Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Real Estate: रिअल इस्टेट क्षेत्राला संजीवनी, गुंतवणूकदारांच्या संख्येत वाढ…

Real Estate

Image Source : www.epcworld.in

खाजगी इक्विटी गुंतवणुकीत, बहुतेक गुंतवणूकदारांनी दिल्ली-एनसीआर, मुंबई आणि हैदराबादला पसंती दिल्याचे दिसते आहे. व्यावसायिक आणि कार्यालयीन मालमत्तांची खरेदी-विक्री जास्त झाली असल्याने, या शहरांत उद्योगवाढीसाठी मालमत्तांची खरेदी विक्री होत असल्याचे अहवालात म्हटले आहे. या तीन शहरांत रिअल इस्टेटमधील खाजगी इक्विटी गुंतवणूक 63% इतकी नोंदवली गेली आहे.

कोविड संक्रमणापासून रिअल इस्टेट क्षेत्राला गुंतवणूकदरांचा म्हणावा तितका प्रतिसाद मिळत नव्हता. मात्र आता देशातील रिअल इस्टेट क्षेत्राला संजीवनी मिळताना दिसत आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत रिअल इस्टेट क्षेत्रात रु. 10,000 कोटींहून अधिक खाजगी इक्विटी गुंतवणूक करण्यात आल्याचे एका अहवालात म्हटले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी रिअल इस्टेट क्षेत्रात कमालीची गुंतवणूक पहायला मिळाली आहे. 

गेल्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत या 3 महिन्यांत खाजगी समभाग गुंतवणुकीत सुमारे 85 टक्क्यांनी वाढ नोंदवली गेली आहे.

रिअल इस्टेट क्षेत्राबाबतच्या Savills India च्या अहवालानुसार, गेल्या वर्षी एप्रिल ते जून या कालावधीत रिअल इस्टेट क्षेत्रात सुमारे 70.40 दशलक्ष डॉलरची खाजगी इक्विटी गुंतवणूक झाली होती, परंतु यावर्षी या 3 महिन्यांत 130 दशलक्ष डॉलरची गुंतवणूक झाली आहे. एकूण गुंतवणुकीपैकी सर्वाधिक  66 टक्के गुंतवणूक ही खाजगी इक्विटीत झाल्याचे आढळले आहे. यात व्यावसायिक आणि कार्यालयीन मालमत्तांची खरेदी-विक्री, निवासी मालमत्तेच्या खरेदी-विक्रीपेक्षा अधिक असल्याचे निरीक्षण या अहवालात नोंदवले गेले आहे.

दिल्ली, मुंबई आणि हैदराबादला पसंती! 

खाजगी इक्विटी गुंतवणुकीत, बहुतेक गुंतवणूकदारांनी दिल्ली-एनसीआर, मुंबई आणि हैदराबादला पसंती दिल्याचे दिसते आहे. व्यावसायिक आणि कार्यालयीन मालमत्तांची खरेदी-विक्री जास्त झाली असल्याने, या शहरांत उद्योगवाढीसाठी मालमत्तांची खरेदी विक्री होत असल्याचे अहवालात म्हटले आहे. या तीन शहरांत रिअल इस्टेटमधील खाजगी इक्विटी गुंतवणूक 63% इतकी नोंदवली गेली आहे.

उद्योगविस्तार हे कारण 

कोविड नंतर जागतिक अर्थव्यवस्थेत देखील मोठे चढउतार पाहायला मिळाले होते. सध्या अमेरिका, जर्मनी व इतर युरोपियन देश आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. अशातच भारत सरकारने अर्थव्यवस्थेच्या बाबतीत हाताळलेली परिस्थिती, घेतलेले निर्णय आणि राबवलेली धोरणे यांचा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर जाणवतो आहे. त्यामुळेच भारतात गेल्या काही वर्षांपासून स्टार्टअप्सची संख्या वाढते आहे. याचाच परिणाम आता  रिअल इस्टेट क्षेत्रावर देखील पहायला मिळतो आहे. सर्वाधिक गुंतवणूक ही खाजगी इक्विटीमध्ये होत आहे. याचा वापर वेअरहाउसिंग आणि लॉजिस्टिक्ससाठी केला जातो. व्यापारवृद्धीसाठी कंपन्या मोठमोठ्या शहरात जागा खरेदी करताना दिसत आहेत. यामुळे आगामी काळात या क्षेत्राची झपाट्याने वाढ होण्याची अपेक्षा जाणकारांनी व्यक्त केली आहे.