Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

retirement-planning: कोणत्या वयात सुरू करावं रिटायरमेंट प्लानिंग?, कोणत्या योजना आहेत बेस्ट?

Best Age For Retirement Planning

रिटायरमेंट प्लानिंग कोणत्या वयात करावं आणि त्यासाठी कुठे आणि कसे पैसे गुंतवावेत असा प्रश्न अनेकांना पडतो. मग यासाठीच कोणत्या योजना तुम्हाला एक उत्तम पर्याय ठरू शकतो हे आपण पाहाणार आहोत.

कोणत्याही फायनॅन्शिअल एक्सपर्टशी चर्चा केली तर तो तुम्हाला कमी वयातच रिटायरमेंट प्लानिंगविषयी माहिती देईल. सर्वसाधारणपणे व्यक्ती वयाच्या साठीपर्यंत काम करत असते. काम करण्याचा त्या व्यक्तीचा कालावधी हा साधारणपणे 30 ते 35 वर्षांचा असतो. त्य़ातही तरुण वयात काम करणं चांगलं असतं आणि उत्साहवर्धकही. या वयात तुम्हाला फारशा पैशांची गरज लागत नसते कारण अंगावर फारश्या जबाबदाऱ्या नसतात. आपल्या घरातली मंडळीही अशा नव्याने नोकरीला लागलेल्या मुलांना दोन पैसे बाजूला टाक असा सल्ला देत असतात. यामागचं कारण म्हणजे भविष्यात अंगावर पडणाऱ्या जबाबदाऱ्या आणि नंतर कमी होणारी गुंतवणूक. मग रिटायरमेंट प्लानिंग नेमकं करावं तरी कसं असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो.

कोणत्या वयात करावं रिटायरमेंटचं प्लानिंग?

वयाच्या पंचविशीत व्यक्ती नोकरीला लागते आणि साठ वर्षाच्या कालावधीत ती व्यक्ती निवृत्त होते. मग अशावेळेस नेमकं कोणत्या वयात रिटायरमेंटचं प्लानिंग करावं असा प्रश्न अनेकांना पडतो. मग अशावेळेस कोणत्या वयात आपल्या निवृत्तीचं प्लानिंग करावं हा प्रश्न किंवा ही शंका आज आपण दूर करण्याचा प्रयत्न करणार आहोत.
साधारणपणे वयाच्या 35 ते 40 या काळात तुम्हाला तुमच्या रिटायरमेंटचं नियोजन करता आलं पाहिजे. आयुष्यातला हा काळ उत्साहवर्धकही असतो आणि निरोगीही.अशातच आपल्याला आपल्या जबाबदारीची म्हणा किंवा कर्तव्यांचीही जाणीव झालेली असते. तुमचा परिवार विस्तारही साधारणपणे याच काळात होत असतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे याच काळात तुमंच्या हातात किमान 20 वर्ष नोकरीची असतात. म्हणजेच या काळात तुम्ही नियमित पैसे बाजूला टाकूही शकता.

कोणत्या सरकारी योजना आहेत बेस्ट?

रिटायरमेंट प्लानिंगचं वय लक्षात आल्यावर दरमहा बाजूला टाकावी लागणारी रक्कम गुंतवावी तरी कुठे असा प्रश्न पडणं स्वभाविक आहे. मग अशा वेळेस काही सरकारी स्कीम आहेत ज्यात पैसे गुंतवल्यास त्या तुम्हाला भविष्यात चांगला परतावा देऊ शकतात. त्या स्कीम कोणत्या आहेत ते पाहूया.

अटल पेन्शन योजना

ही योजना नोकरदारांसाठी एक उत्तम योजना आहे. या योजनेत 18 वर्ष वयाच्या तरूणापासून ते 40 वर्ष वयाच्या व्य़क्तीपर्यंत कुणीही पैसे गुंतवू शकतं. यात तुम्ही दरमहा जितके जास्त पैसे गुंतवाल त्याप्रमाणे तुम्हाला वयाच्या 60 वर्षांनंतर मासिक पेन्शन मिळत राहातं.

नॅशनल पेन्शन सिस्टम

या स्कीममध्ये 18 ते 70 वर्षातलं कोणीही पैसे गुंतवू शकतं. या योजनेचे पैसे हे शेअर बाजारात गुंतवले जातात. त्यामुळे या स्कीममध्ये तुम्हाला 10 टक्के परतावाही मिळतो. वयाची साठ वर्ष होईपर्यंत या योजनेत पैसे गुंतवावे लागतात.

पंतप्रधान वय वंदन योजना

ही स्कीम भारतीय जीवन विमा निगमद्वारे चालवली जाते.यात कोणताही वरीष्ठ नागरिक जास्तीत जास्त 15 लाख रुपये गुंतवून 10 वर्ष पेन्शन घेऊ शकतो.जर या योजनेत तुम्ही 15 लाख रुपये गुंतवणूक केलीत तर तुम्हाला दरमहा 9 हजार 250 रुपये पेन्शन म्हणून मिळू शकतं.यानंतर तुमची रक्कम तुम्हाला परत मिळू शकते.