Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Richest Temple in India : ही आहेत भारतातील 5 श्रीमंत मंदिरे!

Richest Temple In India

Richest Temple in India : भारतातील मंदिर संस्थानांकडे इतकी संपत्ती आहे की, ही मंदिरे भांडवलाबाबत देशातील काही कंपन्यांना मागे टाकतील. तर आज आपण अशाच काही श्रीमंत देवस्थानांची संपत्ती जाणून घेणार आहोत.

उद्योगपती, अभिनेते, खेळाडू अशा अनेकांच्या संपत्तीचे आकडे आपण नेहमीच ऐकत असतो. तसेच निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय क्षेत्रातील नेतेही त्यांची संपत्ती जाहीर करतात. या सगळ्यांच्या संपत्तीचे आकडे ऐकून आपल्याला अवाक व्हायला होते. मात्र यातल्या भल्या भल्यांनाच काय पण मोठमोठ्या कंपन्यांनाही मागे टाकेल अशी संपत्ती देशातील अनेक मंदिरांकडे आहे. तिरुमला तिरुपती देवस्थानाने नुकतीच मंदिर संस्थानाची संपत्ती जाहीर केली. ही संपत्ती सुमारे 2.5 लाख कोटी रुपये इतकी आहे. इंडियन शेअर मार्केटमधील काही कंपन्यांच्या भांडवलापेक्षा तिरुपती मंदिराची संपत्ती जास्त असल्याचे दिसून आले आहे. तरा अशाच भारतातील आणखी काही श्रीमंत देवस्थानांची संपत्ती जाणून घेणार आहोत.

तिरूपति बालाजी मंदिर, आंध्र प्रदेश (Tirupati Balaji Temple, Andhra Pradesh)

Tirupati Balaji temple-1
Image Source : Wikipedia.com 

तिरुपती बालाजी मंदिर हे सर्वाधिक श्रीमंत मंदिर मानले जाते. काही दिवसांपूर्वीच तिरुपती संस्थानाने जाहीर केलेल्या संपत्तीनुसार मंदिराची संपत्ती 2.5 लाख कोटी रुपये इतकी आहे. हे मंदिर आंध्रप्रदेशमध्ये आहे. मंदिराकडे रोख रक्कम, कितीतरी टन सोनं, बॅंकेत मुदत ठेवी आणि अनेक मंदिराच्या नावाने प्रॉपर्टीसुद्धा आहे. मंदिराला देणगीरूपाने दरवर्षी 600 कोटीहून अधिक रक्कम मिळत असते. इतकेच नव्हे तर केवळ लाडूचा प्रसाद विकून मंदिराला 75 कोटींहून अधिक उत्पन्न मिळते.

पद्मनाभ स्वामी मंदिर, केरळ (Padmnabh Swami Temple, Kerala)

Padmnabh swami temple

केरळमधील पद्मनाभस्वामी मंदिराकडे सर्वाधिक संपत्ती असल्याचे बोलले जाते. पण याबाबत अधिकृत माहिती उपलब्ध नाही. सध्या मंदिराकडे 1 लाख 35 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती असल्याचे कळते. या मंदिराच्या श्रीमंतीचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. हे केवळ भरतातीलच नव्हे तर जगातील सगळ्यात श्रीमंत हिंदू मंदिर असल्याचे बोलले जाते. केरळमध्ये असलेल्या या मंदिराकडे जवळपास वीस बिलियन डॉलरपेक्षा अधिक इतकी संपत्ती आहे; जी जगातल्या कुठल्याही हिंदू मंदिरपेक्षा जास्त आहे.

साईबाबा मंदिर, शिर्डी, महाराष्ट्र (Sai Baba Temple, shirdi, Maharashra)

Shirdi sai baba temple

महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथील साईबाबा मंदिराचा श्रीमंत मंदिराच्या यादीत समावेश होतो. साईबाबा मंदिरात संपूर्ण भारतातून येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. मंदिराला वर्षाला 350 कोटीहून अधिक देणगी मिळते.

वैष्णोदेवी मंदिर, जम्मू आणि काश्मीर (Vaishnidevi temple, Jammu & Kashmir)

Vaishnidevi temple

जम्मू आणि काश्मीर वैष्णोदेवी मंदिरातही दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक जात असतात. ही संख्या लाखोंच्या घरात आहे. या मंदिराला दरवर्षी 500 कोटीच्या आसपास देणगीरूपात पैसे मिळत असल्याचे बोलले जाते.

सिद्धीविनायक मंदिर, मुंबई, महाराष्ट्र (Siddhivinayak Temple, Mumbai Maharashtra)

Siddhivinayak temple
Image Source : Wikipedia.com 

देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईतील दादर परिसरातील सिद्धीविनायक मंदिर हे सुद्धा श्रीमंत मंदिराच्या यादीतील महत्त्वाचे मंदिर मानले जाते. दरवर्षा या मंदिरात लाखो भाविक हजेरी लावत असतात. संकष्टी, अंगारकी या दिवशी मंदिरात भरपूर गर्दी असते. तसेच या मंदिरात नवस फेडणाऱ्यांची संख्याही सर्वाधिक आहे. त्यामुळे मंदिराच्या दानपेटीत कोट्यवधीरुपये देणगी रुपात जमा होतात. काही भाविक नवस पूर्ण झाल्यावर सोन्या-चांदीच्या वस्तू, बिस्किटे, परकीय चलने दान करतात. यातून मंदिराच्या उत्पन्नात दिवसेंदिवस वाढ होत आहे.

अशाप्रकारे भारतात अनेक श्रीमंत मंदिरे आहेत. यातील ही पाच सर्वाधिक श्रीमंत मंदिरे (5 Richest Temple in India) असल्याचे मानले जाते. या मंदिरांच्या संपत्तीत दरवर्षी वाढच होत आहे.