Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Royal Enfield Models: 500cc पेक्षा जास्त इंजिन क्षमता असलेल्या बाइक्स मध्ये रॉयल एनफिल्ड आघाडीवर

Engine Capacity Above 500cc Bikes

Image Source : www.motorbeam.com

500cc Bikes Sales In May: एकीकडे देशात दुचाकी ऑटो सेगमेंटला मायलेज देण्यासाठी पसंती दिली जात आहे. दुसरीकडे, अवजड इंजिन असलेल्या वाहनांची मागणी करणाऱ्या ग्राहकांचा एक वर्ग आहे. त्यामुळे ही वाहने देशात वेगाने विकली जात आहेत. आज आपण 500cc पेक्षा जास्त इंजिन क्षमता असलेल्या बाइक्सबाबत आणि त्याच्या विक्री बाबत माहिती जाणून घेणार आहोत.

Engine Capacity 500cc Plus Bikes: 500cc पेक्षा जास्त इंजिन क्षमता असलेल्या बाइक्स बाबत बोलायचे झाल्यास  रॉयल एनफिल्ड (Royal Enfield) आणि कावासाकी (Kawasaki) कंपनी यांच्यात तीव्र स्पर्धा आहे. अवजड इंजिन असलेल्या वाहनांची मागणी करणाऱ्या ग्राहकांचा एक वर्ग आहे. त्यामुळे एकीकडे उत्तम मायलेजच्या बाइक्सला पसंती दिली जात असतांना, दुसरीकडे रॉयल एनफिल्डची विक्री जोरदार सुरु आहे.

रॉयल एनफिल्ड ट्विन्स मॉडेल

मे 2023 च्या आकडेवारीनुसार, 500cc अधिक इंजिन असलेल्या वाहनांच्या विक्रीच्या बाबतीत रॉयल एनफिल्ड कंपनीचे 650 ट्विन्स (Twins) मॉडेल पहिल्या स्थानावर आहे. मे 2023 मध्ये एकूण 970 युनिट्सची विक्री झाली आहे.

सुपर मेटिअर मॉडेल

दुसऱ्या क्रमांकावर सुपर मेटिअर मॉडेल आहे. मे 2023 च्या सुपर मेटिअर मॉडेलच्या एकूण 838 युनिट्सची विक्री झाली आहे. Super Meteor रॉयल एनफील्ड कंपनीची आहे. अशाप्रकारे, 500 प्लस सीसी इंजिनच्या बाबतीत, रॉयल एनफिल्डचे वर्चस्व टॉप 2 वाहनांमध्ये दिसून येत आहे.

Z 900 मॉडेल

500 सीसी प्लस इंजिनच्या बाबतीत, Z 900 मॉडेल तिसऱ्या क्रमांकावर आहे. मे 2023 मध्ये Z 900 मॉडेलची एकूण 63 मॉडेल्सची विक्री झाली आहे. तर मे 2022 मध्ये एकूण 42 मॉडेल्सची विक्री झाली होती. म्हणजेच वर्षानुवर्षे येथे ५० टक्क्यांहून अधिक वाढ दिसून आली आहे.  Z 900 मॉडेल कावासाकी  (Kawasaki) कंपनीचे आहे.

Versys 650 मॉडेल

Versys 650 मॉडेलने मे महिन्यात एकूण 14 युनिट्सची विक्री करून चौथ्या क्रमांकावर सर्वाधिक विक्री केली आहे. तर मे 2022 मध्ये एकूण 13 युनिट्सची विक्री झाली. हे मॉडेल कावासाकी कंपनीने बनवले आहे.

निन्जा 1000 मॉडेल

निन्जा 1000 500 सीसी प्लस इंजिनच्या बाबतीत पाचव्या स्थानावर आहे. मे 2023 मध्ये एकूण 14 युनिट्सची विक्री झाली आहे. Ninja 1000 हे मॉडेल देखील कावासाकी कंपनीचे आहे.

ट्रायम्फ टायगर 900 मॉडेल

500 सीसी प्लस इंजिनच्या बाबतीत, Triumph Tiger 900 मॉडेलची चांगली विक्री दिसून आली आहे. आकडेवारीनुसार, मे 2023 मध्ये एकूण 13 युनिट्सची विक्री झाली आहे.  हे मॉडेल ट्रायम्फ कंपनीने बनवले आहे.