मोहित जैन यांच्याकडे ओव्हरसीज सिक्युरिटीजची जबाबदारी आहे.

(डिसक्लेमर : म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी सेबी अधिकृत आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्यावा. या बातमीद्वारे वाचकांना फक्त माहिती दिली जात आहे. 'महामनी' म्युच्युअल फंड खरेदी-विक्रीचा सल्ला देत नाही.)