Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

E-bullet will be launched: रॉयल एन्फिल्डची घोषणा, येत्या काही महिन्यांत लाँच होणार ई-बुलेट

E-bullet will be launched

E-bullet will be launched: रॉयल एनफिल्डने उमेश कृष्णप्पा यांच्यावर ईव्ही जगात प्रवेश यशस्वी करण्याची जबाबदारी सोपवली आहे. उमेश कृष्णप्पा हे ओला इलेक्ट्रिकचे सीटीओ राहिले आहेत. रॉयल एनफिल्डशी संबंधित माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत आणि यूकेमध्ये एक मोठी आणि समर्पित टीम या कामात गुंतलेली आहे.

E-bullet will be launched: इलेक्ट्रिक वाहनांची लोकप्रियता आणि मागणी दोन्ही वेगाने वाढत आहे. हे पाहता जवळपास सर्वच ऑटोमोबाईल कंपन्या इलेक्ट्रिक वाहने बनवण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत आणि यासाठी भारत सरकार विविध स्किम्समार्फत प्रोत्साहन देत आहे. भारतातील सर्वात पॉवरफुल बाईक म्हणून गणली जाणारी रॉयल एनफिल्ड देखील यात मागे नाही. इंडियन आयशर मोटरचा हा बाईक ब्रँड लवकरच इलेक्ट्रिक वाहन विभागात प्रवेश करणार आहे. येत्या 18 ते 24 महिन्यांत हा ब्रँड या मार्केटमध्ये दिसणार आहे.

रॉयल एनफिल्ड या कंपनीच्या नावापेक्षा त्यांचा बाईक ब्रँड बुलेट भारतात स्वातंत्र्यपूर्व काळापासून लोकप्रिय आहे. आताच्या नव्या पिढीलाही या बुलेटचे आकर्षण आहे. जवळपास दिडशे वर्षे जुन्या ब्रँडची लोकप्रियता कमी होताना दिसत नाही आहे. सध्या पर्यावरणस्नेही इलेक्ट्रिक स्कूटर, बाईक, कार यांचे युग येत आहे. त्यात सर्वात प्रसिद्ध बुलेट कशी मागे राहिल, यामुळे या मार्केटमध्ये बुलेटचे स्थान अबाधित ठेवण्यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

रॉयल एनफिल्डने इलेक्ट्रिक वाहनांच्या जगात यशस्वीपणे प्रवेश करण्याची जबाबदारी उमेश कृष्णप्पा यांच्यावर सोपवली आहे. उमेश कृष्णप्पा हे ओला इलेक्ट्रिकचे सीटीओ (CTO: Chief Technology Officer) राहिले आहेत. रॉयल एनफिल्डशी संबंधित दिलेल्या माहितीनुसार, भारत आणि यूके या दोन्ही ठिकाणी एक मोठी आणि समर्पित टीम या कामात गुंतलेली आहे, जी शून्य उत्सर्जन मोबिलिटी स्पेसमध्ये रॉयल एनफिल्डच्या प्रवेशासाठी योजना तयार करेल.

कंपनी ईव्हीच्या जगात प्रवेश करण्यासाठी 100-150 दशलक्ष युएस डॉलरची गुंतवणूक करण्यास तयार आहे. या कामात गुंतलेल्या टीमला 'एल' हे सांकेतिक नाव देण्यात आले आहे. ज्या अंतर्गत कंपनी अशी उत्पादने तयार करू इच्छिते जी जागतिक खरेदीदारांच्या गरजा पूर्ण करू शकतील.

इलेक्ट्रिक बाईक कधी लाँच होणार? (When will the electric bike be launched?)

या वर्षाच्या उत्तरार्धापर्यंत कंपनी स्वतःला बाजारात उभी करताना दिसत आहे. सध्या, कंपनी प्रत्येक युनिटची व्यवसाय क्षमता वार्षिक 1.2 ते 1.8 लाख कशी असू शकते याचा शोध घेण्यात व्यस्त आहे. कंपनी आपली इलेक्ट्रिक वाहने केवळ भारतातच नव्हे तर इतर देशांमध्येही विकण्याचा प्रयत्न करत आहे. यासोबतच तो या वर्षी त्याचे प्रोडक्ट व्हॅलिडेशन करून पुढच्या वर्षी बाजारात आणू शकतो.

स्थानिक ऑनलाईन माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत कंपनीच्या प्रवक्त्यांनी माहिती दिली की, कंपनी ईव्हीच्या जगात प्रवेश करण्यासाठी खूप वेगाने पुढे जात आहे. अनेक संशोधन आणि विकास कामांसोबतच प्रगत टप्प्यातील चाचणीच्या अनेक टप्प्यांचे नियोजन सुरू आहे. प्रवक्त्याच्या म्हणण्यानुसार, कंपनी ईव्हीचे बाजार आणि ग्राहक समजून घेण्यासाठी अधिक वेळ घालवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यानंतर कंपनी मजबूत रणनीतीसह आपला ईव्ही पोर्टफोलिओ आणि व्यवसाय मॉडेल तयार करेल.