Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Ved Movie Box Office Collection: रितेश देशमुखच्या 'वेड' चित्रपटाने केला अखेर 50 कोटींचा गल्ला पार

Ved Movie Box Office Collection

Image Source : http://www.koimoi.com/

Ved Marathi Movie: रितेश देशमुख व जिनिलीया देशमुख यांचा वेड चित्रपट एकापाठोपाठ एक रेकाॅर्ड तोडत आहे. अखेर या चित्रपटाने बाॅक्स आॅफीसवर आपला डंका वाजविला. फक्त 20 दिवसात या चित्रपटाने तब्बल 50 कोटींचा गल्ला जमा केला आहे.

Riteish Deshmukh and Genelia Ved Marathi Movie: वेड हा चित्रपट रिलिट होऊन 20 दिवसदेखील झाले आहे. तरी या चित्रपटाच्या यशाची घौडदौड सुरूच आहे. रितेश देशमुखच्या या चित्रपटाने अनेक मराठी चित्रपटांचे रेकार्ड तोडले आहे. म्हणजेच संपूर्ण महाराष्ट्रात ‘वेड’ (Ved) हा चित्रपट लयं भारी ठरला आहे.

रितेश देशमुख (Riteish Deshmukh) दिग्दर्शित ‘वेड’ हा पहिलाच चित्रपट आहे. हा चित्रपट होऊन जवळजवळ 20 ते 21 दिवस झाले आहे, तरी बाॅक्सआफिसवर या चित्रपटाचा बोलबाला दिसत आहे. फक्त 20 दिवसातच या चित्रपटाने 50 कोटींची कमाई केली आहे. मराठी इंडस्ट्रीमध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत आता वेडचा देखील समावेश झाला आहे. या चित्रपटाने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावले असून एकापाठोपाठ एक रेकाॅर्ड तोडण्याच्या तयारीत आहे. पुढे आणखी ही मोठा टप्पा पार करेल का, याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

वेड  चित्रपटाने 50 कोटींचा टप्पा पार केल्यानंतर रितेश व जिनिलियाने सोशलमिडीयावर पोस्ट शेयर करत सर्व प्रेक्षकांचे आभार मानले. या चित्रपटाची ही विक्रमतोड कमाई पाहून अभिनेता सिध्दार्थ जाधवदेखील भारावला गेला आहे. त्याने ही पोस्ट शेयर करत रितेश व जिनिलियाचे अभिनंदन केले आहे. तर रितेश याला उत्तर देत ‘लव्ह यू सिद्धूं’ असे म्हटले आहे.