रॉयल एनफिल्ड या बाईकला तरुणांची खास पसंती असते. अजूनही या बाईकने आपली जागा कायम राखल्याचे चित्र सध्या दिसते आहे. या बाईकला जून 2023 मध्ये मोठ्या प्रमाणात मागणी होती अशी आकडेवारी समोर आली आहे. विक्रीबद्दल बोलायचे झाल्यास, रॉयल एनफिल्डची जूनमध्ये एकूण देशांतर्गत विक्री 67,495 युनिट्स इतकी होती. तुम्ही देखील बाईक घेण्याच्या विचारात असला तर ता लोकप्रिय बाईकचा तुम्ही विचार करू शकता. गेल्या वर्षी याच महिन्यात, म्हणजे जून 2022 मध्ये या बाईकचे 50,265 युनिट विकले गेले होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी 34.28 टक्के वाढ झाल्याचे कंपनीने म्हटले आहे.
कोणते मॉडेलची सर्वाधिक विक्री?
गेल्या महिन्यात, Royal Enfield च्या कुठल्या बाईकला सर्वाधिक पसंती होती हे कंपनीच्या विक्री चार्टवर नजर टाकल्यास लक्षात येते. जूनमध्ये सर्वाधिक विक्री झालेल्या मॉडेलमध्ये Royal Enfield Classic 350 ही बाईक अव्वल ठरली आहे. जून 2023 मध्ये या मॉडेलची विक्री 6.12 टक्क्यांनी वाढून 27,003 युनिट्स इतकी झाली असल्याचे कंपनीने म्हटले आहे. या बाईकची किंमत महाराष्ट्रात जवळपास 2.5 लाखाच्या आसपास आहे. या महागड्या बाईकला तरुणांची अधिक पसंती असते.
Presenting the All-New Royal Enfield Classic 350, a ground-up motorcycle with the J series engine. Hop on it and see every moment come to life.
— Royal Enfield (@royalenfield) September 1, 2021
Visit https://t.co/a8En2l2Tf1
#BeReborn #AllNewClassic350 #Classic350 #RoyalEnfield #RidePure #PureMotorcycling pic.twitter.com/AymFcZ66Ff
रॉयल एनफिल्ड हंटर (Royal Enfield Hunter)
रॉयल एनफील्ड हंटर ही कंपनीने नुकत्याच लाँच केलेल्या मोटरसायकलपैकी एक आहे. ऑगस्ट 2022 मध्ये कंपनीने ही बाईक बाजारात विक्रीसाठी आणली होती. या बाईकचा देखील खप दिवसेंदिवस वाढत असल्याचे कंपनीने म्हटले आहे. Royal Enfield Hunter ची जून 2023 मध्ये 16,162 युनिट्सची विक्री झाली असल्याचे विक्री चार्टवरून समजते आहे. रॉयल एनफिल्डच्या एकूण विक्रीत रॉयल एनफिल्ड हंटरचा 23.95 टक्के वाटा असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
रॉयल एनफिल्डची क्रेझ!
रॉयल एनफिल्ड ही इंग्लंडमधील एक सायकल बनवणारी कंपनी होती. ज्याची स्थापना 1901 मध्ये इंग्लंडमध्ये केली गेली. नंतर या कंपनीने मोटारसायकल व्यवसायात उतरण्याचे ठरवले. ब्रिटीशकालीन भारतात सीमेवर गस्त घालण्यासाठी सैनिकांनी ही बाईक दिली जायची. या कंपनीची प्रेरणा घेऊन 1955 पासून भारतात Royal Enfield India ही कंपनी सुरु करण्यात आली. आयशर मोटर्स या उपकंपनीद्वारे भारतात या बाईक्सचे उत्पादन निघते. याचे मुख्यालय चेन्नई येथे आहे.