अलिकडच्या काळात प्रत्येक क्षेत्रात आर्टिफिशियल इंटेलिजन्सनं (Artificial intelligence) प्रवेश केला आहे. व्हिडिओ, फोटो, कंटेंट रायटिंग किंवा इतर कोणतंही क्षेत्र असो. या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर सर्वत्र होताना दिसत आहे. अनेकवेळा तर गुन्हेगारदेखील एआय तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत. दरम्यान, कृषी क्षेत्रातही (Agriculture) एआयच्या मदतीनं बरंच काही करता येऊ शकतं. यावर आता कामदेखील सुरू झालं आहे. हवामानाचा अंदाज वर्तवण्यापासून ते झाडांना केव्हा आणि किती खत, पाण्याची गरज आहे, हे सर्व एआयच्या मदतीनं शक्य होणार आहे. एकूणच या एआयचा शेतीच्या विकासाला कसा हातभार लागणार आहे, याची माहिती गरजेची आहे. झी बिझनेसनं हे वृत्त दिलंय.
Table of contents [Show]
माहितीचं विश्लेषण शक्य
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर विविध क्षेत्रातल्या डेटा अॅनालिसिस म्हणजेच विश्लेषणासाठी केला जातो. कृषी क्षेत्रातदेखील या तंत्रज्ञानाचा वापर करून माहितीचं विश्लेषण करता येवू शकतं. याच्या मदतीनं हवामान, माती, पाणी आणि यासह सर्व प्रकारच्या तंत्रज्ञानाचा नेमका काय परिणाम होतोय, हे समजण्यास मदत होणार आहे. या डेटा अॅनालिसिसमुळे शेतकऱ्यांना कोणत्या वेळी कोणत्या पर्यायाचा वापर करायचा यासह आपल्या शेतीसंदर्भातले निर्णय कधी, कसे घ्यायचे, याचा अंदाज येवू शकतो.
? Watch our new segment on NBC News now!
— Carbon Robotics (@carbon_robotics) June 8, 2023
➡ https://t.co/cbaW0aU7LY#nbcnews #ai #farming #robotics #technology #news pic.twitter.com/PMlEbfOBla
पुरेसा डेटा असेल तर...
पुरेसा डेटा असेल तर शेती मशागत करताना सुधारणेला वाव असेल, योग्य तो निर्णय घेणं सोपं होणार आहे. प्रामुख्यानं हवामानाचा अंदाज, मातीचं विश्लेषण, पाण्याचा वापर आणि कोणत्या प्रकारचं बियाणं निवडायचं याबाबत मदत होणार आहे. कीटकनाशकांचा वापर कसा, कधी करायचा, काय काळजी घ्यायची, यासंबंधित निर्णयही सहज घेता येणार आहेत.
मशीन लर्निंग
या तंत्रज्ञानातली एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मशीन लर्निंग. यामुळे शेती करताना फायदाच फायदा होऊ शकतो. मशीन लर्निंग अल्गोरिदमच्या प्रशिक्षणानं कृषी क्षेत्रात सर्वच प्रकारचे निर्णय सहज घेता येणार आहेत. पीक उत्पादन, कीटकनाशकं, रोग व्यवस्थापन आणि शेतीशी संबंधित इतर समस्यांवर काम करता येण्यासारख्या काही निर्णयांचा यात समावेश आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या वापरानं एक्स्पर्ट सिस्टम डेव्हलप केली जाऊ शकते.
स्वयंचलित मशीन
एआयच्या मदतीनं स्वतंत्र तसंच स्वयंचलित मशीन विकसित करता येऊ शकतात. या तंत्रांच्या मदतीनं शेतीतली विविध कामं स्वयंचलित होतील. अत्यावश्यक बाबी वगळता शेतकऱ्याला स्वत: अधिकचे कष्ट घेण्याची गरज उरणार नाही. सहाजिकच त्यामुळे उत्पादन वाढण्यास मदत होईल. विविध प्रकारचे सेन्सर्स आणि डिव्हाइसेसची ही मदत घेतली जाऊ शकते. यामुळे सिंचन, खतं आणि कीटकनाशकं अशा शेतीतल्या महत्त्वाच्या कामांसाठी त्याचा वापर स्वयंचलित होऊ शकतो.
रोग अन् कीड व्यवस्थापन
आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या सहाय्यानं बहुतांश गोष्टी तर स्वयंचलितच होतील. त्यामुळे शेतातला तुमचा वेळ आणि श्रम दोन्ही वाचवा येणार आहे. उत्पादन आणि नफादेखील वाढणार आहे. प्रत्येक शेतकऱ्याला शेतीतले रोग कीड लागण्याची अधिक चिंता असते. या रोगाचं किंवा किडीचं योग्यवेळी व्यवस्थापन न केल्यास मोठं नुकसानही शेतकऱ्याला सोसावं लागतं. मात्र या तंत्रज्ञानाच्या मदतीनं वेळेत रोग ओळखणं आणि त्यावर योग्य उपचार करणं शक्य होईल. शेतीची सुरक्षिततादी यामुळे वाढेल आणि परिणामी उत्पादनातही वाढ होईल.