Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Lapsed LIC Policy: एलआयसीची बंद पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची संधी; एलआयसी देत आहे विशेष सवलत

Lapsed LIC Policy

Lapsed LIC Policy: एलआयसीच्या 2 वर्षांपूर्वी लॅप्स झालेल्या पॉलिसी पुन्हा सुरू करण्यासाठी एलआयसीने अशा पॉलिसीधारकांसाठी 1 फेब्रुवारी ते 24 मार्चपर्यंत विशेष मोहिम सुरू केली.

भविष्यासाठी तरतूद करताना एलआयसी पॉलिसीचा विचार करणाऱ्यांची संख्या मोठी आहे आणि त्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. पण काही कारणास्तव पॉलिसीधारकांनी त्यांची पॉलिसी बंद केली तर काय? असा प्रश्न निर्माण होतो. मुदतपूर्तीपूर्वी बंद झालेल्या जुन्या विमा पॉलिसींना पुनरुज्जीवित करण्याची मोहीम एलआयसीने (LIC - Life Insurance Corporation of India) सुरु केली आहे.

1 फेब्रुवारी ते 24 मार्च दरम्यान विशेष मोहिम

तुम्ही एलआयसी पॉलिसीचा गुंतवणूक किंवा इन्शुरन्ससाठी वापर करत असाल तर एलआयसी तुमच्यासाठी एक चांगली संधी घेऊन आली आहे. भारतीय आयुर्विमा महामंडळाने (LIC - Life Insurance Corporation of India) मुदतपूर्तीपूर्वी बंद झालेल्या जुन्या विमा पॉलिसींना पुनरुज्जीवित करण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. ही मोहीम 1 फेब्रुवारीपासून सुरू झाली असून 24 मार्चपर्यंत चालणार आहे. ज्या एलआयसी पॉलिसीधारकांनी त्यांची पॉलिसी कोणत्याही कारणाने बंद केली आहे, ते ती पुन्हा सुरू करू शकतात.

एलआयसीकडून लेट फी माफ 

एलआयसीने हाती घेतलेल्या या मोहिमेदरम्यान, प्रीमियमसाठी लेट फी माफ करण्यात आली आहे. तसेच विलंब शुल्क आणि प्रीमियम माफ करण्यात आला आहे. पॉलिसीधारकांना 1 लाख रुपयांपर्यंत विलंब शुल्क आणि 3 लाख रुपयांपर्यंतच्या प्रीमियमवर 25 टक्के सूट मिळेल. 3 लाख रुपयांच्या वरच्या प्रीमियमवर 30 टक्के सूट मिळेल.

प्रीमियम कसा भरायचा?

एलआयसीने हाती घेतलेल्या माहिमेत, न भरलेल्या प्रीमियमच्या तारखेपासून पाच वर्षांपर्यंतची पॉलिसी पुन्हा सुरू करता येणार आहे. पात्र नॅशनल ऑटोमेटेड क्लिअरिंग हाऊस (NACH) आणि बिल पे नोंदणीकृत पॉलिसींवर विशेष ऑफर अंतर्गत विलंब शुल्क किमान 5 रुपये आकारले जाऊ शकते. पॉलिसीचा प्रीमियम ऑनलाईन पद्धतीने किंवा एलआयसीच्या ऑफिसमध्ये जाऊन किंवा एलआयसी एजंटद्वारे भरू शकतात. टर्म इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स आणि मल्टिपल रिस्क पॉलिसी यासारख्या उच्च जोखीम असलेल्या पॉलिसी या सवलतीसाठी पात्र नसतील. ज्या पॉलिसी प्रीमियम भरण्याच्या मुदतीत संपल्या आहेत; पण सुरू करण्याच्या तारखेपर्यंत पूर्ण झालेल्या नाहीत. त्या पुन्हा सुरु करण्यासाठी पात्र असतील.

पॉलिसीधारकांसाठी उत्तम संधी

एलआयसीकडे लहान मुलांपासून वृद्धांसाठी अनेक प्रकारच्या स्कीम सुरू आहेत. या स्कीम किंवा पॉलिसी अंतर्गत ग्राहकांना फक्त आर्थिक संरक्षणच नाही तर बचतही करता येते. एलआयसीने सुरू केलेली ही मोहीम ज्या पॉलिसीधारकांनी मुदतपूर्तीपूर्वी पॉलिसी बंद केली; त्यांच्यासाठी आहे. त्यांना विलंब शुल्क आणि प्रीमियममध्ये सवलत देऊन ती पुन्हा सुरु करण्याची उत्तम संधी आहे. जास्तीत जास्त पॉलिसीधारकांनी या ऑफरचा लाभ घेऊन त्यांची लॅप्स झालेली पॉलिसी पुन्हा सुरू करावी, असे आवाहन एलआयसीतर्फे करण्यात आले.

कधीपर्यंत पॉलिसी पुन्हा सुरु करता येईल?

एलआयसीने लॅप्स झालेली पॉलिसी पुन्हा सुरू करण्यासाठी एक अट घातली आहे. ती म्हणजे ज्या पॉलिसीधारकाने पॉलिसी खरेदी केल्यानंतर 2 वर्षे प्रीमियम भरणे थांबवले आहे. असे पॉलिसीधारक लॅप्स झालेली पॉलिसी पुन्हा सुरू करू शकतात. 2010 पूर्वी हा कालावधी 5 वर्षांचा होता. पण 2010 नंतर हा कालावधी 2 वर्षांवर आणण्यात आला आहे. म्हणजे, सलग 2 वर्षे पॉलिसी प्रीमियम न भरलेल्या पॉलिसी पुन्हा सुरू करता येणार नाही. त्या पूर्णत: लॅप्स होतील. परिणामी त्या पॉलिसीधारकाला दुसरी पॉलिसी घ्यावी लागेल. दोन वर्षानंतर पॉलिसीधारकाची इच्छा असल्यास तो त्याविरोधात दावा करून, भरलेले पैसे पुन्हा मागू शकतो किंवा त्याचा मॅच्युरिटी कालावधी पूर्ण होण्याची वाट पाहू शकतो.