Royal Enfield Sold More Than 70 Thousand : रॉयल एनफिल्ड वाहने आणि बुलेट्सची तरुणांपासून ते वयस्करांपर्यंत सगळ्यांनाच एक वेगळीच क्रेझ आहे. आता या रेसमध्ये मुली देखील मागे राहिल्या नाहीत. एप्रिल 2023 मध्ये भारतात 73136 रॉयल एनफिल्ड मोटारसायकलची विक्री झाली. ही विक्री 17.66 टक्क्यांनी वाढली आहे. वर्ष 2022 मध्ये केवळ 62,155 रॉयल एनफिल्ड वाहनांची विक्री झाली होती. यावरुन वर्षभरानंतरही रॉयल एनफिल्ड वाहनांना बाजारात पसंती असल्याचे लक्षात येते. एप्रिलमध्ये ओला वगळता इतर सर्वच कंपन्यांच्या इलेक्ट्रिक बाईक्सच्या विक्रीत घसरण झाली होती.
निर्यातीत अपेक्षाभंग
मात्र निर्यातीच्या बाबतीत एप्रिल 2023 हा महिना पाहिजे तेवढा चांगला राहीला नाही. एप्रिल 2023 मध्ये कंपनीने केवळ 4225 रॉयल एनफिल्ड युनिट्सची निर्यात केली. तर एप्रिल 2022 मध्ये कंपनीने 8303 युनिट्सची विक्री केली होती.
साहसी पर्यटकांची प्रथम पसंती
रॉयल एनफिल्ड ही दुचाकी ग्राहकांसाठी प्रीमियम लाइनअप आणि साहसी मोटाकसायकल सारखे मजबूत पर्याय देते. या श्रेणीत मेटियोर 350 क्रूझर, इंटरसेप्टर 650, कॉन्टिनेंटल जीटी 650, न्यू सुपर मेटिअर 650, क्लासिक 350, हंटर 350, 650 पॅरलल ट्विन मोटरसायकल यांचा समावेश आहे. ज्या ग्राहकांना अॅडव्हेंचर टूर, हिमालय टूर, रेसिंग, स्क्रॅम मोटरसायकल यासारख्या साहसी गोष्टींची आवड असते. त्यांच्यासाठी बुलेट 350 आणि 411 ADV क्रॉसओवर या मोटारसायकल्स पहिल्या पसंतीच्या ठरत आहेत.
लोकप्रिय बाइक्स
Royal Enfield सध्या भारतातील मोटारसायकल मधील सर्वात लोकप्रिय क्रुझर्सपैकी एक आहे. कंपनी या रेंजमध्ये Classic 350, Bullet आणि Meteor 350 ची विक्री करत आहे. Royal Enfield Classic 350 ही भारतातील सर्वात लोकप्रिय मोटरसायकल बाइक्सपैकी एक आहे. या गाडीची किंमत 1 लाख 88 हजारांच्या वर आहे.