Royal Enfield Bullet: रॉयल एनफिल्ड कंपनीने बहुप्रतिक्षित बुलेट 350 चे नवे मॉडेल बाजारात लाँच केले. या गाडीबाबत बाइक प्रेमींना उत्सुकता लागली होती. काल (शुक्रवारी) या नव्या गाडीचे दिमाखात अनावरण करण्यात आले. नव्या मॉडेलसाठी बुकिंग सुरू झाली असून 3 सप्टेंबरपासून डिलिव्हरी मिळण्यास सुरुवात होईल.
Royal Enfield Bullet 350 या गाडीमध्ये हँडलबार, हेडलाइटसह अनेक गोष्टी बदलण्यात आल्या आहेत. या गाडीला 349cc चे सिंगल सिलिंडर एअर कूल्ड J सिरिजचे इंजिन देण्यात आले आहे. यातून 20hp पिक पावर आणि 27 Nm टॉर्क जनरेट होतो. तसेच 5 स्पीड गियर देण्यात आले आहेत.
www.royalenfield.com
लूकमध्ये काय बदल?
या बुलेटला स्टायलिश हेडलाइट आणि टेललाइट देण्यात आली आहे. गाडीची एकंदर डिझाइन बुलेट क्लासिक 350 सारखीच आहे. सोबत एलईडी स्क्रीनमध्ये डिजिटल-अॅनलॉग मीटर आणि नवा हँडलबार देण्यात आला आहे. टॉप मॉडेलला संपूर्ण ब्लॅक कलरमध्ये इंजिन देण्यात आले आहे.
Bullet 350 ची किंमत किती?
रॉयल एनफिल्ड बुलेट 350 तीन व्हेरियंटमध्ये देण्यात आली आहे. यात मिलिटरी व्हेरियंटची किंमत 1,73,562 आहे. तर स्टँडर्ड मॉडेलची किंमत 1,97,436 आणि गोल्ड व्हेरियंटची किंमत 2,15,801 ठेवण्यात आली आहे.
पुढील चाकाला 300mm तर मागील व्हिलला 270 mm चे डिस्क ब्रेक देण्यात आले आहे. होंडाची H,ness CB350 आणि जावा 42 या दोन्ही गाड्यांशी नवी बुलेट स्पर्धा करेल.