Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Royal Enfield Price Hike : रॉयल एनफिल्डची हंटर झाली महाग, व्हेरिएंट आणि किंमत काय?

Royal Enfield Price Hike : रॉयल एनफिल्डची हंटर झाली महाग, व्हेरिएंट आणि किंमत काय?

Royal Enfield Price Hike : रॉयल एनफिल्डनं आपल्या हंटर या दुचाकी उत्पादनाची किंमत वाढवण्याचा निर्णय घेतलाय. मागच्या वर्षी ऑगस्टमध्ये (2022) ही बाइक लॉन्च करण्यात आली होती. लॉन्च झाल्यानंतर या बाइकला प्रचंड प्रतिसाद मिळाला. आता कंपनीनं या बाइकची किंमत वाढवण्याचं ठरवलंय.

रॉयल एनफिल्ड (Royal Enfield) हे देशातलं एक लोकप्रिय उत्पादन आहे. या कंपनीच्या सर्वच व्हेरिएंट्सना प्रचंड मागणी असते. मागच्या वर्षी लॉन्च झालेली हंटरही यापासून दूर राहिलेली नाही. ऑगस्टमध्ये लॉन्च झालेल्या या बाइकला प्रचंड असा प्रतिसाद बाजारपेठेतून मिळतोय. याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे ही बाइक स्वस्त आहे. मात्र कंपनीनं या बाइकची किंमत वाढवण्याचा निर्णय घेतलाय. चेन्नईमधल्या या दुचाकी उत्पादनाला आता जास्त किंमत मोजावी लागणार आहे. रॉयल एनफिल्ड हंटर 350 (Royal Enfield Hunter 350) या बाइकची किंमत जवळपास 3000 रुपयांनी वाढवण्यात आलीय.

जुन्या आणि नव्या किंमतीतला फरक जाणून घ्या...

हंटर 350 व्हेरिएंट - नवी किंमत - जुनी किंमत

  • रेट्रो हंटर फॅक्टरी सिरीज - 1.49 लाख रुपये - 1.49 लाख रुपये
  • मेट्रो हंटर डॅपर सिरीज - 1.70 लाख रुपये - 1.67 लाख रुपये
  • मेट्रो हंटर रिबेल सिरीज - 1.75 लाख रुपये - 1.72 लाख रुपये

स्पर्धक आणि वाढलेली किंमत

रॉयल एनफील्ड हंटर 350 रेट्रो आणि मेट्रो या दोन ट्रिम लेव्हलमध्ये सादर करण्यात आलीय. कंपनीची ही बाइक 3 व्हेरियंटमध्ये बाजारात उपलब्ध करून देण्यात आलीय. हंटर 350च्या एक्स-शोरूम किंमती आता 1.49 लाख ते 1.75 लाख रुपयांच्या दरम्यान आहेत. बाजारात सध्या असलेल्या टीव्हीएस रोनीन (TVS Ronin), जावा 43 (Jawa 43), होंडा सीबी 350RS (Honda CB350RS) या बाइक्सशी हंटरची स्पर्धा आहे. सध्या हंटरला मिळणारा प्रतिसाद पाहता वाढत्या किंमतीचा किती परिणाम होईल, हे येत्या काळात समजणार आहे.

फीचर्स काय?

रॉयल एनफिल्ड हंटर 350मध्ये (Royal Enfield Hunter 350) सिंगल-सिलेंडर, फ्यूएल इंजेक्टेड आणि एअर-ऑइल कूल्ड तंत्रज्ञानावर आधारित 349cc इंजिन आहे. हे इंजिन 6,100 RPM वर 20.2 bhpची पॉवर आणि 4,000 आरपीएमवर (RPM) जास्तीत जास्त 27 Nm टॉर्क जनरेट करतं. ट्रान्समिशनसाठी या इंजिनसोबत 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स जोडण्यात आलेला आहे. हंटर 350 एक लिटर इंधनात 36.2 किमी मायलेज देते, असा कंपनीकडून दावा करण्यात आलाय.

बाजारात येणार नवे मॉडेल्स 

रॉयल एनफिल्ड बाजारात नवनव्या बाइक्सचे मॉडेल्स घेऊन येत असते. त्यातल्याच काही बहुप्रतिक्षित बाइक्स लॉन्च करण्याच्या तयारीत कंपनी आहे. कंपनी न्यू जनरेशन बुलेट 350, हिमालयन 450 यावर्षातच बाजारपेठेत दाखल होण्याची शक्यता आहे. रॉयल एनफिल्ड हिमालयन 450, शॉटगन 650 आणि कॉन्टिनेंटल जीटी 650 याच्या फुल्ली फेअर्ड व्हर्जनवर आधारित 450cc नेकेड रोडस्टरवर देखील काम करत आहे.

इलेक्ट्रिक बाइकही आणणार

पेट्रोल इंजिनवर चालणाऱ्या बाइक कंपनी बनवते. मात्र आता इलेक्ट्रिक बाइकही रॉयल एनफिल्ड बनवणार आहे. यासाठी एक टीमही तयार करण्यात आलीय. या व्यवसायात 150 दशलक्ष डॉलरपेक्षाही अधिकची गुंतवणूक कंपनी करणार आहे. पुढच्या वर्षी ही बाइक दाखल होण्याची शक्यता आहे. तसंच पुढच्या काही वर्षात 1.8 लाख युनिट्सचं उत्पादनही करण्याचं लक्ष्य कंपनीनं ठेवलंय.