RRR Movie Update: 95 व्या ऑस्कर अवॉर्ड्स 2023 साठी RRR या चित्रपटातील नाटू नाटू या गाण्याला नॉमिनेशन्स मिळाले आहे. आता जपानपाठोपाठ हा चित्रपट ऑस्कर अवॉर्ड्समध्येमध्येदेखील एक नवीन इतिहास रचण्यासाठी तयार झालेला आहे. या चित्रपटाने जपानमध्ये काय इतिहास रचला होता, याविषयी जाणून घेवुयात.
RRR ने जपानमध्ये रचला इतिहास
RRR हा चित्रपट 21 आॅक्टोबर 2022 रोजी जपानमध्ये प्रदर्शित झाला होता. कीजो कबाटाच्या व्टिने RRR हा चित्रपट जपानच्या 44 शहरे, 209 स्क्रीन आणि 31 IMAX स्क्रीनवर प्रदर्शित करण्यात आला होता. एका आठवड्यात, RRR चित्रपटाने जेपीवाई 73 मिलियन (495,000 डाॅलर) चे कलेक्शन केले होते, जे जपानमधील भारतीय चित्रपटाचे पहिल्या आठवड्यातील सर्वाधिक कलेक्शन होते.
RRR ची जगभरातील कमाई
राम चरण (Ramcharan) आणि ज्युनियर NTR (N. T. Rama Rao Jr.) यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या व एसएस राजामौली (S. S. Rajamouli) यांनी दिग्दर्शित केलेला ब्लॉकबस्टर 'RRR' हा चित्रपटाने जपानी बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती. जगभरात या चित्रपटाने 145 मिलियन डाॅलरची तगडी कमाई केली होती. ज्यामध्ये उत्तर अमेरिकेत 14.5 मिलियन डाॅलरचा समावेश आहे.
RRR ची भारतातील कमाई
12 मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या आरआरआरने जगभरातील चित्रपटगृहांमध्ये 1,200 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली. हा चित्रपट हिंदी भाषेतदेखील 20 मे रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आणि कमी वेळेत हा चित्रपट जगभरातील OTT प्लॅटफॉर्मवर भारतातील सर्वात लोकप्रिय चित्रपट बनला. भारतीय बॉक्स ऑफिसवर 1000 कोटींहून अधिक कमाई या चित्रपटाने केली.